Skip to main content

Posts

Showing posts from August 20, 2020

स्वप्नाली सुतार.कणकवली

स्वतःला आत्मनिर्भर, कणखर आणि शक्तिशाली बनवायचं असेल तर अभ्यासाबरोबरच महत्वकांक्षा, परिश्रम आणि प्रयत्न आवश्यक आहेत......हे लिहिण्याचं कारण म्हणजे छायाचित्रातील ही स्वप्नाली सुतार.कणकवली तालुक्यातील दुर्गम अशा दारीस्ते गावातील ही युवती. अभ्यासात भयंकर हुशार....दहावीत 98 टक्के तर बारावीत कॉलेज मध्ये प्रथम आलेली.डॉक्टर व्हायची इच्छा.... पण परिस्थिती आडवी आली.आई वडील शेतकरी,एवढा खर्च पेलवणारा नव्हता.म्हणून मुंबईला पशु वैद्यकीय अधिकारी होण्याचं शिक्षण घेत होती.लॉकडाऊन मध्ये गावात अडकली.... आणि तिकडे ऑनलाइन लेक्चर सुरू झाले.गावातील घराकडे फोन येण्याचं नेटवर्क मिळताना मारामारी तिथे इंटरनेट कुठून असणार..?परत अँड्रॉइड मोबाईलचा ही प्रश्न होताच.मोठ्या भावाने आपला मोबाईल दिला.....त्याचा मोबाईल घेऊन कुठे नेट मिळते यासाठी फिरत असताना डोंगरात नेट मिळालं.उन्हाळयात दिवसभर डोंगरावर झाडाखाली उभं राहून शिक्षण घेत होती.सकाळी 7 ला घरातून जाते ती सायंकाळी 7 च्या आसपास येते.अख्खा दिवस डोंगरातील त्या झोपडीतच जातो.....पुन्हा प्रॉब्लेम आला तो चार्जिंगचा.कुठल्यातरी मॅडमनी पॉवर बँक दिली.पावसाळा सुरू झा