Skip to main content

Posts

Showing posts from October 15, 2020

भोंडला

भोंडला-एक आठवण ©®  माधवी समीर जोशी, ठाणे नवरात्र जवळ आले की  वेध लागतात ते भोंडल्यांचे. मागच्या वर्षी एका सामुदायिक भोंडल्याला गेले होते . भल्यामोठ्या मैदानात भोंडल्यांचे आयोजित केला होता. तिथे  नटुनथटून बायका जास्त करुन आज्यांचीच गर्दी होती.काही बरोबर आपल्या सुना आणि नातीना घेऊन आल्या होत्या.भोंडल्याची गाणी ध्वनीमुद्रित लावली होती, फेर धरला होता.सगळं कसं छान होतं पण काहीतरी हरवून गेले आहे असे वाटलं त्यात काय नव्हते ते आपलेपणा. भोंडला हा पश्चिम महाराष्ट्रात व कोकणात प्रचलित असलेला स्त्रियांच्या सामुदायिक खेळाचा प्रकार आहे. नवरात्रीचे नऊ दिवस आणि दसऱ्याच्या दिवशी हा खेळला जातो.घटस्थापनेच्या दिवसापासून संध्याकाळी अंगणात भोंडला खेळला जातो.नवरात्रीच्या नऊ दिवसात हस्त नक्षत्राचे प्रतीक असलेल्या हत्तीची प्रतिमा काढून मधोमध ठेवली जाते आणि तिच्याभोवती मुली फेर धरतात. पृथ्वीच्या सुफलीकरणाचा हा उत्सव मानला जातो म्हणून याचे महत्व विशेष आहे. बहु उंडल असा याचा अपभ्रंश आहे असेही मानले जाते.* हत्ती हा समृद्धीचे प्रतीक मानला जातो .याच भोंडल्याचे स्वरूप हादगा, भुलाबाई असे प्रदेशानुसार बदल...