Skip to main content

Posts

Showing posts from July 26, 2017

जंगल पेरले

कोणी गच्चीत फळे, भाज्या लावून मळा करतात. कोणी अंगणात छानशी बाग करतात. पण, श्री. व सौ. नारगोळकरांनी चक्क जंगल लावले! पुण्यापासून अगदी जवळ असलेल्या खडकवासला येथे २० एकर जमिनीवर चक्क जंगल पेरले! भारतभर अनेक वनात फिरलेले प्रमोद नारगोळकर, यांनी एकदा मनात घेतले, आपणच वन का तयार करू नये? लवकरच खडकवासला येथे जमीन घेतली. पुढे जमेल तसे आणि जमेल तेंव्हा जवळपासची जागा घेत राहिले. देशभरातून विविध झाडांची रोपे आणून येथे वृक्षारोपण केले. आसाम, हिमाचल, आंदमान, श्रीलंका, आफ्रिका अशी ठिकठिकाणहून ५०० हून अधिक प्रकारचे वृक्ष त्यांनी सिपना वनराईमध्ये लावले. सिपना वनराईमध्ये वृक्षांचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. या मध्ये एक कमंडलू वृक्ष पहिला. याचे फळ अर्धे कापून आतला गर काढला की त्याचे टणक कवच वाडग्यासारखे वापरता येते, म्हणून त्याचे नाव कमंडलू. आणि एक ब्रह्मदंड वृक्ष. याच्या लाकडापासून दंड-कमंडलू या जोडीतला दंड तयार केला जातो. तसेच कृष्णवड, मुचकुंद, अर्जुन, कुंभ, रुद्राक्ष, ताम्हण, चंदन, कदंब, समुद्रफळ, रिठा, कवठ, काटेसावर, नागचाफा, सीताशोक, पांगर, पळस, आंबा, फणस, चिंच, वड, जायफळ, निरगुडी, तुती, बहावा, गुल...