Skip to main content

Posts

Showing posts from June 19, 2017

अंगारकी चतुर्थी चे महात्म्य

12/06/17, 7:17 AM - Messages to this group are now secured with end-to-end encryption. Tap for more info. 13/06/17, 7:40 AM - Sriraspradnya SHS: *अंगारकी चतुर्थी* *=============* *( उद्याची संकष्टी चतुर्थी "अंगारकी " म्हणून का संबोधिले जाते ह्या बाबतची उपयुक्त माहिती जाणून घ्या.)* आपल्या हिंदू धर्मातली सहसा सर्व *गणेश भक्त* संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास धरतात. आपापल्या घरी संध्याकाळी देव्हाऱ्यातल्या मंगलमूर्ति *श्रीगणेशा* ची पूजा करून बाप्पाला दुर्वा आणि मोदक अर्पण केले जातात. आणि *चंद्रोदया* नंतर मात्र गणपती श्लोक वाचून मगच हा उपवास सोडला जातो. परंतु हीच संकष्टी जेंव्हा *मंगळवारी* येते तेंव्हा हिला *अंगारकी चतुर्थी* म्हणून संबोधिले जाते. ह्या मागची कथाही तितकीच रंजक आहे. कृतयुगात अवंती नगरीत वेदवेत्ते अग्निहोत्री ऋषी *भरद्वाज* हे महान गणेशभक्त असून त्यांनी त्या युगापासूनच मानवसृष्टी ला गणेश पूजेचे महत्त्व पटवून दिले होते. ह्या ऋषींकडूनच पृथ्वीच्या गर्भातून *अंकारक* नामक, जास्वंदी वृक्षाच्या सानिध्यात रक्तवर्णीय भौमपुत्र जन्माला आला होता जो सात वर्षांचा झाल्यावर पृथ्वीन...

सुर तेची छेडीता

🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼          *सुर तेची छेडीता* भारतीय संगीतातील सात सूर कोणाकडुन, कसे आले ह्याबाबत एका संस्कृत श्रुती साहित्यात उल्लेख आहे असं 'केसराचा पाऊस' ह्या मारुति चितमपल्लींच्या पुस्तकात वाचलं ..... मोर षड्ज सुरात तर चातक ऋषभात ... बकरा गांघार तर कोकीळ पंचम बोलतो. बेडूक व क्रौंच मध्यम, धैवत तर हत्ती नाकातून निषाद स्वराचं उच्चारण करतो .... असा त्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ आहे ... सृष्टीतील पशु पक्ष्यांकडूनच माणसाला सूर अवगत झाला असावा …. आम्रमंजिरी पाहून कुहूकुहू करणारा कोकिळ , ढगांना पाहून आनंदून जाणारा पपीहरा ह्यांच्यापासून तो आपल्या भावना सुरांत व्यक्त करायला शिकला असावा … " कोकिळ कुहूकुहू बोले, तू माझा तुझी मी झाले " " अम्बुवा कि डाली पे बोले रे कोयलिया " " बोले रे पपीहरा, पपीहरा " " बदल घिर घिर आये , पापी पपीहरा गये " " सा रे ग म प ध नी सा " सुरांची दुनिया. सातंच सूर .... तरीही केवढं प्रचंड सामर्थ्य आहे या सप्तसुरांमध्ये. प्रत्येक सुराचा बाज वेगळा, पोत वेगळा. पण जे काही आहे ते सारं फक्त जणु ह्या सात सुरांमध्येच एकवटलंय....