Skip to main content

Posts

Showing posts from June 10, 2017

*रामरक्षेची उत्पत्ती*

रामरक्षेची कथा अशी सांगितली जाते की, "एकदा माता पार्वतीने शंकारांस विचारले जसे विष्णुसहस्त्र नामावली आहे तसेच रामाचे एखादे स्तोत्र नाही का ? "तेव्हा भगवान शंकरांनी माता पार्वतीस या 'रामरक्षा' स्तोत्रविषयी सांगितले. पण मुळात रामरक्षेची निर्मिती कशी झाली त्याला एक कथा आहे. ती अशी की, आद्यकवी वाल्मिकींनी रामायणाची निर्मिती केली. १०० कोटी श्लोक असलेले हे रामायण सर्वांनाच मिळवावेसे वाटू लागले. देव, मानव आणि दानव भगवान शंकरांकडे ते प्राप्त करण्यासाठी गेले. ते कुणाला मिळावे यासाठी त्याच्यामध्ये खूप वाद झाले. शेवटी श्ंकरांनी रामायणाची सर्वांमध्ये समान वाटणी करण्याचे ठरवले. १०० ही सम संख्या असल्याने कितीही वाटणी केली तरी एक श्लोक राहिलाच. हा अनुष्टुप छंदातील असल्याने एका श्लोकात ३२ अक्षरे होते. त्याचीही वाटणी केली. शेवटी दोन अक्षरे शंकरांनी स्वत:कडे ठेवली. ते म्हणाले," ही दोन अक्षरे मी माझ्याकडेच ठेवतो " असे सांगून त्यांनी सर्वांना जाण्यास संगितले व ध्यानासाठी बसले. पण देव, दानव, मानव यांचे मन काही भरेना. शंकरांनी ती अक्षरे स्वत:जवळ ठेवून घेतली याचाच अर्थ त्यात काहीत

जगण्याचा तोल हा असा असतो !

पाऊस पडून गेला की आकाशात सुंदर इंद्रधनुष्य उमलतं ; त्याला पाहून मातीनं रुसावं का ? सगळे रंग आकाशात तसेच ठेवून आलास, मला काय दिलंस   म्हणून भांडावं का ? *** नाहीच भांडत ती , मान्य करून टाकते की , त्याचं रंगहीन होऊन आपल्याकडे येणं , उगीच मनाला लावून घ्यायचं नाही , त्या कोरडय़ा सुंदर रंगापेक्षा आपल्याला काय मिळालं हे पहायचं    ! *** तो भरभरून बरसतो, तेव्हा रंगहीन असतो हे खरं ; पण तो तिला जगण्याची,उमलण्याची ,  स्वत:तून रंग फुलवण्याची जादू देतो. त्या जादूनं , काळ्या मातीतून किती रंग उमलतात , आणि रंगच कशाला , किती गंध , किती आकार, किती प्रकारचं जगणंही बहरतं ! क्षणभर उजळणा:या रंगापेक्षा स्वत: अनेक रंगांत उमलण्याची जादू  म्हणून तर काळ्या मातीला किती युगं झाली, तरी हवीच असते त्याच्याकडून . *** जगण्याचा तोल हा असा असतो ! कुणाला क्षणभराचे रंग मिळतात , कुणाला सुंदर क्षण मिळतात , कुणाकडे जग सहज मान उंचावून पाहतं , तर कुणाला मिळतं फक्त जगण्याचं बीज . त्यातून आपापलं फुलायची जादू मात्र शिकून घ्यायची असते . एकदा ती जादू आली की , रंग कुणाकडे मागावे लागत नाहीत, ते उमलत राहतात, बहरत राहतात. *** ( एका स्पॅन