14/03/17, 1:16 PM - Ravindra Chandorkar:
आज π दिवस च्या निमित्ताने...
|| भारत आणि पाय (π) ||
अंदाजे ६०० इ.पु. मध्ये "शुल्बसूत्र" मध्ये पाय ची व्याख्या (९७८५/५५६८)^२ ≈ ३.०८८ अशी दिलेली सापडते. १५० इ.पु. किंवा त्या आधी पाय ची व्याख्या १० चा वर्गमूळ ≈ ३.१६२२ अशी सापडते.
४९९ इ.स. मध्ये आर्यभट्ट यांनी π साठी ३.१४१६ वापरल्याचा पुरावा आहे. हेच आपण सध्या शाळेत वापरतो.
π ची सर्वात गंमतीशीर गोष्ट अशी की याचे आकडे अनंत आहेत. यालाच आपण Infinite series असे म्हणतो. पण या Infinite series चा पहिला वापर सुद्धा भारतातच झालेला आहे.
केरळचे नीलकंठ सोमयाजी (१४४४ - १५४४) या शतायुषी गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञाने आपल्या "तंत्रसंग्रह" या ग्रंथात हे Infinite series मांडले आहेत. यालाच गणिताच्या विश्वात "माधव सीरीज" (Madhav Series) म्हणून ओळखतात. हे नाव संगमग्रामचे माधव (१३४० - १४२५) यांच्या आदरार्थ ठेवले गेलेल आहे. यांनी आपल्या अभ्यासात ११ आकड्यांपर्यंत π चे मूल्य मांडले होते.
पुढे "युक्तीभाषा" या १५३० च्या ग्रंथात "माधव सीरीज" चे सखोल भाष्य सापडते.
शेवटी भारताचे गणित शिरोमणी श्रीनिवास रामनुजन यांनी पाय चे मूल्य शोधण्याचे तब्बल ३० जलद सूत्रांचा शोध लावला. यामुळेच आज आधुनिक गणिताच्या क्षेत्रात झालेल्या प्रगतीचा पाया रामनुजन यांनी रचलेला आहे.
========= π दिवस ===========
"१४ मार्च" हे अमेरिकन पद्धतीत ३/१४ असे लिहिले जाते. π चे पहिले ३ आकडे ३.१४ असे आहेत. यामुळे १४ मार्च हा π डे म्हणून साजरा केला जातो.
तसेच १४ मार्च रोजी अॅल्बर्ट आइन्स्टाइन यांची जयंती सुद्धा असते.
Messages circulated on WhatsApp.
Comments
Post a Comment