Skip to main content

सुर तेची छेडीता

🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼
         *सुर तेची छेडीता*



भारतीय संगीतातील सात सूर कोणाकडुन, कसे आले ह्याबाबत एका संस्कृत श्रुती साहित्यात उल्लेख आहे असं 'केसराचा पाऊस' ह्या मारुति चितमपल्लींच्या पुस्तकात वाचलं .....

मोर षड्ज सुरात तर चातक ऋषभात ... बकरा गांघार तर कोकीळ पंचम बोलतो. बेडूक व क्रौंच मध्यम, धैवत तर हत्ती नाकातून निषाद स्वराचं उच्चारण करतो .... असा त्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ आहे ...
सृष्टीतील पशु पक्ष्यांकडूनच माणसाला सूर अवगत झाला असावा …. आम्रमंजिरी पाहून कुहूकुहू करणारा कोकिळ , ढगांना पाहून आनंदून जाणारा पपीहरा ह्यांच्यापासून तो आपल्या भावना सुरांत व्यक्त करायला शिकला असावा …

" कोकिळ कुहूकुहू बोले, तू माझा तुझी मी झाले "
" अम्बुवा कि डाली पे बोले रे कोयलिया "
" बोले रे पपीहरा, पपीहरा "
" बदल घिर घिर आये , पापी पपीहरा गये "
" सा रे ग म प ध नी सा "

सुरांची दुनिया. सातंच सूर .... तरीही केवढं प्रचंड सामर्थ्य आहे या सप्तसुरांमध्ये. प्रत्येक सुराचा बाज वेगळा, पोत वेगळा. पण जे काही आहे ते सारं फक्त जणु ह्या सात सुरांमध्येच एकवटलंय. अवघं ब्रह्मांडच समावलंय ह्या सप्तस्वरांमध्ये.

Sound is a form of energy आणि म्हणुनच हे सूर जेव्हा संगीत सम्राट तानसेनच्या कंठातून येतात तेव्हा विझलेले दिवे देखील परत पेटतात.
"झगमग झगमग दिया जलाओ "
तानसेनचा मल्हार राग ऐकायला आकाशात कृष्णमेघांची दाटी होते आणि भारावुन जावुन ते अवेळी बरसु लागतात.

" गरजत बरसत सावन आयो रे "

असा हा सारा ह्या सात सुरांचा प्रभाव.
कधी सूर आश्वासक बनुन आपल्या मनाला आधार देतात ... मनाचं मरगळलेपण घालवुन नवचैतन्य निर्माण करतात ... जेव्हा एखादीचं मन उदास, निराश असतं तेव्हा तिची मैत्रीण तिची समजुत काढताना तिला सांगते

" जब दिल को सतावे गम ,
तु छेड सखी सरगम ,
बडा जोर है सात सुरों में
बहते आंसु जाते हैं थम
तु छेड सखी सरगम "

हे सूर जेव्हा आतून, अगदी आतून येतात तेव्हा मनाची तार छेडतात …. आणि अश्रूंच्या रूपाने डोळ्यांवाटे ओघळतात

" है सबसे मधुर वो गीत जिसे
हम दर्द के सूर में गाते है
जब हद से गुज़र जाती है खुशी
आँसू भी छलकते आते हैं "

मनातील प्रत्येक भावना सुरांवाटे व्यक्त होत असते ….
कधी सूर छेडले असता छानसे गीत उमटते

" सूर तेच छेडिता गीत उमटले नवे
आज लाभले सखी सौख्य जे मला हवे "

सूर जेव्हा गीतांशी हात मिळवणी करतात तेव्हा जन्मतं संगीत.

"तेरे सूर और मेरे गीत
दोनों मिलकर बनेगी प्रीत"

गीत मनाचे दरवाजे उघडतं तर संगीत सरळ आत्म्यालाच जावुन भिडतं ....
आत्म्याला आत्म्याची ओळख पटते आणि दोघांचे सुर जुळतात. जीवाशिवाचं मिलन होतं ...

" तु जो मेरे सूर में सूर मिलाये
तो जिंदगी हो जाये सफल "

आणि जिथे सूर जुळतात तिथे मग भावना व्यक्त करण्यासाठी शब्दांची गरज भासत नाही ….

" सुरावटीवर तुझ्या उमटती अचूक कशी रे माझी गझले
कशास पुसशी प्रश्न प्रेयसी तुला समजले, मला समजले "

कधी एखाद्या एकट्या संध्याकाळी, तिन्हीसांजेला अवचित ऐकू आलेली एखादी सुरावट त्या साऱ्या आठवणी जिवंत करतात , दोघांना एकत्र पाहून कुजबुजणाऱ्या वेली, खाणाखुणा करणारी पाने, सारे सारे आता स्तब्ध झालेले असतात … तारे उदास असतात अन वारा देखील उसासे देत असतो

" स्वर आले दुरुनी, जुळल्या सगळ्या त्या आठवणी
निर्जीव उसासे वाऱ्यांचे, आकाश फिकटल्या ताऱ्यांचे
कुजबुज ही नव्हती वेलींची, हितगुज ही नव्हते पर्णांचे "

पण जर ह्याच सुरांनी आपल्याशी कायमची फारकत घ्यायचं ठरवलं तर ? जगण्याचा उद्देशच नाहीसा होईल . आयुष्य भकास , अर्थहीन होईल ...

" सुर ना सजे क्या गाऊ मैं
सुर के बीना जीवन सुना"

अशी गत होईल आपली.
सूर आपल्याला आयुष्य रसिकतेने जगायला शिकवतात, कल्पनेची भरारी घ्यायला शिकवतात , ईश्वराच्या सान्निध्यात घेवुन जातात ….

" संगीत मन को पंख लगाये
गीतों से रिमझिम रस बरसाये
स्वर की साघना परमेश्वर की" ......

ह्या सप्तस्वरांनी आपलं जिवन किती समृद्ध केलंय नाही. जो सुरांच्या दुनियेत रमतो, जगतो तोच 'त्याला' खर्‍या अर्थाने जाणतो. अमृत प्राप्ती साठी फार काही नाही फक्त सुरांच्या सान्निध्यात राहणं गरजेचा आहे ….

" हे सुरांनो, चंद्र व्हा
चांदण्याचे कोष माझ्या प्रियकराला पोचवा
बरसुनी आकाश सारे अमृताने नाहवा "
🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼
           🌹स्वामीॐ🌹

As received on whatsapp.

Comments

Popular posts from this blog

*काय वाढले पानावरती*

गदिमांची अफाट काव्य प्रतिभा*       *जेवणावळ कशी असावी याचे जबरदस्त वर्णन गदिमांनी आपल्या या कवितेत केले आहे.* हे वर्णन वाचताना वाढलेले भरगच्च घमघमीत पान जर तुमच्या डोळ्यासमोर नाही आले तरंच नवल...! *काय वाढले पानावरती..!* काय वाढले  पानावरती,  ऐकून घ्यावा थाट संप्रती, धवल लवण हे पुढे वाढले,  मेतकूट मग पिवळे सजले आले लोणचे बहु मुरलेले,  आणि लिंबू रसरसलेले, किसून आवळे मधुर केले, कृष्णा काठचे वांगे आणले, खमंग त्याचे भरित केले, निरनिराळे चटके नटले, चटण्यांचे बहु नवे मासले, संमेलनची त्यांचे भरले, मिरची खोबरे ती सह ओले,  तीळ भाजूनी त्यात वाटले, कवठ गुळाचे मिलन झाले, पंचामृत त्या जवळी आले, वास तयांचे हवेत भरले, अंतरी अण्णा अधीर जाहले! भिजल्या डाळी नंतर आल्या, काही वाटल्या काही मोकळ्या, काही वाटुन सुरेख तळल्या,  कोशिंबिरी च्या ओळी जमल्या, शुभ्र काकड्या होत्या किसल्या, मुळा कोवळा मिरच्या ओल्या,  केळी कापून चकल्या केल्या, चिरुन पेरुच्या फोडी सजल्या, एकरूप त्या दह्यात झाल्या, भाज्या आल्या आळू-घोसाळी, रान कारली वांगी काळी,  सुरण तोंडली आणि पडवळी, चुका चाकवत मेथी कवळी, चंदन बटवा भेंडी कवळी, फणस कोवळ...

Cowrie, Damri, Dhela, Pie, Paisa, Rupayya and related phrases in Hindi and Marathi

Indian History of Currency (Coin) Phootie Cowrie to Cowrie Cowrie to Damri Damri to Dhela Dhela to Pie Pie to to Paisa Paisa to Rupya 256 Damri = 192 Pie = 128 Dhela = 64 Paisa = 16 Anna = 1 Rupya And remember these phrases ? Ek phootie cowrie nahi dunga! Do cowrie ki aukat nahi hai! Pie pie ka hisab lunga! Jaan chali jaye par Damri naa jaye! Vo kisi ko ek Dhela naa de! फुटकी कवडीसुद्धा हा घे ढेला पै पै (pie) करून पैसे जमवणे कवडीचुंबक दीडदमडीचा सगळ्या शब्दांची व्युत्पत्ती कळली मजा वाटली😊😊   फूटी कौड़ी भी नहीं मिलेगी कौड़ियों के दाम बिक रहा है चमड़ी जाए पर दमड़ी ना जाए पाई पाई से घड़ा भरना धेले भर का Some more in Hindi सोलह आने सच Some rare coins One Anna Back side Front side

वातींचे प्रकार

*वातींचे प्रकार  सगळ्यांच्या आग्रहाखातर काही मला माहिती असलेले वातीचे प्रकार सांगते..  *नंदादीप वात*  किंवा समई वात तेलाच्या दिव्यासाठी-- ही 5,7,9 पदरी असते शक्यतोवर 5 किंवा 7 पदरी असते.. ही रोज पूजेच्या वेळेस लावतात.. *बेलवात*-- ह्या श्रावण महिनाभर लावतात-- एकाला जोडून एक अश्या 3 वाती करतात (4+4+3 पदरी) टोटल 11 पदर.. ह्या कोणी रोज महिनाभर 11 वाती लावतात कोणी फक्त सोमवारी लावतात... *शिवरात्रवात*-- महाशिवरात्रीला 1100 पदराची वात तुपात भिजवून लावतात.. *वैकुंठवात* --350 पदरी आपल्या हाताची वितभर( करंगळी ते अंगठा लांब करून मोजलेले अंतर) करायची ती वैकुठंचतुर्दशी ला लावतात.. एक पुस्तक वगैरेवर मोजून मग त्यावर गुंडाळतात... *टिपूर*--तीन पदराच्या जोडून (365 +365) जोडवाती म्हणतात त्या त्रिपुरारी पौर्णिमेला लावतात.. *अधिक महिन्याची वात*--- 33 पदरी 33 वाती , 33 फुलवाती तुपात भिजवून लावतात .. कोणी महिनाभर लावतात कोणी एकदाच लावतात.. *कार्तिक एकादशी पासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत* 3 पदरी 105 वाती लावतात.. कोणी पौर्णिमेलाच 105 वाती लावतात.. *काडवाती*-- अंबाडीच्या कोरड्या काडीला कापूस गुंडाळू...