वयानुसार आपण काय काय ..
गोष्टी सोडल्या..
*आपण गाभुळलेली चिंच ..*
*अनेक वर्षात खाल्लेली नाही*
*जत्रेत मिळणारी ..*
*पत्र्याची शिट्टी ..*
*वाजवलेली नाही.*
*चटक्यांच्या बिया घासून ..*
*चटके द्यावेत ..*
*असं आता वाटत नाही*
*सर्कसमधला जोकर आपलं ...*
*मन आता रिझवू शकत नाही.*
*तसंच कापसाची म्हातारी ..*
*पकडण्याचा चार्मही ..*
*राहिलेला नाही..*
*कारण ..*
:
*कापसाच्या म्हातारीने ..*
*उडता उडता आपला ..*
*बालपणीचा काळ सुखाचा..* *स्वत:बरोबर कधी नेला ..*
*ते आपल्याला कळलंच नाही.*
*आता त्या सहली नाहीत...*
*दोन दोन मुलांच्या ..*
*जोड्या करून ..*
*चालणं नाही..*
*विटी दांडू नाही...*
*गोट्या*लगोरी*
*साबणाचे फुगे नाहीत..*
*प्रवासात बोगदा आला तर ..*
*एक अनामिक हुरहूर नाही..*
*त्या उडणाऱ्या म्हातारीने ..*
*हे सगळे आनंद नेले...*
*त्याच्या बदली ..*
*तिचं वार्धक्य तिने ..*
*आपल्याला दिलं...*
*म्हणूनच ती अजून उडू शकते...*
*आणि आपण जमिनीवरच आहोत.*
*लाटेने की काळाने ...*
*नेला तो मातीचा किल्ला?*
*भोवऱ्याच्या रश्शीला लावलेला कोल्डड्रिंकच्या झाकणाचा बिल्ला…*
*हरवली कुठेतरी ती शाळेतली मूल्यशिक्षणाची वही,*
*इवलुश्या मार्कांच्या प्रगती पुस्तकावर मारलेली बाबांची खोटी सही….*
*गेले कुठे ते चालताना ..*
*"पॅकपॅक" आवाज करणारे ..*
*पायातले बूट?*
*"मी नाही देणार जा माझं चॉकलेट"*
*म्हणत आवळलेली ती ..*
*घट्ट मूठ….*
*किती जिव्हाळा होता ..*
*डोकं टेकवलेल्या ..*
*आईच्या हाताच्या उशीत?*
:
*ब्लँकेटहून जास्त ..*
*ऊब होती त्या ..*
*मायेच्या कुशीत…*
*हरवला तो प्रेमाचा घास….*
*"चिऊताई" दाखवत आईने भरवलेला…*
*घरात न सांगता ..*
*लपवून लपवून ..*
*खाऊ खायचा तो ..*
*प्लॅन ठरवलेला?*
*गेले कुठे जत्रेतले ते ..*
*गोड गोड म्हातारीचे केस?*
*छोट्याशा बुटांची ..*
*आईने बांधलेली ती ..*
*सुटलेली लेस….*
*गेली कुठे ती ..*
*मामाच्या गावी जाणारी ..*
*झुकझुक गाडी?*
*शाळेत बडबडगीते गाताना ..*
*एकत्र लावलेला तो सूर कुठे गेला?*
*झोपताना पाहिलेला तो ..*
*चांदोमामा कुठे हरवला?*
*अ आ इ ई ..*
*पाटीवर लिहिणारा तो ..*
*खडू कुणी पळवला?*
*कशाला आलं हे ...*
*आपल्याला शहाणपण????*
*हरवलं त्यात ते सुंदर बालपण..*
*खरंच बालपणीचा काळ किती सुखाचा ना?*
*आयुष्यातील काही ...*
*अनमोल क्षणांची आठवण ...*
*ते क्षण निसटून गेल्यावरच प्रकर्षाने होते...*
*पण बालपणीच्या काही ..*
*आठवणी,*
*मनाच्या कोपऱ्यात ..*
*अजूनही दाटलेल्या असतात,*
*त्यांना हलकेच गोंजारलं असता ..*
*त्यांची सय अधिकच गडद होते...*
*आपलं मनही किती विचित्र असतं ना...*
*जेव्हा लहान असतो तेव्हा पटकन मोठं व्हावंसं वाटतं...*
*शाळा सोडून बाबांसारखं ...कामावर जावंसं वाटतं...*
*मात्र आता मोठं झाल्यावर ...*
*पुन्हा ते बालपणीचे दिवस आठवतात ..*
*आणि नकळत डोळ्यात पाणी येतं..*
*आय मिस माय चाइल्डहूड यार*
*कोई लौटा दे मुझे...*
*बीते हुए दिन..*
*चला मन थोडे हलके झाले ..*
-Suhas
Comments
Post a Comment