Skip to main content

Posts

Showing posts from July 2, 2020

गाय हे समर्पित हृदयाचे प्रतीक आहे

एक गाय गवत चरायला जंगलात जाते. संध्याकाळच्या वेळेस तिच्या लक्षात आले की, एक वाघ तिच्याकडे दबक्या पावलाने येत आहे. ती भीतीने इकडे तिकडे पळू लागली. वाघ सुद्धा तिच्या पाठीमागे धावू लागला. धावता धावता गाय एका तलावापाशी पोहचली आणि घाबरलेली गाय त्या तलावात शिरली.. वाघ देखील तिच्या पाठीमागे त्या तलावात शिरला. त्या दोघांनाही कळून चुकले की तलाव फारसा खोल नाही आणि त्यात पाणी सुद्धा कमी आहे ,मात्र चिखल जास्त आहे. त्या दोघांमधील अंतर तसे कमी होते परंतु ते दोघेही काही करू शकत नव्हते. गाय त्या चिखलात हळूहळू रुतायला लागली. वाघ तिच्या अगदी जवळ होता, परंतु तो सुद्धा त्यात रुतायला लागला होता. दोघेही अगदी गळ्यापर्यंत रुतलेली होती. दोघेही हलू शकत नव्हते. थोड्या वेळाने गाईने वाघाला विचारले, तुझा कोणी गुरू किंवा मालक आहे का ? वाघ घुश्यात म्हणाला , मी तर या  जंगलाचा राजा आहे;  माझा कोणी मालक नाही;  मीच ह्या जंगलाचा मालक आहे. गाय त्याला म्हणाली ,परंतु तुझी शक्ती तुला याक्षणी काहीच उपयोगाची  नाही.  वाघ गायीला म्हणाला की, तुझे हाल देखील माझ्या सारखेच आहेत की . तेव्हा गाय त्याला हसून म्हण...