Skip to main content

Posts

Showing posts from March 20, 2017

आयुष्य अजिबात कठिण नसतं

18/03/17, 8:32 AM - Swati Gokhale: निवांत झाल्यावर नक्की वाचा...🙂🙂🙂 आयुष्य कठीण अजिबात नसतं . . कधी नळाला पाणी नसतं... कधी पाणी असून घोटभर देणारं कुणी नसतं... कधी पगार झालेला नसतो . . कधी झालेला पगार उरलेला नसतो . . कधी मिळवलेला पगार कोणावर खर्च करायचा ? प्रश्न सुटलेला नसतो . . कधी जागा नसते . . कधी जागा असून स्पेस नसते . . कधी जागा आणि स्पेस दोन्ही असली तरी त्यात नात्याची उब नसते . . कधी डब्यात आवडती भाजी नसते . . कधी भाजी आवडली तर पोळीच करपलेली असते . . दोन्हीही मनासारख्या असल्या तरी शेजारच्या डब्यातून येणाऱ्या खमंग वासात आपली इच्छा अडकलेली असते . . कधी कोणी सोबत असून एकटेपणा असतो . . कधी कोणी सोबत नसतानाही उगाच भरल्या -भारावल्या सारखे वाटते . . कधी काही शब्द कानावर पडतात . . कधी नको ते शब्द कानावर आदळतात . . कधी हव्या असलेल्या माणसांकडून नको ते आणि नको असलेल्या माणसांकडून अनपेक्षित अनुभव येतात . . कधी आपण कसे वागायचे समजत नाही . . कधी समोरचा असा का वागतोय याचे उत्तर मिळत नाही . . कधी दोष कोणाला द्यायचा समजत नाही . . कधी आभार कोणाचे मानायचे उमजत नाही . . कधी डोकं ...