* *आई तुळजाभवानी..... !*
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आदिशक्ती ही वर्षातून २१ दिवस निद्रा घेते. उरलेले ३४४ दिवस देवी अष्टौप्रहर जाग्रृत असते. निद्रा समयी देवीला १०८ साड्यांचे वेष्टन (दंड नेसवने)केले जाते व विधिवत् पलंगावर निद्रेसाठी ठेवले जाते.
असे असणारे तुळजाभवानी शक्तीपिठ एकमावाद्वितीय आहे
मंचकी निद्रा:-
देवीची मंचकी निद्रा २१ दिवसात विभागलेली आहे
सर्व प्रथम मंचक म्हणजे काय ?
मंचक याचा अर्थ पलंग असा आहे.
देवी भवानीची निद्रा तीन प्रकारात विभागली आहे ती अशी👇🏼
१)घोर निद्रा :-
नवरात्रीच्या आधी देवी योगनिद्रेत होती म्हणजे महिषासुराशी युध्द करण्यापूर्वीदेवी ही निद्रा घेत होती पण महिषासुराचे देवतांवरचे वाढते अत्याचार पाहून ब्रह्म-विष्णू आणि महेश देवीला आठ दिवसानंतर योग निद्रेतून उठवून देवदेवतांचे रक्षण करण्याची विनवणी करतात.या निद्रेतून जागी होऊन देवीने घोर रूप प्रकट केले या मुळे या निद्रेस घोर निद्रा म्हणतात.
२)श्रम निद्रा :
घोर निद्रेतुन जागी होऊन देवीने महिषासुराचे चाललेले अधर्म कारस्थान पाहून युद्धास तयार झाली नऊ दिवस आसुरांसोबत युध्द केले. नवव्या दिवशी आसूर शरण आला देवीच्या चरणी स्थान मागून देवतांची माफी मागितली. यावेळी नऊदिवस युध्दामुळे देवीला थकवा आल्याने शारदिय नवरात्रा नंतर पाच दिवसाची निद्रा घेते यालाच श्रमनिद्रा असे म्हणतात. या निद्रे साठी तुळजाभवानी चे माहेर अहमदनगराहुन पलंग येतो त्यावर आईसाहेब निद्रा घेतात या निद्रेस मंचकी निद्रा म्हणतात.
३)मोह निद्रा:-
शाकंभरी नवरात्रीच्या दरम्यान पौष शुद्ध प्रथमा ते अष्टमी काळात देवी निद्रिस्त असते.देवीची मोह निद्रा हे स्रृजनाचे प्रतिक असुन ८ दिवस हे निद्रा काळाचे संपल्या नंतर नवमी म्हणजे तुळजाभवानी प्रकट दिवस किंवा जन्म दिवस असतो
त्या मुळे या निद्रेस मोह निद्रा म्हणतात हे नऊ दिवस म्हणजे नऊ महिन्यांचे सुचक आहेत जसे नऊ महिन्यांनी स्रृजन होते तसाच हा कालावधी असतो.देवी शारदिय अश्विन नवरात्रा आधी आठ दिवस चांदीच्या मंचकावर निद्रा घेते.शारदिय अश्विन नवरात्रानंतर पाच दिवस माहेरच्या चंदनाच्या पलंगावर विश्रांती निद्रा घेतेआणी शाकंभरी पौष नवरात्री दरम्यान देवी आठ दिवस चांदीच्या मंचका वर निद्रा घेते.
अशा अवघ्या विश्वाचा भार सोसुन विसावा घेण्यासाठी आई गादीवर असते म्हणुन तमाम देवी भक्त तथा देवीचे आराधी देवी मातेश्वरीच्या या निद्राकालात गादी ,उशी, तक्क्या यांचा त्याग करतात.उपवास धरतात.
अशा माझ्या माय भवानीचा महीमा अगाध अन् अनंत आहे.
सदानंदीचा उधे उधे ........👏🏻🔱
( *काॅपी पेस्ट पोस्ट !* )
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Comments
Post a Comment