Skip to main content

Posts

Showing posts with the label नारळ

नारळ..,ऋणानुबंधाचे धागे

नारळ... ...हक्कसोडपत्रावर सह्या केल्यावर अंबीने पदरानं डोळे पुसले. दोन एकराच्या तुकड्यातली चिमूटभर जमीन विकण्याशिवाय शांतारामला गत्यंतर नव्हते. अंबीचं सासर खाऊनपिऊन सुखी होतं पण भाऊ अठरा विश्वे दारिद्र्यात...भाऊ दांडेकराला जमीन विकणं क्रमप्राप्त होतं. हक्कसोडपत्रावर सही हवी अंबीची, त्याशिवाय जमीन खरिदणार नाही असा भाऊचा कडक नियम होता. आता जेमतेम दोन एकराचा विश्वंभराच्या घाटीजवळचा तुकडा शांतारामकडे उरलेला होता. हक्कसोडपत्रावर सही करताना प्रॉपर्टीतला वाटा गेल्याचं दुःखं अंबीला अजिबात नव्हतं पण माहेरच्या नात्यातला शेवटचा धागा तुटल्यासारखा झालं होतं. शांतारामची बायको पुढे आली, “अंबीवन्सं हक्कसोड झाली म्हणून नाती तुटली नाहीत हो. तुम्ही असं मनाला लावून घेऊ नका. मी बोलले यांना...पाटील मास्तरांच्या हद्दीजवळची म्हणजे तलावाशेजारची दोन नारळाची झाडं आजपासून तुमची हो... जे काही नारळ येतील वर्षाचे ते हक्काने घेत चला. आम्ही पूजेलाही त्यातला नारळ घेणार नाही बघा. शिवाय वाडी शेती तुमच्या भावाचीच आहे . कधीही या, पिकेल त्यातली मुठभर सुपारी आणि पायली दोन पायली भात मला जड नाही हो” अंबीने डोळे पुसले... आणि पु...