Skip to main content

रॉस बेट, पोर्ट ब्लेअर।


*झेंडा..*

2004 मध्ये काही महिने योगेशच्या(माझे पती) नोकरीनिमित्त इंग्लडमधील शेफील्डमध्ये राहत होतो तेव्हाची गोष्ट. योगेशची बाॅस पॅट 40 वर्षाची झाली म्हणून पार्टी होती. चाळीशीचे विशेष कौतुक पहिल्यांदाच इतके पाहिले.
आम्ही सहा ह्या जण छोट्याश्या पार्टीसाठी एकत्र आलो.पॅटचा पार्टनर एरिक(तिकडे पार्टनर असतो हे नवे ज्ञान) तिच्यासोबत होता.त्याची नव्याने ओळख झाली आणि अजून एक इंग्रज जोडी ...
माझे वय तेव्हा साधारण 26/27 . हा एरिक त्या दिवशी माझ्या आयुष्याला मोठी कलाटणी देऊन गेला..आयुष्यात जागोजागी अनेक लोक भेटतात ,काही ना काही देऊन जातात..
पॅटने त्या दिवशी शिकवले..चाळीशीतही कसं मस्त तरुण जगायचं!आयुष्यातील प्रत्येक टप्पा स्वीकारताना बहरत लहरत जगायचं. हि जोडी आवडली मला .
टेबलवर रंगलेल्या गप्पांच्या ओघात मी एरिकला विचारले कि तो काय काम करतो?ह्या प्रश्नाचे जे उत्तर मिळाले त्याने मला खडबडून शुध्दीत आणले
तो म्हणाला,"मी स्टेशनवर झेंडा दाखवतो"
मी आणि योगेश नि:शब्द, कारण पॅट योगेशच्या ऑफिस मधे उच्चपदस्थ अधिकारी.
योगेश शांत बसला पण माझी जिज्ञासा म्हणा किंवा भोचकपणा. ..मला शांत राहू देईना."पृच्छकेन सदा भाव्यम"अर्थात :प्रश्न विचारत रहा".
मी पुढे परत विचारले,"सुरवातीपासून तिथेच आहेस का? "
नव-याचा जळजळीत कटाक्ष...माझे दुर्लक्ष ...
पण हा पठ्ठ्या तर खूष झाला अजूनच ,ह्या प्रश्नाने.
म्हणाला,"Nope,मीही software कंपनीमध्ये अधिकारी होतो ,चाळीसाव्या वाढदिवसापर्यंत....
वयाच्या 20 ते 40 पर्यत वीस वर्षे खूप काम केले ...पैसे साठवले फिक्स केले..आणि आता मी माझे जुने स्वप्न जगतोय..
" स्वप्न म्हणजे?"मी
"मी लहानपणी जेव्हा जेव्हा स्टेशनवर यायचो माझ्या माॅम बरोबर तेव्हा मला हा सिग्नलमॅन फार भुरळ घालायचा..वाटायचे किती lucky आहे हा अख्खी ट्रेन थांबवू शकतो आणि त्याच्या हातातले दोन झेंडे मला रात्री स्वप्नातही दिसायचे.मग मोठा होताना हा सिग्नलमॅन मागे राहिला.मी ही चारचौघांसारखा खूप शिकलो. .Exicutive post वर आलो आणि routine मधे अडकलो.पण चाळिसाव्या वाढदिवसाला शांत मनाने ठरवले..आता ह्या बिग मॅन एरिक ने small kid एरीकचे स्वप्न पूर्ण करायचे आणि दुस-या दिवसापासून स्टेशनवर रुजू झालो ते माझे आवडते लाल हिरवे झेंडे हातात घेतले.मी त्या क्षणाच्या आजही प्रेमात आहे..." एरीक मस्त छोट्याश्या एरीकसारखा हसला ,मग मोठ्या माणसासारखा बीअर रिचवू लागला.

पार्टी संपली..मी आणि योगेश घरी आलो तेव्हा दोघेही एरीकच्या प्रेमात पडलो होतो. भूतकाळात मागे टाकलेले,हरवलेले,विसरलेले आपापले हिरवे,लाल झेंडे आठवले...माझी डायरीत राहिलेली कविता...अर्ध्या वाटेवर राहिलेलं गाणे..योगेशची एखादे वाद्य शिकण्याची
अपूर्ण इच्छा..बरंच काही...
आज तो नवा गुरु प्रेरणा देऊन गेला....
1. पुढील काही वर्षे झटून काम करण्यासाठी ;
2.महत्वाकांक्षा आणि पैसा ह्यांच्या हव्यासात न हरवण्यासाठी;
3.हातात चाळीशीनंतर घेण्याचा आवडत्या रंगाचा झेंडा शोधण्यासाठी...


-Nutan Yogesh Shete

Comments

  1. Hello, Please Add my name below my article "Zenda""झेंडा".
    Please ensure that while forwarding posts you do Not delete authors name.

    Thank you
    NutanShete

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वातींचे प्रकार

*वातींचे प्रकार  सगळ्यांच्या आग्रहाखातर काही मला माहिती असलेले वातीचे प्रकार सांगते..  *नंदादीप वात*  किंवा समई वात तेलाच्या दिव्यासाठी-- ही 5,7,9 पदरी असते शक्यतोवर 5 किंवा 7 पदरी असते.. ही रोज पूजेच्या वेळेस लावतात.. *बेलवात*-- ह्या श्रावण महिनाभर लावतात-- एकाला जोडून एक अश्या 3 वाती करतात (4+4+3 पदरी) टोटल 11 पदर.. ह्या कोणी रोज महिनाभर 11 वाती लावतात कोणी फक्त सोमवारी लावतात... *शिवरात्रवात*-- महाशिवरात्रीला 1100 पदराची वात तुपात भिजवून लावतात.. *वैकुंठवात* --350 पदरी आपल्या हाताची वितभर( करंगळी ते अंगठा लांब करून मोजलेले अंतर) करायची ती वैकुठंचतुर्दशी ला लावतात.. एक पुस्तक वगैरेवर मोजून मग त्यावर गुंडाळतात... *टिपूर*--तीन पदराच्या जोडून (365 +365) जोडवाती म्हणतात त्या त्रिपुरारी पौर्णिमेला लावतात.. *अधिक महिन्याची वात*--- 33 पदरी 33 वाती , 33 फुलवाती तुपात भिजवून लावतात .. कोणी महिनाभर लावतात कोणी एकदाच लावतात.. *कार्तिक एकादशी पासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत* 3 पदरी 105 वाती लावतात.. कोणी पौर्णिमेलाच 105 वाती लावतात.. *काडवाती*-- अंबाडीच्या कोरड्या काडीला कापूस गुंडाळू...

*काय वाढले पानावरती*

गदिमांची अफाट काव्य प्रतिभा*       *जेवणावळ कशी असावी याचे जबरदस्त वर्णन गदिमांनी आपल्या या कवितेत केले आहे.* हे वर्णन वाचताना वाढलेले भरगच्च घमघमीत पान जर तुमच्या डोळ्यासमोर नाही आले तरंच नवल...! *काय वाढले पानावरती..!* काय वाढले  पानावरती,  ऐकून घ्यावा थाट संप्रती, धवल लवण हे पुढे वाढले,  मेतकूट मग पिवळे सजले आले लोणचे बहु मुरलेले,  आणि लिंबू रसरसलेले, किसून आवळे मधुर केले, कृष्णा काठचे वांगे आणले, खमंग त्याचे भरित केले, निरनिराळे चटके नटले, चटण्यांचे बहु नवे मासले, संमेलनची त्यांचे भरले, मिरची खोबरे ती सह ओले,  तीळ भाजूनी त्यात वाटले, कवठ गुळाचे मिलन झाले, पंचामृत त्या जवळी आले, वास तयांचे हवेत भरले, अंतरी अण्णा अधीर जाहले! भिजल्या डाळी नंतर आल्या, काही वाटल्या काही मोकळ्या, काही वाटुन सुरेख तळल्या,  कोशिंबिरी च्या ओळी जमल्या, शुभ्र काकड्या होत्या किसल्या, मुळा कोवळा मिरच्या ओल्या,  केळी कापून चकल्या केल्या, चिरुन पेरुच्या फोडी सजल्या, एकरूप त्या दह्यात झाल्या, भाज्या आल्या आळू-घोसाळी, रान कारली वांगी काळी,  सुरण तोंडली आणि पडवळी, चुका चाकवत मेथी कवळी, चंदन बटवा भेंडी कवळी, फणस कोवळ...

तेजोवलय (Aura)

ऑरा ..किंवा मराठीत ज्याला तेजोवलय हा छान शब्द आहे,  मानवी शरीर universal life force  जीला प्राणशक्ती म्हणू शकतो अश्या ऊर्जेने बनलेले आहे.  या शक्तीमुळे जिवंत राहण्यासाठी, वाढ,  maintenance  आणि इतर अनेक क्रियांसाठी संपूर्ण शरीरात असंख्य घडामोडी आपोआप घडत असत्तात ज्याचा आपल्याला पत्ताही नसतो.  या क्रियांमुळे आपल्या शरीराभोवती एक ऊर्जा क्षेत्र (इलेक्ट्रो- मॅग्नेटिक फील्ड) सतत तयार होत असते.  आपल्या शरीरालागत ऊर्जेचे असणारे हे वलय म्हणजेच ऑरा किंवा तेजोवलय.  प्रत्येक सजीव जीवाला, मानव, प्राणी, वनसंपत्ती यांना तेजोवलय असते.   Quantum physics नुसार शास्त्रज्ञानी सिद्ध केल्या प्रमाणे सगळं विश्व ऊर्जेने बनलेलं आहे, आणि त्या सिद्धांता नुसार निर्जीव वस्तूंना ही तेजोवलय असते. माणसाचे हृदय हे सर्वात जास्त उर्जाक्षेत्र निर्माण करत असते...आणि त्या खालोखाल मेंदू.  यामुळेच तुम्ही कधी बघितलं असेल, की एखाद्या अनोळखी व्यक्तीला प्रथमच भेटता तेव्हा काही बोलणं न होताही तुम्हाला वाटतं .. हा माणूस काही चांगला वाटत नाही.  किंवा ह्या उलट सुद्धा.. एखाद्याबद्दल त्याच्याशी न बोलताही प्रथम दर्शनी आपले अतिशय चांगले...