Skip to main content

Posts

Showing posts from July 8, 2018

काही आठवणीतील पावसाळे

पावसाचे वर्णन नागपुरकर आणि पुणेकर कराकडून काही दिवसांपासून खूपच वाचण्यात आले। मग मीही थोडा ताण देऊन, माझे नागपूर मधील लहानपणीचे पावसाळी दिवस आठवले। प्रामुख्याने आठवले ते, संपूर्ण परिसर धुतल्यागत स्वच्छ आणि हिरवागार व्हायचा आणि वातावरण मंद आणि कुंद व्हायचे। विशेष आठवण म्हणजे घरी थांबून दुलई किंवा पांघरून घेऊन आईच्या कुशीत दुपारची झोप काढायची। बाहेर पाऊस म्हणजे ओघाने घरी थांबणे आलेच आणि वातावरण थंड झाल्याने, भजी, गरम चहा आणि उबदार पांघरून... पुढे मुंबईला गेल्यावर... मुंबईतल्या पावसाला, तशी मजा मला कधीच जाणवली नाही, कारण दडलेली घाण खळखळ वाहत जात पाहताना कसली आलीय मजा। हो पण तेच समुद्रकाठी गेले तर आणि Gate Way of India ला गेले तर, एक आगळाच निसर्गाचा चमत्कार पहावयास मिळे। तो खवळलेला समुद्र आणि अंगावर उडणारे तुषार, त्याचा तो रुद्रावतार पहिला की पूर्णपणे मी हरखून जात असे... जसे तो आपल्याला, आपण किती क्षीण /खिसगणती आहोत या पृथ्वीतलावर, याची जाणीव करून देत असे। बंगलोर ला आलो आणि पावसाचे एक वेगळेच रूप पाहायला मिळाले..रोज दुपार झाली की अभाळलेले..आणि केव्हा तरी 10-15 मिनिटे तो जोरधार कोसळनार आणि क