Skip to main content

Posts

Showing posts from March 25, 2017

रॉस बेट, पोर्ट ब्लेअर।

*झेंडा..* 2004 मध्ये काही महिने योगेशच्या(माझे पती) नोकरीनिमित्त इंग्लडमधील शेफील्डमध्ये राहत होतो तेव्हाची गोष्ट. योगेशची बाॅस पॅट 40 वर्षाची झाली म्हणून पार्टी होती. चाळीशीचे विशेष कौतुक पहिल्यांदाच इतके पाहिले. आम्ही सहा ह्या जण छोट्याश्या पार्टीसाठी एकत्र आलो.पॅटचा पार्टनर एरिक(तिकडे पार्टनर असतो हे नवे ज्ञान) तिच्यासोबत होता.त्याची नव्याने ओळख झाली आणि अजून एक इंग्रज जोडी ... माझे वय तेव्हा साधारण 26/27 . हा एरिक त्या दिवशी माझ्या आयुष्याला मोठी कलाटणी देऊन गेला..आयुष्यात जागोजागी अनेक लोक भेटतात ,काही ना काही देऊन जातात.. पॅटने त्या दिवशी शिकवले..चाळीशीतही कसं मस्त तरुण जगायचं!आयुष्यातील प्रत्येक टप्पा स्वीकारताना बहरत लहरत जगायचं. हि जोडी आवडली मला . टेबलवर रंगलेल्या गप्पांच्या ओघात मी एरिकला विचारले कि तो काय काम करतो?ह्या प्रश्नाचे जे उत्तर मिळाले त्याने मला खडबडून शुध्दीत आणले तो म्हणाला,"मी स्टेशनवर झेंडा दाखवतो" मी आणि योगेश नि:शब्द, कारण पॅट योगेशच्या ऑफिस मधे उच्चपदस्थ अधिकारी. योगेश शांत बसला पण माझी जिज्ञासा म्हणा किंवा भोचकपणा. ..