Skip to main content

Posts

Showing posts from July 23, 2017

अप्रतिम लेख

17/07/17, 10:33 AM - Messages to this group are now secured with end-to-end encryption. Tap for more info. 20/07/17, 4:16 PM - Dr Vasanti Thote SHS: Apratim lekh aahe .....Wacha माय मराठी गेले दोन दिवस मराठी लिहितांना र्‍हस्व दीर्घाच्या चुकांना कंटाळून रडणारा एक मुलगा दाखवणारा व्हिडीओ फेसबुक आणि whatsapp वर फिरतोय. चुकीच्या समजुतींवर काहीतरी उपाय करावा यासाठी हा लेख प्रपंच. . . . . इंग्रजी लिहितांना फारसा गोंधळ होत नाही. एकापुढे एक अक्षरे लिहिता येतात. मराठीत र्‍हस्व-दीर्घाच्या वेलांट्या, उकार यांचा फार गोंधळ होतो असा एक लाडका आक्षेप इंग्रजी माध्यमाचे पुरस्कर्ते नेहमी घेतात. कोणतीही भाषा शिकतांना व्याकरणाचे नियम जड जातातच. इंग्रजीची स्पेलिंग्ज पाठ करतांना आणि करून घेतांना घरोघरच्या विद्यार्थ्यांची, त्यांच्या पालकांची आणि शिक्षकांची उडणारी त्रेधा कोणी पाहिलीच नाही का? वेलांटी, उकार लिहून घेतांना काय दक्षता घ्यायची ते शिकवणाऱ्याच्या कौशल्यावर अवलंबून. पण शिकवणारेच सध्या - - - - असो. पण तेवढ्यासाठी मराठी भाषेचा कंटाळा, तिटकारा करणं म्हणजे पाय दुखतात म्हणून ते कापून टाकण्यासारखंच आहे. मराठ