Skip to main content

Posts

Showing posts from October 3, 2020

२१ दिवस निद्रा

*  *आई तुळजाभवानी..... !* महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आदिशक्ती ही वर्षातून २१ दिवस निद्रा घेते. उरलेले ३४४ दिवस देवी अष्टौप्रहर जाग्रृत असते. निद्रा समयी देवीला १०८ साड्यांचे वेष्टन (दंड नेसवने)केले जाते व विधिवत् पलंगावर निद्रेसाठी ठेवले जाते. असे असणारे तुळजाभवानी शक्तीपिठ एकमावाद्वितीय आहे मंचकी निद्रा:- देवीची मंचकी निद्रा २१ दिवसात विभागलेली आहे सर्व प्रथम मंचक म्हणजे काय ? मंचक याचा अर्थ पलंग असा आहे. देवी भवानीची निद्रा तीन प्रकारात विभागली आहे ती अशी👇🏼 १)घोर निद्रा :- नवरात्रीच्या आधी देवी योगनिद्रेत होती म्हणजे महिषासुराशी युध्द करण्यापूर्वीदेवी ही निद्रा घेत होती पण महिषासुराचे देवतांवरचे वाढते अत्याचार पाहून ब्रह्म-विष्णू आणि महेश देवीला आठ दिवसानंतर योग निद्रेतून उठवून देवदेवतांचे रक्षण करण्याची विनवणी करतात.या निद्रेतून जागी होऊन देवीने घोर रूप प्रकट केले या मुळे या निद्रेस घोर निद्रा म्हणतात. २)श्रम निद्रा : घोर निद्रेतुन जागी होऊन देवीने महिषासुराचे चाललेले अधर्म कारस्थान पाहून युद्धास तयार झाली नऊ दिवस आसुरांसोबत युध्द केले. नवव्या दिवशी आसूर शरण आला देवीच