Skip to main content

Posts

Showing posts from April 28, 2017

पाणी

*मराठी भाषेची सुंदरता* *खालील कवितेत २६ वेळा पाणी शब्द आला आहे व वैशिष्ट्य असे, की प्रत्येक वेळी पाणी या शब्दाचे विविध अर्थ उलगडतात..!  ही आहे मराठी भाषेची श्रीमंती..!*  *रंग पाण्याचे*  *'पाणी'* शब्द हा असे प्रवाही, वळवू तिकडे वळतो हा.. जशी भावना मनात असते, रूप बदलते कसे पहा..! नयनामध्ये येता  *'पाणी'* अश्रू तयाला म्हणती, कधी सुखाचे, कधी दुःखाचे, अशी तयांची महती..! चटकदार तो पदार्थ दिसता, तोंडाला या *'पाणी'* सुटते, खाता खाता ठसका लागून डोळ्यांतून मग *'पाणी'* येते..! धनाढ्याघरी लक्ष्मी देवी, म्हणती अविरत भरते  *'पाणी'*.. ताकदीहूनी वित्त खर्चिता डोक्यावरूनी जाते  *'पाणी'* ..! "वळणाचे *'पाणी'* वळणावरती" म्हण मराठी एक असे, "बारा गांवचे *'पाणी'* प्यालाय" चतुराई यातूनी दिसे..! लाथ मारूनी *'पाणी'* काढणे, लक्षण हे तर कर्तृत्वाचे, मेहनतीवर *'पाणी'* पडणे चीज न होणे कष्टाचे..! उत्कर्ष दुज्याचा मनी डाचतो, *'पाण्या'*त पाहणे गुण खोटा..    *'पाणी'*दार ते नेत्र सांगती, विद्वत्तेचा गुण मो...