Skip to main content

Posts

Showing posts with the label कविता

हरकत

अत्यंत सुंदर कविता आहे पण निनावी फिरत आहे. कोणाची आहे हे माहीत नाही. *हरकत* मी विसळत होते उष्टी भांडी.. जेव्हा तू बोलत होतास,  परिसंवादात 'स्त्री'च्या श्रमप्रतिष्ठेवर.. कुण्या एकीच्या तरी कष्टाची होईल किंमत म्हणून म्हंटल,  "हरकत नाही" मला रडवत होता तुझा अबोला, जेव्हा प्रकाशित होतं होत  'स्त्री-पुरुष संवादावर'तुझं पुस्तक.. कुणा एका नात्यात तरी बोलका होईल वाद म्हणून म्हंटल, "हरकत नाही" मला वेध लागले होते शृंगाराचे, जेव्हा तू देत होतास बौद्धिक 'स्त्रीच्या भावनांची'व्हावी कदर.. कुण्यातरी 'ती'च्या तरी नजरेला मिळेल होकार म्हणून म्हंटल, "हरकत नाही" धूळ खात होत्या माझ्या पदव्या, जेव्हा तू अभिमानाने वाचली बातमी  'अर्थशास्त्रातल्या स्त्री'च्या योगदानाची.. एकीच्यातरी प्रमाणपत्राला मिळेल रोजगार म्हणून म्हंटल, "हरकत नाही" मी घेतंच होते गोळ्यांवर गोळ्या, जेव्हा तू आग्रही राहिलास तुझ्या बहिणीने दोघींवरच थांबावं.. त्यांच्या तरी वाट्याला येऊ नये माझ्या कळा म्हणून म्हंटल, "हरकत नाही" मी घरात होत गेले बंदिस्त, जेव्ह...