Skip to main content

Posts

Showing posts from July 31, 2020

विड्याचे पान

🚩💚शुभकार्यात का महत्वाचे मानले जाते विड्याचे पान💚🚩 घरात कोणतेही शुभकार्य असेल तर पहिला उल्लेख केला जातो तो विड्याच्या पानाचा. घरात पूजा किंवा लग्न, साखरपुडा यांसारखे शुभकार्य असेल तर अनेकदा भटजीबुवा पहिला प्रश्न विचारतात विड्याची पाने कुठे आहेत?  या विड्याच्या पानाला केवळ महाराष्ट्रीय लोकांमध्येही नाही तर इतर धर्मांतील लोकांमध्ये विड्याला महत्व आहे.  बंगाली लोकांमध्ये लग्नाला नवरीच्या तोंडासमोर विड्याचे घेऊन मंडपात आणले जाते तर तेलुगु, बिहारी, पंजाबी या सर्व धर्मांमध्ये विड्याचे पान आणि सुपारी देऊन लग्नाची बोलणी करतात किंवा शुभकार्याला सुरुवात करतात.   मात्र आपल्यापैकी कित्येकांना हे विड्याचे पान का वापरले जाते असे विचारले तर कोणी ठामपणे सांगू शकणार नाही. 💚🚩विड्याच्या पानामागची धार्मिक कथा:🚩💚 समुद्रमंथनातून अमृत निघाल्यावर भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केले. त्यात थोडे अमृत शिल्लक राहिले. त्यावेळी मोहिनीने उरलेले अमृत जवळच उभ्या असलेल्या नागराज नावांच्या हत्तींच्या खुंटाजवळ नेऊन ठेवले. थोड्या दिवसांनी त्या अमृतामधून वेल उगवली. ही वेल नागाप...