Skip to main content

Posts

Showing posts from January 9, 2021

पंढरपूरची_भोपळ्याची_शेती

पंढरपूरची_भोपळ्याची_शेती          सतार व तंबो‍ऱ्याची निर्मिती करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे भोपळे लागतात.‘ही दोन्ही वाद्ये तयार करण्यासाठी वापरला जाणारा भोपळा दर्जेदार असतो. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यात भीमा, चंद्रभागेच्या तीरावरच्या वाळवंटी जमिनीत पिकवले जातात. हे भोपळे चवीला अत्यंत कडू असतात. नदीच्या काठावर काही मोजक्या गावांमध्ये या भोपळ्याचे पीक घेतले जाते. तेथील विशिष्ट हवामान, माती यामुळे हे भोपळे वजनाने हलके आणि बाहेरून टणक तयार होतात. त्यामुळे त्यातून मधुर सूर निर्माण होतो.         भोपळ्याच्या एका बीपासून सतारीपर्यंतचा प्रवास खूपच दिलचस्प असाच म्हणावा लागेल. सतारीसाठी जो भोपळा वापरला जातो तो मूळचा आफ्रिकेतला. आफ्रिकेतल्या आदिवासी जमाती याचा वापर मध, दारू, पाणी साठवून ठेवण्यासाठी करत. कालांतरानं इतर गोष्टींसारखाच तो भारतात पोहोचला. पंढरपूर जिल्हामध्ये याचं उत्पन्न घेतलं जातं. हा भोपळा वाढण्यासाठी आणि चांगला वाळण्यासाठी कोरडी जमीन आणि उष्ण वातावरण लागतं. चंद्रभागेच्या काठावरच्या बेगमपूर, सिद्धापूर या खेड्यांमध्ये याची पैदास होते.          शेतकरी साधारण श्रावणात क