Skip to main content

Posts

Showing posts from September 9, 2020

श्री गजानन महाराज यांची पुण्यतिथी.*८ सप्टेंबर

*आज ८ सप्टेंबर* *आज श्री गजानन महाराज यांची पुण्यतिथी.* ८ सप्टेंबर १९१० रोजी ऋषिपंचमीच्या दिवशी त्यांनी शेगाव येथे समाधी घेतली. श्री गजानन महाराजांचा जन्म कुठे व कधी झाला हे अज्ञात आहे. परंतु गजानन महाराज माघ वद्य ७ शके १८००, २३ फेब्रुवारी १८७८ या दिवशी ऐन तारुण्यात ते शेगांव जि. बुलढाणा येथे दिगंबरावस्थेत दृष्टीस पडले. त्या वेळी ते देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतील शिते उचलून खात होते. ह्या संदर्भात दासगणूंनी लिहिले आहे, “कोण हा कोठीचा काहीच कळेना। ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे। साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ती। आलीसे प्रचिती बहुतांना॥” जसा कुशल जवाहीर कोळशाच्या तुकड्यांमधून अनमोल हिरा शोधून काढतो त्याप्रमाणे बंकटलाल आगरवाल ह्याने त्यांचे महत्त्व ओळखले त्याला महाराजांचे प्रथम दर्शन झाले ते असे, – “दंड गर्दन पिळदार। भव्य छाती दृष्टी स्थिर। भृकुटी ठायी झाली असे॥” जेव्हा बंकटलालने त्यांना जेवणाविषयी विचारले त्यावेळी महाराजांनी नुसतेच शून्य दृष्टीने त्याच्याकडे पाहिल कारण महाराज त्यावेळी तुर्या* अवस्थेत होते . (तुर्या* अवस्था : जागृति म्हणजे जागे असणे, सुषुप्ति म्हणजे झोपणे आणि...