Skip to main content

स्त्री चा पदर

21/02/17, 6:37 PM - Messages you send to this group are now secured with end-to-end encryption. Tap for more info.
22/02/17, 11:44 AM - Sunita Deo Nichkaode SHS: 🍀🌾 स्त्रिचा पदर 🌾🍀

🍁 पदर काय जादुई शब्द आहे ...

काना नाही, मात्रा नाही, वेलांटी नाही, अनुस्वार नाही. एक सरळ तीन
अक्षरी शब्द.

पण केवढं विश्‍व
सामावलेलं आहे त्यात....!!

किती अर्थ, किती महत्त्व...
काय आहे हा पदर.......?

साडी नेसणाऱ्या स्त्रीच्या खाद्यावर
रुळणारा मीटर दीड मीटर लांबीचा
भाग.......!!
तो स्त्रीच्या लज्जेचं रक्षण तर
करतोच, सगळ्यात महत्त्वाचं हे
कामच त्याचं. पण, आणखी ही
बरीच कर्तव्यं पार पाडत असतो.

या पदराचा उपयोग स्त्री केव्हा,
कसा अन्‌ कशासाठी करेल,
ते सांगताच येत नाही.

सौंदर्य खुलवण्यासाठी सुंदरसा
पदर असलेली साडी निवडते. सण-समारंभात तर छान-छान
पदरांची जणू स्पर्धाच लागलेली
असते. सगळ्या जणींमध्ये चर्चाही
तीच. .....!!

लहान मूल आणि आईचा पदर,
हे अजब नातं आहे. मूल तान्हं
असताना आईच्या पदराखाली
जाऊन अमृत प्राशन करण्याचा
हक्क बजावतं. .....!!

जरा मोठं झालं, वरण-भात खाऊ
लागलं, की त्याचं तोंड पुसायला
आई पटकन तिचा पदर पुढे करते
....

मूल अजून मोठं झालं, शाळेत
जाऊ लागलं, की रस्त्यानं चाल-
ताना आईच्या पदराचाच आधार लागतो. एवढंच काय, जेवण
झाल्यावर हात धुतला, की टाॅवेल
ऐवजी आईचा पदरच शोधतं आणी आईलाही या गोष्टी हव्याहव्याशा
वाटतात मुलानं पदराला नाक जरी
पुसलं, तरी ती रागावत नाही ...

त्याला बाबा जर रागावले, ओरडले
तर मुलांना पटकन लपायला आईचा पदरच सापडतो.....!!

महाराष्ट्रात तो डाव्या खांद्या वरून
मागे सोडला जातो.....!!

तर गुजरात, मध्य प्रदेशात उजव्या
खांद्यावरून पुढं मोराच्या.
पिसाऱ्यासारखा फुलतो ....!!

काही कुटुंबात मोठ्या माणसांचा
मान राखण्यासाठी सुना पदरानं
चेहरा झाकून घेतात ..
तर काही जणी आपला लटका ,
राग दर्शवण्यासाठी मोठ्या
फणकाऱ्यानं पदरच झटकतात !

सौभाग्यवतीची ओटी भरायची
ती पदरातच अन्‌ संक्रांतीचं वाण
लुटायचं ते पदर लावूनच.

बाहेर जाताना उन्हाची दाहकता
थांबवण्यासाठी पदरच डोक्यावर
ओढला जातो, तर थंडीत अंगभर
पदर लपेटल्यावरच छान ऊब
मिळते....!!

काही गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी
पदरालाच गाठ बांधली जाते .
अन्‌ नव्या नवरीच्या जन्माची
गाठ ही नवरीच्या पदरालाच,
नवरदेवाच्या उपरण्यासोबतच
बांधली जाते.....!!

पदर हा शब्द किती अर्थांनी
वापरला जातो ना.....?

नवी. नवरी नवऱ्याशी बोलताना
पदराशी चाळे करते, पण संसाराचा
संसाराचा राडा दिसला, की पदर
कमरेला खोचून कामाला लागते

देवापुढं आपण चुका कबूल करताना म्हणतोच ना .....?
माझ्या चुका " पदरात " घे.'

मुलगी मोठी झाली, की आई तिला
साडी नेसायला शिकवते, पदर
सावरायला शिकवते अन्‌ काय
म्हणते अगं, चालताना तू पडलीस
तरी चालेल. ....!!

पण, " पदर " पडू देऊ नकोस !
अशी आपली भारतीय संस्कृती.

अहो अशा सुसंस्कृत आणी सभ्य
मुलींचा विनयभंग तर दुरच् ती. रस्त्यावरून चालताना लोकं
तिच्याकडे वर नजर करून साधे पाहणार ही नाहीत ऊलटे तिला वाट देण्या साठी बाजुला सरकतील एवढी ताकत असते त्या "पदरात" ....... !!

!! जय हिंद !!
!!! जय महाराष्ट्र !!!

🙏🙏शुभ रात्री 🙏🙏बिरे.सर..वर्धा;ॐ

Comments

Popular posts from this blog

Cowrie, Damri, Dhela, Pie, Paisa, Rupayya and related phrases in Hindi and Marathi

Indian History of Currency (Coin) Phootie Cowrie to Cowrie Cowrie to Damri Damri to Dhela Dhela to Pie Pie to to Paisa Paisa to Rupya 256 Damri = 192 Pie = 128 Dhela = 64 Paisa = 16 Anna = 1 Rupya And remember these phrases ? Ek phootie cowrie nahi dunga! Do cowrie ki aukat nahi hai! Pie pie ka hisab lunga! Jaan chali jaye par Damri naa jaye! Vo kisi ko ek Dhela naa de! फुटकी कवडीसुद्धा हा घे ढेला पै पै (pie) करून पैसे जमवणे कवडीचुंबक दीडदमडीचा सगळ्या शब्दांची व्युत्पत्ती कळली मजा वाटली😊😊   फूटी कौड़ी भी नहीं मिलेगी कौड़ियों के दाम बिक रहा है चमड़ी जाए पर दमड़ी ना जाए पाई पाई से घड़ा भरना धेले भर का Some more in Hindi सोलह आने सच Some rare coins One Anna Back side Front side

*काय वाढले पानावरती*

गदिमांची अफाट काव्य प्रतिभा*       *जेवणावळ कशी असावी याचे जबरदस्त वर्णन गदिमांनी आपल्या या कवितेत केले आहे.* हे वर्णन वाचताना वाढलेले भरगच्च घमघमीत पान जर तुमच्या डोळ्यासमोर नाही आले तरंच नवल...! *काय वाढले पानावरती..!* काय वाढले  पानावरती,  ऐकून घ्यावा थाट संप्रती, धवल लवण हे पुढे वाढले,  मेतकूट मग पिवळे सजले आले लोणचे बहु मुरलेले,  आणि लिंबू रसरसलेले, किसून आवळे मधुर केले, कृष्णा काठचे वांगे आणले, खमंग त्याचे भरित केले, निरनिराळे चटके नटले, चटण्यांचे बहु नवे मासले, संमेलनची त्यांचे भरले, मिरची खोबरे ती सह ओले,  तीळ भाजूनी त्यात वाटले, कवठ गुळाचे मिलन झाले, पंचामृत त्या जवळी आले, वास तयांचे हवेत भरले, अंतरी अण्णा अधीर जाहले! भिजल्या डाळी नंतर आल्या, काही वाटल्या काही मोकळ्या, काही वाटुन सुरेख तळल्या,  कोशिंबिरी च्या ओळी जमल्या, शुभ्र काकड्या होत्या किसल्या, मुळा कोवळा मिरच्या ओल्या,  केळी कापून चकल्या केल्या, चिरुन पेरुच्या फोडी सजल्या, एकरूप त्या दह्यात झाल्या, भाज्या आल्या आळू-घोसाळी, रान कारली वांगी काळी,  सुरण तोंडली आणि पडवळी, चुका चाकवत मेथी कवळी, चंदन बटवा भेंडी कवळी, फणस कोवळ

इंग्रजांनी नोट छापण्याकरिता नाशिक ठिकाणचं का ठरवलं ?

इंग्रजांनी नोट छापण्याकरिता नाशिक ठिकाणचं का ठरवलं ? (इतिहास) पैसे छापणे हा नाशिकचा खुप जुना व्यवसाय आहे. आजही नाशकात भद्रकाली परिसरात एक टांकसाळ गल्ली आहे. इथल्या टांकसाळे वाड्यात मुठ्ठल नामक परिवार राहायचा. त्यांना पेशव्यांनी टांकसाळे हे आडनांव दिले होते. बडोद्याचे गायकवाड नाशकातल्या टांकसाळीतून १७६९ ते सुमारे १७७२ या कालावधीत आपली नाणी पाडत असत. पेशवाईत नाणी पडण्याच्या भानगडीत सरकार पडत नसे. नाणी पाडणे हा खाजगी धंदा असायचा. हा व्यवसाय सुरु करायला सरकारची परवानगी मात्र घ्यावी लागे. अर्थात सरकार नाणी पडण्याचा मोबदला मात्र घेत असे. १७५०च्या सुमारास दोन कासारांना नाणी पाडण्याची परवानगी मिळाली होती. तीन वर्षाच्या लायसन्ससाठी त्यांना १२५ रुपये फी भरावी लागली होती. शिवाय गिऱ्हाईकानी नाणी पाडण्यासाठी टांकसाळीत चांदी जमा करायची आणि दर शेकडा नाण्यांच्या मागे सरकारला काही करही द्यावा लागे. १७६५ मध्ये नाशकातल्या लक्ष्मण आप्पाजी यांनी माधराव पेशव्यांच्या परवानगीने इथे टांकसाळ सुरु केली होती. गंमत अशी होती की पेशवाईतली नाणी फारसी लिपीत आणि मोघल राजांच्या नावाने पाडली जायची. बहुतांश अशिक्षित असणाऱ