Skip to main content

Posts

Showing posts from April 11, 2017

मैत्री

Shubhangi: 💛 मैत्री.... चालता चालता अलगद हात हाती यावा ... हसण्यात अश्रू विरून जावा अशी मैत्री असावी. मनमोकळेपणाने बोलता यावं, वेळेचंही भान नसावं अशी मैत्री असावी. थकल्यानंतर झाडाखाली बसावं अन् ...  न सांगताही मनातलं ओळखावं ... अशी मैत्री असावी. दोन घडी भेट झाली नाही तर चुटपुट लागावी.... भेटल्यावर मात्र भडाभडा बोलावं... अशी छान मैत्री असावी. एकाचं दु:ख दुसर्‍याला कळावं अन्  आठवण होताच हलकं स्मित झळकावं अशी मैत्री असावी. न रुसवा, ना अबोला,  ना ईर्षा, ना बढाया, ना भूलथापा, ना अविश्वास, फक्त आनंदच वाटावा... 💛मैत्री अशी असावी...♥  Ajay : 🛎🛎🛎🛎🛎🛎🛎🛎🛎🛎🛎 🌹🍃 सेतु बांधण्याचे कार्य चालू असताना हनुमान  प्रत्येक दगडावर राम लिहित असे  आणि  तो दगड पाण्यावर तरंगत असे.  हे पाहून भगवान श्रीरामांनी एक दगड उचलला  आणि  पाण्यात टाकला.  तो बुड़ाला व तळाशी गेला.  प्रभु रामचंद्राना आश्चर्य वाटले.  ते म्हणाले, "तुम्ही दगड फेकला तर तो तरंगतो,  मी फेकला तर कसा काय बुडतो?"    हनुमान ह्यावर सुंदर उत्तर देतो, "प्रभु,  ज्याच्या आयुष्यात तुम्ही आलात तो(दगड)सुदधा तरला.  जो तुमच्या हातून सुटल...

ओव्हरड्राफ्ट

लघुकथा..... Author Unknown. "ओव्हरड्राफ्ट....." रोजच्यासारखी बिनगजराची पाच वाजता जाग आल्याने दातार मास्तर अंथरुणात उठून बसले. यंत्रासारखे हाताचे तळवे चेह-यापुढे आले आणि ते कराग्रे वसते लक्ष्मी…. म्हणायला लागले. काय करायचंय एवढ्या लवकर उठून? असं रोजच्यासारखं म्हणत ते चटकन उठले. पांघरुणाची घडी, चादर इस्त्री केल्यासारखी नीटनेटकी करून उशाशी असलेल्या तांब्यातलं उरलेलं पाणी त्यांनी पिऊन टाकलं आणि ते आवरायला लागले. सत्तरी ओलांडलेले मास्तर अजून वेतासारखे सरळ होते. सहा फुटांची सणसणीत उंची, रापलेला गोरा वर्ण, भेद घेणारे पिंगट डोळे, डोक्यावर पांढऱ्या केसांची झालर आणि खर्जातला आवाज म्हणजे दातार मास्तर. आजचा दिवस त्यांच्यासाठी विशेष होता. ह्या दिवसाला ते स्मरणयात्रा म्हणायचे. आनंदीला - त्यांची बायको - जाऊन आज दहा वर्ष झाली. मास्तर मोत्यासारख्या अक्षरात रोजनिशी लिहायचे. आज सगळ्या रोजनिश्या काढून ते बसायचे. काही ठिकाणी त्यांनी खुणेचे कागद ठेवले होते. तेवढंच ते आज वाचायचे. चटचट आवरून त्यांनी दुधाचा फक्कड चहा केला आणि कप घेऊन ते आरामखुर्चीत येउन बसले. कोकणातली सकाळ सुखासारखी असते, कमी काळ टिक...