20/07/17, 4:16 PM - Dr Vasanti Thote SHS: Apratim lekh aahe .....Wacha
माय मराठी
गेले दोन दिवस मराठी लिहितांना र्हस्व दीर्घाच्या चुकांना कंटाळून रडणारा एक मुलगा दाखवणारा व्हिडीओ फेसबुक आणि whatsapp वर फिरतोय. चुकीच्या समजुतींवर काहीतरी उपाय करावा यासाठी हा लेख प्रपंच. . . . .
इंग्रजी लिहितांना फारसा गोंधळ होत नाही. एकापुढे एक अक्षरे लिहिता येतात. मराठीत र्हस्व-दीर्घाच्या वेलांट्या, उकार यांचा फार गोंधळ होतो असा एक लाडका आक्षेप इंग्रजी माध्यमाचे पुरस्कर्ते नेहमी घेतात. कोणतीही भाषा शिकतांना व्याकरणाचे नियम जड जातातच. इंग्रजीची स्पेलिंग्ज पाठ करतांना आणि करून घेतांना घरोघरच्या विद्यार्थ्यांची, त्यांच्या पालकांची आणि शिक्षकांची उडणारी त्रेधा कोणी पाहिलीच नाही का? वेलांटी, उकार लिहून घेतांना काय दक्षता घ्यायची ते शिकवणाऱ्याच्या कौशल्यावर अवलंबून. पण शिकवणारेच सध्या - - - - असो. पण तेवढ्यासाठी मराठी भाषेचा कंटाळा, तिटकारा करणं म्हणजे पाय दुखतात म्हणून ते कापून टाकण्यासारखंच आहे.
मराठीचं लिखित आणि उच्चारी रुप सारखंच असतं. (य असणारी जोडाक्षरे हा अपवाद) अक्षरावर मात्रा असली की त्याचा उच्चार 'ए'कारीच होतो. दोन मात्रा दिल्या की 'ऐ'कार. हाच नियम रफार, ऋकार, उकार, इकार यांनाही लागू. कोणत्याच चिन्हाचा कसा उच्चार करावा किंवा कोणता उच्चार कसा लिहावा ते बदलत नाही. पण इंग्रजीत तसं नाही. नुसत्या ए चा उच्चार करण्यासाठी a, e, ay, ae, ai इतके प्रकार वापरले जातात. उदा. Late, let, lay, orthopaedic, bait इत्यादी. 'ई' कारासाठी i, ee आणि ea. उदा. sit, meet किंवा seat. उकारासाठीही u किंवा oo – जसे put किंवा foot. ऑ साठी o आणि नुसता a सुध्दा. – for, hall. रोजच्या वापरातले कितीतरी इंग्रजी शब्द असे आहेत की उच्चारात साम्य पण स्पेलिंग वेगळंच. write, right, rite वगैरे. शिवाय अनुच्चारित अक्षरांचा गोंधळ आहेच. ठळक शब्द म्हणजे – psychology, pneumonia, know, window, low, crow वगैरे. सुरुवातीचा p अनुच्चारित पण शब्दाच्या शेवटचा w सुध्दा अनुच्चारित. हे सगळं कसं लक्षात राहतं?
इंग्रजीच्या अॅ आणि ऑ च्या उच्चारासाठी मराठीने ॅ आणि ॉ ही चिन्हं स्वीकारली आहेत. इंग्लिश शब्द आपल्या लिपीत लिहितांना ती उपयोगी पडतात. इंग्रजीतले स्पेलिंग काहीही असले तरी ते शब्द देवनागरीत लिहितांना चिन्ह समान. उदा. for-फॉर किंवा ball-बॉल. s, ed वगैरे प्रत्यय लावतांना किंवा un, en, in वगैरे उपसर्ग वापरतांना, a कधी आणि an कधी हे लक्षात ठेवतांना गोंधळ होत नाही. नियम लक्षात राहतात आणि सवयीने व्यवस्थित वापरताही येतात. फक्त र्हस्व-दीर्घाचे नियम किचकट, क्लिष्ट. म्हणजे सख्खी आई पारंपरिक म्हणून तिचा अनादर आणि झगा घालणारी सावत्र आई जास्त लाडकी. परधार्जिणेपणा वेगळा काय असतो?
पण मुलांना शाळेत घालतांना इतका विचार केला गेला नाही. आजही होत नाही. परिणामी कोणत्याच भाषेशी जवळीक साधली जात नाही. मग केवळ अमराठी भारतीय किंवा अभारतीय लोकांशी संपर्क करण्याचे साधन इतकेच तिचे काम उरते. यामुळे कित्येक घरातला भाषिक व्यवहार पार नासून गेला आहे. न घाबरता (न चुकता नाही), फाड-फाड इंग्लिश बोलणे हा विनाकारण एक प्रतिष्ठेचा आणि आधुनिकतेचा मापदंड ठरला आहे. अशी माणसे उगाचच हुशारीची अदृश्य झूल मिरवत असतात. त्यामुळेच की काय, ही इंग्रजीचे विरजण लावलेली मराठी समाजाच्या सर्व थरांत पसरली आहे.
हे सर्वसाधारण निरीक्षण आहे. वज्रलेप निष्कर्ष नाहीत. कित्येक घरी मराठी शाळेत शिकणारी मुलं उत्तम इंग्रजी बोलतात आणि इंग्रजी शाळेत शिकणारी मुलं मराठीशी नातं सांभाळून असतात. हे श्रेय अर्थात त्यांच्या पालकांचे आणि शिक्षकांचे आहे आणि त्या मुलांची थोडी जास्त मेहनत यामागे असते हे निर्विवाद.
शेवटी आपली मातृभाषा मायमराठी आहे की my मराठी हा निर्णय आपणच घ्यायचा आहे.
राधा मराठे
१८.०७.२०१७
23/07/17, 7:47 PM - Dr Vasanti Thote SHS: *गेल्या ३० वर्षात आपल्या देशात नेमकं काय घडलं?*
तिस वर्षातले बदल या लेखात सामाऊन घेण्याचा प्रयत्न मी करत आहे.
शेतक-यांच्या आत्महत्या म्हणजे अनेकानेक घटनांचा परिपाक असतो, ती जशी सामाजीक बाब असते तसीच शास्त्रीय गोष्ट सुद्धा असते, त्याचं एकच कारण नसतं हे सांगण्याचा हा प्रयत्न.
दोन तिन दशकांआधी आपल्याकडे *सोयाबीन, कापुस* आलं. *ज्वारी हळुहळू बाद होत गेली.*
ज्वारी गेल्याने कडबा (चारा) कमी झाला. कडब्याचा चारा नसल्याने गाई म्हशी कमी झाल्या. २०० बैलांचा गावातला पोळा ५० बैलांवर आला. "खांदेमळणी" सारखे शब्द काळाच्या उदरात गडप झाले. गोधन कमी झाल्याने गावच्या गायरानांचं महत्व कमी झालं.
*गायरान म्हणजे "वेस्ट लॅंड"* असं नवीनच सुत्र चलनात यायला लागलं.
मग गावाबाहेरील गायरानांवर *अतिक्रमण* झालं.
सोयाबीनचा उपयोग स्थानिक ठिकाणी खाद्य म्हणून केल्या जात नाही त्यामुळे अन्न सुरक्षेचा मोठाच प्रश्न निर्माण झाला. घरात चार पोते ज्वारी असली की कितीही भीषण दुष्काळात तरुन जाता यायचं. एक आधार असायचा. बिकट परिस्थितीत लोकं *ज्वारीच्या "कण्या"* खाऊन जगली. ज्वारीच्या जाण्याने आता तसा आधार गेला.
सोयाबीन हे तेल बियानं, त्यामुळे जमीनीचा कस कमी झाला, नव नव्या बुरशी वाढायला लागल्या. त्यातच *डि.ए.पी.* सारख्या खताच्या मा-याने मातीची जैविक संरचना बिघडली.
एकीकडे जमीन निकृष्ट होत जाणे, दुसरीकडे त्यात *शेणखताची कमतरता* यामुळे जमीनीची *पाणी धारण क्षमता* आणि जमीनीत पाणी मुरवण्याची क्षमता कमी झाली. जमीनीत पाणी मुरत नाही म्हणून *भूजल* संपुष्टात यायला लागलं. (सोयाबीन, कापुससारखी) एकसुरी पीक पद्धती आल्याने शेतातली जैवविविधता झपाट्याने घटली. एकसुरीपनाच्या शेतीने एकाच वेळी सगळं पीक वाया जाण्याचं प्रमाण वाढलं. एकाच वेळी सगळं पीक वाया गेल्याने *शेतक-यांच्या आत्महत्या* वाढल्या.
अन्न सुरक्षा नष्ट झाल्याने देशातल्या कुठल्या तरी प्रांतातलं खराब धान्य कमी भावात ग्रामीण भागात रेशन दुकानात पुरवण्याची जबाबदारी सरकारने घेतली.
*त्यातुन लाचारीचा जन्म झाला. लाचारीतुन आत्मसन्मान गेला, आत्मविश्वास गेला.*
*छटाकभर गावात तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर रातोरात वाढदिवसांचे बॅनर लाऊन नेते बनलेल्या भुरट्या नेत्यांचं पीक आलं.*
ज्यांचे खायचेपण वांदे आहेत त्यांना सुध्दा नेता बनण्याच दिवसा स्वप्न पडू लागली आणि मग शेतीच्या चरकातून फ्रेस्टेट झालेल्या युवां ना कधी नव्हे ते महाराष्ट्र अस्मिता, परप्रांतीय वगैरे हेच खरे प्रश्न असल्याचा साक्षात्कार करुन देण्यात आला. गावागावात अमूक पक्ष तमुक मित्र मंडळांचे फलक झळकायला लागले.
*इलेक्शन आले अन दारुचा कधी नव्हे एवढा महापुर ग्रामीण भागातुनसुध्दा वाहायला लागला.*
आपल्याच डोळ्यादेखत *२५ - ३० वर्षांची किती तरी पोरं दारु पिऊन पटापट गेली*?
इलेक्शन आलं, छटाक भर आकाराचं गाव विभागलं, दुभंगल. यातुन तहसील, कृषी विभाग, पंचायत समीतीकडे *सबसीडीसाठी* चकरा मारणा-या *लाचार शेतक-याची संख्या* वाढायला लागली.
*दुध गेलं, तुर, मुग, उडीद गेले, तितर बाट्या गेल्या, कोंबड्या पाळण्यात कमतरता वाटायला लागली*, तणनाशकाच्या फवा-याने बांधावर तना सोबत येणा-या *जंगली भाज्या गेल्या, नद्या नाल्यातले मासे, खेकडे, झिंगे गेले, गायराणातले ससे गेले.*
त्यामुळे प्रथिनांचा, पोषणाचा प्रश्न उभा राहिला. सकस अन्न नाही, किटकनाशकांच्या सतत संपर्कात, सतत मानसीक तनावात असल्याने ह्रदय रोग, कर्क रोगाचं कधी नव्हे इतकं प्रमाण ग्रामीण भागात वाढलं.
*शेती म्हणजे घाट्याचा धंदा झाल्याने, तिच्या बांधबंदीस्तीकडे कमालीचं दुर्लक्ष झालं*.
त्यातुन पावसाळ्यात शेतातली सुपीक माती नदीत गेली. नदीचे पुरातन डोह मातीने उथळ झाले. त्यातुन पाणी जमीनीत मुरवणा-या केशवाहीण्या चोक झाल्या.
नदी उथळ झाल्याने पावसाळ्यात शेतीला पुराचा धोका वाढला. जमीनी खरवडून जाण्याचं प्रमाण वाढलं. नद्या उथळ झाल्याने मास्यांची संख्या घटली. तंबू, कन्नाश्या, डोकडे, टेप-या गेल्या अन तिलापीया, ग्रास कार्प, सिल्वर कार्प, आफ्रिकन मागुर परदेशातुन आपल्याकडे आल्या. यातुनच मासेमारांच्या रोजगाराचा भिषण प्रश्न उभा राहिला. *त्यातच मग सिंचन प्रकल्प आले.*
नेत्यांच्या, इंजीनीयरांच्या गब्बर पिढ्या सुखनैव नांदू लागल्या. बियाणे, किटकनाशके अन खतांसाठी बाहेरच्या व्यवस्थांवरचं अवलंबत्व कमालीचं वाढल्याने स्थानिक ठिकाणी पराधीनता वाढली. त्यातुनच मग नवीन ज्ञान गावात न येणे (उदा. बि.टी. तंत्रज्ञानाचं ज्ञान!) अन पारंपरिक ज्ञानाचा र्हास होणे अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली.
जुनं निसटुन चाललं आणि नवीन येत नाही म्हणून *ज्ञानाची पारंपरिक तिजोरी* रिती व्हायला लागली. अन दहावी पास कृषी सेवा केंद्र वाले आणि कृषी सहायक शेतक-यांचे गुरुजी झाले. याच दरम्यान एक मध्यमवर्गीय सुखवस्तू नौकरदार वर्ग हळुहळू उदयास यायला लागला.
या वर्गासाठी महागाईची व्याख्या होती, *शेतमालाचे भाव वधारणे.* हा वर्ग बोलणारा, लिहणारा, "प्रतिक्रिया बहाद्दर" याला सरकार घाबरुन असणार, हा वर्ग कांद्याच्या भावासाठी सरकार पाडायला मागे पुढे न बघणारा मात्र फेअर अंड लवली साठी कोणत्याही भावाची शहानिशा न करता डोळे मिटून घेणारा.
शेतमालाचे भाव वाढले की हा वर्ग *बोंब ठोकणार*. त्यातुन शेतमालाचे भाव इतर निविष्ठांच्या तुलनेत वाढलेच नाही. उत्पादन आधारीत बाजारभाव हे शेतक-यांसाठी एक स्वप्नच राहिले. परिणामत: कृषी उत्पादनात विक्रम करणारा, देशाला अन्न दारिद्र्यातुन बाहेर काढणारा शेतकरी दरिद्रीच राहिला.
सततच्या आर्थिक विवंचनेत आंब्याची, मोहाची झाडं आरामशीनच्या घश्यात गेली.
शेंदरी, लाडू, शहद्या, शेप्या, नारळी, तेल्या, कागद्या, केळ्या, दोडी, गोटी, आमट्या, खाऱ्या, दाडक्या ह्या आंब्याच्या जाती काळाच्या आड जाऊन कुठून तरी कलमी, बदाम अशा जाती बाजारात दिसायला लागल्या. आंब्याच्या, मोहाच्या, डिंकाच्या, तेंदुच्या, चाराच्या (चारोळी), बिब्याच्या, मधाच्या, जंगली मशरुमच्या स्वरुपात आणखी किती तरी आधाराचे दोर कचाकच कापल्या गेले.
एका माती नाला बांधासाठी, पांदण रस्ताच्या दुरुस्ती साठी दहा रुपयांची वर्गनी न देणारा आमचा पठ्ठ्या गावातल्या मंदीर बांधकामासाठी सढळ हस्ते मदत करता झाला.
हे सर्व नियोजन बध्द पद्धतीने घडत गेले.
*निदान आपल्या पिढीने यातून आता तरी बोध घेऊन आपल्याच मुलाबांळाच भवितव्य सुरक्षित करावे*
*अजुनही वेळ गेलेली नाही.*
*नाहीतर आपल्याच समोर आपलाच अंधार नक्की विचार करा.*
सुजलाम, सुफलाम अशा या देशाचे आणि जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांचे हात बळकट करु या.
धन्यवाद. 🙏🏻🇮🇳
23/07/17, 8:48 PM - Sunil Malode SHS: प्राजक्त
काल एक सुंदर चारोळी वाचली....
'सकाळी अंगणातला पारिजात,
फुलांचा सडा टाकून मोकळा होतो
रिते होण्यातले समृद्धपण,
तो किती सहजपणाने दाखवतो'
कुणाची आहे माहित नाही. पण भावली मनाला. आणि
'प्राजक्त सडा टाकून मोकळा झाला'.
त्याचा भार हलका झाला. अर्थात....फुलंच ती....इलुशी...नाजुक....त्यांचा भार तो कितीसा असणार ! आणि काहीही झालं तरी 'सृजनाचा' कुठे कधी भार होत असतो का ? 'हलका झाला'... पण म्हणून पोकळी नाही निर्माण झाली. 'मोकळा' झाला पण रिता झाला असेल का खरंच ? मला नाही तसं वाटत ! 'रित' होण्यासाठी 'रिकामं' असावं लागतं मुळात. प्राजक्ताकडे हे रिकामपण नक्कीच नाही. . तो केव्हाच पुन्हा सृजनाच्या त्या सुंदर प्रक्रियेत मशगुल झाला. उद्यासाठी तेवढ्याच कळ्यांना खुलवायचंय....फुलांना फुलवायचंय....प्रत्येकात सुगंधाची कुपी लपवायचीये ...शिवाय देठादेठात केशर !
मातीकडून घेतलेल्या जीवनरसाचं देणं, सुगंधाच्या रूपात निसर्गाला परत करायचंय. उपकारांची परतफेड करायची आहे याची जाणीव आहे त्याला. कृतघ्न व्हायला...तो काही माणूस नाही नं.
जणु ज्या क्षणी ती फुलं फांदीपासून सुटतात, तत्क्षणी तो त्या फुलांवरचे, सारे हक्कही सोडतो...आजची फुललेली सारी फुलं, वर्तमानाच्या त्या क्षणाला वाहून तो मोकळा होतो. गुंतून नाही पडत तो त्या फुलांमध्ये. म्हणून विरहाच दुःख त्याला ठाऊक नाही.आणि म्हणूनच रितेपणाची भावना मुळ धरत नाही.तो अनुभवतो ..ती फक्त बहरण्यातली परिपूर्णता आणि 'देण्या'तलं समाधान.
आपल्यालाही, आयुष्य असंच जगता आलं तर ? तो तो क्षण, वर्तमानाला अर्पण करून टाकायचा. आणि मोकळं व्हायचं त्या क्षणातून ! गुंतून नाही रहायचं त्यात. पुढचा नवा क्षण खुलवायला...फुलवायला... नव्याने सज्ज व्हायचं. फक्त आपलंच नाही तर इतरांचही आयुष्य सुगंधी करायचं.
जमेल का, असं 'प्राजक्त' व्हायला ?
श्रावण मासारंभा च्या खुप खुप शुभेच्छा
🌸🌹
23/07/17, 10:43 PM - Srikrishna Pande: <Media omitted>
Comments
Post a Comment