Skip to main content

Posts

Showing posts from March 15, 2017

π Day

14/03/17, 1:16 PM - Ravindra Chandorkar: आज π दिवस च्या निमित्ताने... || भारत आणि पाय (π) || अंदाजे ६०० इ.पु. मध्ये "शुल्बसूत्र" मध्ये पाय ची व्याख्या (९७८५/५५६८)^२ ≈ ३.०८८ अशी दिलेली सापडते. १५० इ.पु. किंवा त्या आधी पाय ची व्याख्या १० चा वर्गमूळ ≈ ३.१६२२ अशी सापडते. ४९९ इ.स. मध्ये आर्यभट्ट यांनी π साठी ३.१४१६ वापरल्याचा पुरावा आहे. हेच आपण सध्या शाळेत वापरतो. π ची सर्वात गंमतीशीर गोष्ट अशी की याचे आकडे अनंत आहेत. यालाच आपण Infinite series असे म्हणतो. पण या Infinite series चा पहिला वापर सुद्धा भारतातच झालेला आहे. केरळचे नीलकंठ सोमयाजी (१४४४ - १५४४) या शतायुषी गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञाने आपल्या "तंत्रसंग्रह" या ग्रंथात हे Infinite series मांडले आहेत. यालाच गणिताच्या विश्वात "माधव सीरीज" (Madhav Series) म्हणून ओळखतात. हे नाव संगमग्रामचे माधव (१३४० - १४२५) यांच्या आदरार्थ ठेवले गेलेल आहे. यांनी आपल्या अभ्यासात ११ आकड्यांपर्यंत π चे मूल्य मांडले होते. पुढे "युक्तीभाषा" या १५३० च्या ग्रंथात "माधव सीरीज" चे सखोल भाष्य सापडते. ...