04/03/17, 3:45 AM - Abhay Hole SHS: रोजसारखीच सकाळ झाली !
व्हॉट्सअप तुणतुणले,
न उघडताच कळले !!
ग्रुप्सवर "गुड मॉर्निंग" किणकिणले !!
पण, मी पाहिलं नाही !
तडक उठलो आणि...
मोबाइलही नसलेल्या एका मावशीशी बोललो,
वयाने थकलेल्या तिच्या थरथरत्या आवाजात
मायेनं किणकिणली,
"काळजी घे गं" तिला म्हटलं,
डोळ्यात पाणी तरळलं
का...? .
कळलं नाही.
फेसबुक क्लिककडे सवयीने हात गेला,
फेस फिरवून मी तो दुसरीकडेच नेला.
शेजारच्या काकांकडे डोकावले...
त्यांचा "फेस" कित्येक दिवस पाहिला नव्हता,
त्यांना तब्येत विचारली...
ते शुगर आणि डॉक्टरवर अथक बोलत राहिले..
जाता जाता म्हणाले...
सांभाळ रे.. किती धावपळ करतोस..!
मी नकळत वाकलो...
पायाला हात लावले.
का...? .
कळलं नाही.
दिवसभर व्हॉट्सअपवर जोक्स येत राहिले,
आणि ..
"मस्ट शेअर पोस्ट" नी तर
व्हॉट्सअप भरून वाहिले..
तरी अजिबात उघडले नाही.
सकाळ संध्याकाळ,
जेवलास का..., निघालास का... म्हणत
माझ्या काळजीचा वसा घेतलेल्या आईला
स्वत:हून फोन लावला
"काय रे .. काय झालं..."
तिचा स्वर कापरा झाला,
तेव्हा कळलं कामाशिवाय करतच नाही तिला फोन !
अपराधी वाटून मी बोलत राहिलो..
बोलतच राहिलो.. ती तृप्त होईपर्यंत !
शेवटी तीच म्हणाली...
अरे देवा..
गॅसवर दूध आहे.. ठेवते रे.!!
दूध नाही..
पण काहीतरी नक्कीच ऊतू गेलं...
का...? .
कळलं नाही.
संध्याकाळ झाली...
घरी आलो लवकर
फेसबुक ट्विटर चिवचिवत होतंच
पण आजूबाजूला चिवचिवणा-या
माझ्या चिमण्या बाळांशी
चक्क गप्पा मारत बसलो
त्यांच्याशी खेळलो...
खूप हसलो !
त्यांचा तो चिवचिवाट
खूप खूप गोड वाटला.
का...? .
कळलं नाही.
रात्री बायको जेवण वाढत होती
फोन दिसणार नाही इतका दूर ठेवला
कढी खूप झक्कास होती..
भुरका मारत प्यायलो..
नुसतंच "लाइक" नाही तर
कमेंट करून टाकली...
बायको गोड हसली
या आधी कधी अशी हसली होती.. ?
आठवलं नाही...
अंथरुणावर पडलो तेव्हा...
उशाजवळच फोन होता.
दिवसभरात माझं
एकही शेअर नाही..
की पोस्ट नाही
काय बोलणार.. आता !
कुणाचेही लाइक येणार नव्हते
कुणीही कमेंटही करणार नव्हते
कुणाच्या रिप्लायचीही वाट बघायची नव्हती
आजचे "लाइक्स"
आजचे "कमेन्ट"
आजचे "रीप्लाय"
सारे माझ्या डोळ्यात होते..
त्यांना जपत मी डोळे मिटले...
ब-याच दिवसांनी...
त्या रात्री खूप छान झोप लागली...
का...? .
कळलं नाही.
Comments
Post a Comment