Skip to main content

Posts

Showing posts from October 31, 2020

श्राध्द आणि कावळ्यासच खाऊ घालणं

श्राध्द केले की, *कावळ्यासच का खाऊ घातले जाते...*🤔 या मागील मुख्य हेतू शास्त्रीयदृष्ट्या जाणून घेऊया. जगात प्रत्येक झाड हे प्राणवायुचे उत्सर्जन करत असते. पण केवळ वड व पिंपळ हे दोन वृक्ष इतर झाडांपेक्षा एकाच वेळी दुपटीने प्राणवायु उत्सर्जन करतात. हे सर्व शास्त्रज्ञांनी मान्य केलेले आहे. जगात सर्व झाडांची रोपे बीज प्रक्रियेद्वारा मनुष्य लाऊ शकतो परंतु फक्त वड व पिंपळ या दोनच वृक्षांची प्रत्यक्ष बीज निर्मिती नाही. या दोन्ही झाडांची कोमल अंकुर स्वरूपातील फळं जेव्हा कावळे खातात, ( बघा त्यातही म्हटले आहे केवळ *कावळेच*, इतर कोणताही पक्षी नाही.) तेव्हा त्यांच्या पोटातच ही प्रक्रिया सुरु होते आणि ते जेथे विष्ठा करतात तेथेच वड किंवा पिंपळ हे वृक्ष येतात. या कावळ्यांशिवाय ही झाडे टिकणार नाहीत व कावळ्यांचे अंडी घालणे (प्रजनन) हे भाद्रपद महिन्यातच होते. त्यामुळे त्यांना घरोघरी पोषक आहार या काळात प्रत्येकाने दिला तरच हे सृष्टीचक्र व्यवस्थित चालेल हे पूर्वीच्या संतांनी, शास्त्रकारांनी जाणले होते. आपल्या संस्कृतीतील ऋषि-मुनि हे अत्यंत बुद्धिमान आणि सखोल विद्वान होते. माणसांच्या आरोग्यासाठी ही दोन झाड