Skip to main content

Posts

Showing posts from September 7, 2020

गोविंद विडा

।। गोविंद विडा ।। आज महालक्ष्म्या  जेवल्या , या जेवणाचं साग्रसंगीत वर्णन आपणनेहमीच वाचतो , या जेवणाचं जेवढं वैशिष्ट्य आहे तितकंच  विड्याचं देखील आहे. हे विडे नेमके कसे तयार करतात ? यासंबंधी व्हिडीओ तयार करण्याचं मी माझे मित्र विवेक पारगावकर यांना मागच्या वर्षी सुचवले होते.त्यांचे वडील चंद्रकांतराव पारगावकर हे आजही वयाच्या पंच्याहत्तरीत देखील उत्साहाने महालक्ष्मी पूजनासाठी गोविंद विडे,कुलूप विडे,खण विडे तयार करतात,तेही कुशलतेने.यंदा त्यांनी त्यांच्या नातीला ही विडे तयार करण्याची कला शिकवली.चंद्रकांतराव पारगावकर म्हणजे रसिक माणूस, धुंडिराज पाटांगणकर महाराज, जेष्ठ विधिज्ञ कालिदासराव थिगळे यांचे परममित्र,लोक यांच्या मैत्रीचा नेहमी गौरव करतात . या अशा लोप पावत चाललेल्या कला पुढेही सुरू राहाव्यात या हेतूने पारगावकर यांनी हा व्हिडीओ तयार केलाय,जो नक्कीच मार्गदर्शक ठरेल. -- महेश वाघमारे, बीड    बुधवार    दि 26 ऑगस्ट 2020.