Skip to main content

Posts

Showing posts from December 8, 2020

अबय / पठारीच्या शेंगा

#अबईच्या_शेंगांची_भाजी 😋 ( अबय / पठारीच्या शेंगा) काल बाजारातल्या भाजीवाल्या मामीकडे जरा डोकावलो ... काय गो ? पालाभाजी सोडून काय हा ?? ह्या काय , करांदे कणगरा लालमाट सुरन नी अबयच्या शेंगांचो एक वाटो हा ... पाऊस जाऊन महिनो लोटलो , अजून खयची अबय ? जल्ली जगलेय एक बांदावर, पानी गावताय ना भाजीचा , फोफावलेय नुसती, देव काय ? दे वाईच, ह्या साली जाम रानभाज्या खाल्लंय, कोरोनाची कृपा ... कुसला नाव त्या कोरोनाचा, मेल्यान् नकोसा जीव केलानाय, जायचा नाव घेत नाय... जाईल गो जाईल, तो वरनं बगताय ना ... व्हय तर , ही घे अबय ... अशा नेहमीच्या संवादानंतर अबयच्या शेंगा घरी आल्या... खरं तर ही पावसाळी रानभाजी, पण पाणी मिळालं तर थंडीतही तग धरते नी पार उन्हाळ्यापर्यंत शेंगा देते... फरसबीच्या कुटुंबातली ही वेलवर्गीय वनस्पती. कोवळ्या शेंगांची सुंदर भाजी होते. शेंग मोडून चिरुन , दोर काढून शिजवायची नी मग कांद्यावर परता, पीठ पेरा, वाटण लावा नाहीतर भिजलेल्या चणाडाळीशी सूत जुळवा, अबय सगळ्यांबरोबर रमते नी उत्कृष्ट चवीची औषधी भाजी पोटात जाते ... आज कांद्यावर परतून पीठ पेरुन केलेली ही अबयची भाजी ... ©स्वानंद ज...