Skip to main content

Posts

Showing posts from April 10, 2017

गच्ची

08/04/17, 7:06 PM - Messages you send to this group are now secured with end-to-end encryption. Tap for more info. 09/04/17, 1:35 AM - Suhas Dhamorikar: " गच्ची ... ..!! हा जगण्यातला एक अद्भभूत, अविभाज्य घटक होता, ही तेव्हाची गोष्ट! उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की तिचं महत्त्व जरा जास्तच जाणवू लागायचं. सुट्या आवडण्यामागे तिचा नकळतच मोठा वाटा होता. आई - आजी- काकू - मामींना वाळवणीचे पदार्थ करण्याची आवर्जून लहर यायची, मग अगदी बटाट्याच्या वेफर्सपासून, कुरडई, खारोड्या, साबुदाण्याचे पापड, उडदीचे पापड अशा अनेक प्रकारासाठी गच्ची खुली व्हायची.. आणि पदार्थ राखायला आम्हा कच्चे- बच्च्यांची नेमणूक व्हायची. 'तळे राखी तो पाणी चाखीच' ह्या वैश्विक नियमानुसार वाळवणीवर टाकलेली साडी एकसारखी करण्याच्या निमित्ताने कच्चे वेफर्स, खारोड्या गट्ट्म करण्याची आणि खाली उतरून आल्यावर एकमेकांची कागाळी करण्याची संधी कोणी म्हणून हुकवायचा नाही. पुढचे ४-५ दिवस पदार्थ कडकडीत वाळेस्तोवर ही सगळी धमाल चालायची. याशिवाय, आपल्याघरी हे पदार्थ करताना एखादी शेजारीण मदतीसाठी आवर्जून असायची, मग तिच्याकडे पदार्थ करण्य...