Skip to main content

Posts

Showing posts from September 30, 2019

नवरात्रीत खेळला जाणारा हादगा

"भोंडल्याची १६ गाणी " भोंडला ,भुलाई ,हादगा अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखला  जाणारा नवरात्रोत्सव आणि त्यातील लोकगीते  काळाच्या ओघात लुप्त होत चालली आहेत ,घरातल्या  मोठ्या व्यक्ती ,आजी यांना ती  सारी लोकगीते अगदी तोंडपाठ होती ,परंतु त्याची  कुठेही नोंद न घेतल्याने संस्कृती ,गाणी सारे काही विरून जाते आहे . चला तर मग अशा दुर्मिळ लोकगीतांचे संकलन आपल्याकडे असणे गरजेचे नाही का ??....... तीच परंपरा तीच गाणी आता आपल्या स्मार्ट वहीमध्ये ...अर्थात आपल्या  स्मार्टफोन मध्ये ... आपली मैत्रीण गावाकडची असो कि शहरातील ,सर्वानीच जपावा हा अनमोल ठेवा ... लोकसंस्कृती आपण जपली तरच पुढच्या पिढीत त्याचे संक्रमण होऊ शकते ,त्यामुळे आपल्या आई ,बहीण ,जावा ,मैत्रिणी सगळ्यांना सुपूर्त करूयात हा "नवरात्रीचा अमूल्य ठेवा" ... 1) ऐलमा पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडून दे, करीन तुझी सेवा माझा खेळ मांडिला वेशीच्या दारी, पारवं घुमतय पारावरी गोदावरी काठच्या उमाजी नायका, आमच्या गावच्या भुलोजी बायका एविनी गा तेविनी गा आमच्या आया तुमच्या आया, खातील काय दुधोंडे दुधोंडयाची लागली टाळी ,आयुष्य दे रे भामाळी माळी ग