Skip to main content

Posts

Showing posts from August 12, 2020

पावसाच्या नक्षत्रांचे बोलकं वर्णन

गावाकडे पावसाच्या नक्षत्रांचे बोलकं वर्णन केलं जातं. त्याच भाषेत सांगायचं झालं तर तरणा पाऊस पडून गेलाय, त्याच्या पाठोपाठ म्हाताराही पडून गेला आहे. आता सासूचा पाऊस पडेल मग सुनेचा पाऊस पडेल. हे असं का म्हटलं गेलंय याचे बहुतेक निष्कर्ष खुमासदार आहेत.  बहुधा प्रत्येक पाऊसनक्षत्रासाठी गावाकडे स्वतंत्र म्हणी आहेत.  पडतील स्वाती तर पिकतील माणिक मोती (स्वाती नक्षत्रातला पाऊस पिकाला खर्‍या अर्थाने उभारी देतो, रूपरंग देतो. त्यामुळे या नक्षत्रात पाऊस झाला तर खर्‍या अर्थाने माणिक मोती पिकतात) पडतील चित्रा तर भात खाईना कुत्रा (चित्रा नक्षत्रातला पाऊस बिनभरवशाचा असतो. पडला तर इतका पाऊस पडतो की तो काहीच शिल्लक ठेवत नाही, अगदी वाडग्यात काढून ठेवलेलं उष्टावण असो की ताजं जेवण असो ते एकतर सादळून तरी जातं नाहीतर बेचव तरी होऊन जातं. म्हणून मग त्याची चव जाते. मग त्याचं वर्णन भात खाईना कुत्रा अशा शेलक्या शब्दात आलंय)           ,  पडतील आर्द्रा तर झडतील गडदरा (आर्द्रा नक्षत्रातला पाऊस बरसला तर गडकोटांच्या तटबंदी ढासळतील. काही खेड्यात गरदाडा असा ही शब्द आढळतो. त्याचा अर्थ खबदाड, भागदाड असा होतो. म्हणजे काय तर

कोकण

500 रुपयात कोकणवास 🌴 ५०० रुपयात तळकोकणात निसर्गाच्या कुशीत सुंदर कौलारू घरात रहायला देता, मग तुमाला परवडतं तरी कसं ?.. काही गौडबंगाल तर नाही ना ? असा प्रश्न तुम्हाला पडणे स्वाभाविक आहे... याचे उत्तर असे की... (1) आम्ही केवळ पैशासाठी हे सुरू केलेले नाही. मुंबई पुण्यासारख्या शहरात फ्लॅट मध्ये राहणाऱ्या आपल्या लोकांना निसर्गाच्या 🌴🌴 सानिध्यात चार क्षण समाधानाने माणि शांततेने जगता यावेत, स्वछ निर्मळ हवेत श्वास घेता यावा यासाठी. (2) कोकणातले बरेचसे लोक मुंबईत नोकऱ्या करतात. त्यांना त्यांच्या मित्रपरिवाराला गावी तसेच गोव्यात फिरायला आणायचे असते परंतू गावी पाहुणचार करायचे वांदे होतात. मग आलेल्या मित्रांना हॉटेल मध्ये तरी कसं ठेवणार? गावाचा फील नको का यायला?.. म्हणूनच आम्ही आहोत अस्सल कोकणी पाहुणचारासाठी. (3) गोवा फिरायला आलेल्या पर्यटकांना महागड्या हॉटेल मध्ये केवळ राहण्या-जेवण्यासाठी हजारो रुपये लागतात.. म्हणूनच आम्ही अगदी स्वस्तात गोव्यापासून अगदी एक तासावरच तुमची रहायची सोय करतोय आणि अगदी स्वस्तात चवदार मालवणी जेवणाची व्यवस्थाही... या मागचा आमचा स्वार्थ हाच आहे की गोवा फिरायला आलेले पर्

केळी च्या रोपा ची गोष्ट

दर वर्षी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी ला बंगलोर च्या लालबाग येथे फ्लॉवर शोज असतात..निरनिराळी themes घेऊन अनेक प्रकारच्या फुलांची सुंदर रचना ह्या दिवशी करतात. ते पाहायला तिकीट असते अणि तरीही खूप लोकं येतात..अनेक प्रदेशातून नर्सरी चा व्यवसाय करणारे या दिवसात, इथे आपापला माल विकायला पण ठेवतात..आम्ही पण हौशी ने बहुतेक वेळा जातो. काही वर्षां पूर्वी, असेच आम्ही गेलो असता, प्रदर्शन पाहून झाल्यावर स्टॉल्स कडे वळलो, एका स्टॉल वर मराठी भाषिक होते, ओळख झाली आणि मग थोडे बोलणे झाले. फार प्रेमाने त्यांनी "भुसावळच्या केळी चे रोप आहे, ताई घेता का?", एकाने विचारले..माझ्याकडे थोडी बागेपुरते आंगण आहे, मग विचार केला, बघुया घेऊन..मग घरी येऊन, जागा शोधून, रोप लावले..हळू हळू दिवसा मासा रोप मोठे झाले (१),  केळफूल आले (२),  ते उमलून केळ्याचा मोठा घड दिसू लागला (३). .होता होता अजून काही महिने गेले..मग केळी झाली आहे असे वाटून घड उतरविला(४). वजन केले तर अबब! २५ किलो! " मेरे घर की मिट्टी सोंना उगले उगले हिरे मोती ' याची प्रचिती आली. गगनात मावेनासा आनंद झाला..मग का