Shubhangi: 💛
मैत्री....
चालता चालता अलगद हात हाती यावा ...
हसण्यात अश्रू विरून जावा
अशी मैत्री असावी.
मनमोकळेपणाने बोलता यावं,
वेळेचंही भान नसावं
अशी मैत्री असावी.
थकल्यानंतर झाडाखाली बसावं
अन् ...
न सांगताही मनातलं ओळखावं ...
अशी मैत्री असावी.
दोन घडी भेट झाली नाही
तर चुटपुट लागावी....
भेटल्यावर मात्र भडाभडा बोलावं...
अशी छान मैत्री असावी.
एकाचं दु:ख दुसर्याला कळावं
अन्
आठवण होताच हलकं स्मित झळकावं
अशी मैत्री असावी.
न रुसवा, ना अबोला,
ना ईर्षा, ना बढाया,
ना भूलथापा, ना अविश्वास,
फक्त आनंदच वाटावा...
💛मैत्री अशी असावी...♥
Ajay : 🛎🛎🛎🛎🛎🛎🛎🛎🛎🛎🛎
🌹🍃
सेतु बांधण्याचे कार्य चालू असताना हनुमान
प्रत्येक दगडावर राम लिहित असे
आणि
तो दगड पाण्यावर तरंगत असे.
हे पाहून भगवान श्रीरामांनी एक दगड उचलला
आणि
पाण्यात टाकला.
तो बुड़ाला व तळाशी गेला.
प्रभु रामचंद्राना आश्चर्य वाटले.
ते म्हणाले,
"तुम्ही दगड फेकला तर तो तरंगतो,
मी फेकला तर कसा काय बुडतो?"
हनुमान ह्यावर सुंदर उत्तर देतो,
"प्रभु,
ज्याच्या आयुष्यात तुम्ही आलात तो(दगड)सुदधा तरला.
जो तुमच्या हातून सुटला तो बुडाला."
*जय श्री राम*
🍃🌹
🛎🛎🛎🛎🛎🛎🛎🛎🛎🛎🛎
Comments
Post a Comment