Skip to main content

Posts

Showing posts from March 5, 2017

फेसबुक, ट्विटर ने व्यापून टाकले आपल्याला

03/03/17, 5:18 PM - Messages you send to this group are now secured with end-to-end encryption. Tap for more info. 04/03/17, 3:45 AM - Abhay Hole SHS: रोजसारखीच सकाळ झाली ! व्हॉट्सअप तुणतुणले, न उघडताच कळले !! ग्रुप्सवर "गुड मॉर्निंग" किणकिणले !! पण, मी पाहिलं नाही ! तडक उठलो आणि... मोबाइलही नसलेल्या एका मावशीशी बोललो, वयाने थकलेल्या तिच्या थरथरत्या आवाजात मायेनं किणकिणली, "काळजी घे गं" तिला म्हटलं, डोळ्यात पाणी तरळलं का...? . कळलं नाही. फेसबुक क्लिककडे सवयीने हात गेला, फेस फिरवून मी तो दुसरीकडेच नेला. शेजारच्या काकांकडे डोकावले... त्यांचा "फेस" कित्येक दिवस पाहिला नव्हता, त्यांना तब्येत विचारली... ते शुगर आणि डॉक्टरवर अथक बोलत राहिले.. जाता जाता म्हणाले... सांभाळ रे.. किती धावपळ करतोस..! मी नकळत वाकलो... पायाला हात लावले. का...? . कळलं नाही. दिवसभर व्हॉट्सअपवर जोक्स येत राहिले, आणि .. "मस्ट शेअर पोस्ट" नी तर व्हॉट्सअप भरून वाहिले.. तरी अजिबात उघडले नाही. सकाळ संध्याकाळ, जेवलास का..., निघालास का... म्हणत माझ्या काळजीचा वसा घेतलेल्या आईला स्वत:हून...