Skip to main content

Posts

Showing posts from May 4, 2016

जेवणावळ कशी असावी - गदिमांची जबरदस्त वर्णन

जेवणावळ कशी असावी याचे जबरदस्त वर्णन गदिमांनी आपल्या या कवितेत केले आहे. हे वर्णन वाचताना वाढलेले भरगच्च घमघमीत पान जर तुमच्या डोळ्या समोर नाही आले तरंच नवल...! काय वाढले पानावरती..! काय वाढले पानावरती, ऐकून घ्यावा थाट संप्रती, धवल लवण हे पुढे वाढले, मेतकूट मग पिवळे सजले आले लोणचे बहु मुरलेले, आणि लिंबू रसरसलेले, किसून आवळे मधुर केले, कृष्णा काठचे वांगे आणले, खमंग त्याचे भरित केले, निरनिराळे चटके नटले, चटण्यांचे बहु नवे मासले, संमेलनची त्यांचे भरले, मिरची खोबरे ती सह ओले, तीळ भाजूनी त्यात वाटले, कवठ गुळाचे मिलन झाले, पंचामृत त्या जवळी आले, वास तयांचे हवेत भरले, अंतरी अण्णा अधीर जाहले! भिजल्या डाळी नंतर आल्या, काही वाटल्या काही मोकळ्या, काही वाटुन सुरेख तळल्या, कोशिंबिरी च्या ओळी जमल्या, शुभ्र काकड्या होत्या किसल्या, मुळा कोवळा मिरच्या ओल्या, केळी कापून चकल्या केल्या, चिरुन पेरुच्या फोडी सजल्या, एकरूप त्या दह्यात झाल्या, भाज्या आल्या आळू-घोसाळी, रान कारली वांगी काळी, सुरण तोंडली आणि पडवळी, चुका चाकवत मेथी कवळी, चंदन बटवा भेंडी कवळी, फणस कोवळा हिरवी

नात्यांची सुंदर व्याख्या

नात्यांची सुंदर व्याख्या काही नाती म्हणजे जणू धुंद मोगरा पानोपानी फुलुन येई येता चैत्र साजरा काही नाती म्हणजे जणू टपोरा गुलाबच भाव खाऊन जातात प्रत्येक वेळेसच काही नाती म्हणजे सोनचाफा अन् नागचाफा नाजुक पणे अलगद त्यांना गुंफा काही नाती म्हणजे भरभरून फुलणारी बकुळ पुन्हा नव्याने मनाला घालती भुरळ काही नाती म्हणजे जाई जुई चमेली इवलेसे क्षण जपताना होती नवनवेली काही नाती म्हणजे सदाफुली अन् अबोली समजेना मनस्वी त्यांची देहबोली काही नाती म्हणजे जर्द पिवळी शेवंती समर्पणाचे भाव तेथे असती काही नाती म्हणजे गणेश प्रिय जास्वंदी अस्तित्वात त्यांच्या होती चित्तवृत्ती आनंदी काही नाती म्हणजे फुललेले निशिगंध मनात सदैव असे त्यांचा गंध काही नाती म्हणजे मोहरलेली रातराणी प्रसन्न करती त्यांच्या मुग्ध आठवणी काही नाती म्हणजे कोरांटी काटेरी सल सदैव रूते त्यांच्या अंतरी काही नाती म्हणजे रानफुले ज्यांना नसे सुवास परंतु हृदयी त्यांचा राहे अखंड वास काही नाती म्हणजे चिखलातिल कमळ बिकट परिस्थितीत देई जगण्याला बळ काही नाती म्हणून स्वर्गीय पारिजातक त्यांच्या सवे जगताना लाभे अतुल्य सुख असे ना

गमतीशीर पुणेरी उखाणे

 😜😜 पुणेरी उखाणे😂 श्रावणात बरसती रिमझिम धारा, मी पिते कॉफी, हे घालतात वारा. ******😂 एका हातात पिशवी, एका हातात रुमाल, नवरा बरोबर असताना, हवा कशाला हमाल? ******😜 बशीत बशी, बशीत बशी माझी बायको उर्वशी, बाकी सगळ्या म्हशी. ******😜 इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले ग पाय, अजुन आले नाहीत, पिऊन पडले की काय? ******😄 खोक्यात खोका टि.व्ही.चा खोका, मी तुझी मांजर, तु माझा बोका. ******😜 विड्याच्या पानावर पाव शेर कात, गणपतरावांच्या कमरेत घातली गाढवाने लात. *****😄 अगाध असते देवाची करणी, निर्मितो नारळात पाणी, शेजारी चवळीची शेंग, मला मात्र "लोणच्याची बरणी". ******😄 गुलाबाचं फूल वार्‍याने हळूहळू उकललं, गेले कचरा टाकायला, त्यांना डुकराने ढकलल. 😛😄😜😂 Source: Unknown

टाईमपास साठी आयुष्य नाही

सैराट सुटलेल्या पिढीला गरज आहे संस्काराची टाईमपास साठी आयुष्य नाही हे कान धरून सांगायची बालक पालकच जेव्हा नको ते पाहतात अभिव्यक्तीच्या नावाखाली मूल्ये पायदळी तुडवतात आयुष्याचा सिनेमा होतोय ध्यानी कुणी घेत नाही पुरस्काराच्या लेबलवर सार काही खपून जाई तुमचा होतो खेळ पण आमचा जीव जातो मिसरूड फुटण्याआधी पोरगा जीव देतो क्रांतिगीते ज्यांनी गावीत ती झिंगाटवर नाचतात देशासाठी ज्यांनी मरावं ती पोरीवर मरतात नवसाच्या लेकी फँड्री मागे उधळतात माकडाच्या  हाती मोती अलगद लागतात प्रेम हेच जगणं प्रेम हेच मरणं प्रेमासाठी आईबापाचं तोंड काळ करणं म्हणे आम्ही सुधारलो संगणक युगात आलो कमरेचे सोडून डोक्याला हेच सांगू लागलो आग लागली दुसरीकडे या भ्रमात राहू नका घरातल्या तरूणाईकडे दुर्लक्ष मात्र करू नका ज्या त्या वयात हे सार शोभून दिसतं आजकाल मात्र कळीआधीच फूल उमलतं आपल्या संस्कृतीचे ठेवा जरा भान उगाचच सैराटच उठवू नका रान कवी- संजय तांबे पाटील औरंगाबाद.