Skip to main content

Posts

Showing posts from June 18, 2020

हेमंत कुमार~ गायक, संगीतकार

*"याद किया दिल ने कहाँ हो तुम "- हेमंतकुमार* " हेमंत दा जब गाते हैं , ऐसा लगता है कोई साधू मंदिर में गा रहा हो " … असे यथार्थ उद्गार गानसम्राज्ञी लता मंगेशकरने हेमंतकुमार बद्दल काढलेले आहेत . तर प्रख्यात संगीतकार सलील चौधरींच्या मते देव जर कधी गायलाच तर त्याचा आवाज हेमंतकुमार सारखाच असेल . इथे मला वरचा आभाळातला देव म्हणायचाय हां . हो कारण आपल्या जमिनीवरच्या देवने (आपला देव आनंद हो)  तर आधीच पडद्यावर हेमंतकुमारच्या आवाजातली कित्येक गाणी अजरामर करून ठेवलीच आहेत .  तर आजच्याच दिवशी १६ जून ला १९२० साली महान गायक हेमंतकुमार मुखोपाध्याय (मुखर्जी) यांचा वाराणसी इथे जन्म झाला . म्हणजेच २०२० हे सुरु असलेलं साल हेमंतकुमारचं जन्मशताब्दी साल आहे .  संगीतकार अनिल बिस्वास , एस डी बर्मन , सलील चौधरी यांच्या प्रमाणेच हेमंतकुमारच्या संगीतावर देखील बंगालच्या रविंद्र संगीताचा प्रभाव पडलेला जाणवतो . हेमंतदांच्या संगीतात पूर्व भारतातील लोकसंगीत आणि शास्त्रीयसंगीताचा सुरेख मेळ आढळतो .   १९३५ साली वयाच्या पंधराव्या वर्षी All India Radio मध्ये हेमंतकुमारने आपलं पहिलं गाणं रेकॉर्ड केलं आणि ...