#रानफूले......
या सदरातील आजचे ६६वे फूल आहे *पांढरी रूई* वा *मंदार*
हिंदूधर्मशाश्त्रात अत्यंत महत्वाचे लक्ष्मीचे झाड म्हणून गणले गेलेली ही वनस्पती हल्ली खुपजणांनी दारात लावलेली दिसते.
जुन-जुलै मधे पावसात हिचे बि रूजते व हळू हळू वाढत राहते, आठ ते दहा महिन्यात फुले येतात . गुच्छामधे येणारी फुले दूरूनही ओळखू येतात या मधे जांभळसर रंगाच्या फुलांची रूई जास्त प्रचलीत आहे. कश्याही जमीनीत, मातीत, कमी पावसात पण येते . फुलांचे परागीभवन किटकांमार्फत होते व फलनपण होते.कप्पे असलेल्या शेंगेमधे(पाँड) मऊ मऊ कापूसतंतू असलेल्या बिया असतात (या कापसाची ऊशी अत्यंत मुलायम असते)त्या सुकल्या की मार्च एप्रील मधे तडकतात व बिया हवेत ऊडतात , कापसामुळे वार्याने वहन होऊन बिजप्रसार होतो.मातीत जाऊन पडली की येणार्या पावसाळ्यात रूजतात.जाड जाड मोठी मोठी पाने शनिमहाराजांना हार करून घातली जातात.महादेवाला प्रिय असलेली हि वनस्पती पण बहूपयोगी आहे.
Calotropis gigantea असे वनस्पतीशाश्त्रीय नांव असलेली हि वनस्पती पण औषधी आहे. याचा चिक जर पायात काटा वा काच गेली तर त्यावर लावला असता जखम न चिडता ते बाहेर निघते.कातडीवर कुठेही मोस, मोड,ई. असेल तर चिकाचा वापर करतात. श्वेतकुष्ठावर ऊपाय करतानाता हि वनस्पती वापरले जाते पुर्ण पंचांगम्हणजे पाने, फुले, फळे, मुळे, खोड हे सर्व वापरले जाते.त्वचारोगावर गुणकारी आहे. विंचुदंशावर ऊतारा म्हणून चिक वापरला जातो.बुरशीनाशक म्हणून ऊपयोगी आहे.ताप, गाऊट, कुष्ठ रोग यावर हि वनस्पती औषध म्हणून वापरतात.पचनसंस्थेचे विकार,गँसेस,पेटके येणे,घामोळ्या, सुज, जळजळ,पुटकूळ्या, संधीवात, अल्सर, कफ ई.वर पण गुणकारी आहे. ईतकी व्यापक गुणकारी वनस्पतीचे गुण कदाचीत आपल्या पुर्वजांनी आओळखले असावे व म्हणूनच पांढरी रूई पुजनिय झाली असावी!
Comments
Post a Comment