भरती ओहोटी आणि तळण
भरती आणि ओहोटीचा स्वयंपाकावर परिणाम होतो का ?
उत्तर आहे हो !
ऐकून जरा आश्चर्य वाटेल....
पण भरती ओहोटीचा आणि तळणाचा संबंध आहे.
एखादं वर्षी दिवाळीत मोठ्या प्रमाणात चकल्या , अनारसे , शंकरपाळे केल्यावर ते पदार्थ आपण ज्या डब्यात ठेवतो त्याच्या तळाशी खूप सारे तेल जमते आणि ते पदार्थ ही मऊ होतात . तो पदार्थ करणारी व्यक्ती आणि पदार्थ बनवण्यासाठी लागणाऱ्या जिन्नसाचे प्रमाण ही तेच असते परंतु त्या पदार्थांत खूप तेल शोषले जाते.
बटाटेवडे / भजी केलीे तर कधी कधी ते खूप तेल पितात.
ह्याचे कारण आहे ते म्हणजे तो पदार्थ नेमका ओहोटीच्या वेळेत तळला गेलेला असतो.
जर पदार्थ भरतीच्या वेळेत तळला गेला तर खूप कमी तेल लागते व पदार्थ ही छान होतो आणि आरोग्याच्या दृष्टीने ते चांगले असते.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की भरती ओहोटीची वेळ कशी काढावी ? ती खालील प्रमाणे
वृत्तपत्रात किंवा नेटवर ती मिळतेच पण एक साधी आणि सोपी पद्धत खाली देत आहेत
कालनिर्णयवर आजची तिथी बघावी
उदारणार्थ आजची कृ. २ आहे
तिथी कृ. २ × ३/४ = १.५
१.५ म्हणजे आत्ता दुपारी १.३० वाजता पूर्ण भरती आहे
पूर्ण भरतीच्या साधारण 3 तास आधी तळण सुरू करावे. ( सकाळी १०.३० वाजल्यापासून ते दुपारी १.३० वाजेपर्यंत ) पण जर तुम्ही दुपारी १.३० नंतर तळणाला सुरवात केलीत तर जसजशी वेळ पुढे जाईल तसतसे पदार्थ जास्त तेल शोषेल.
जेव्हा आपण मोठ्या प्रमाणात तळण करणार असू तेंव्हा ही वेळ पाळली तर पदार्थात तेल खूप कमी शोषले जाईल , पदार्थीही चांगला होईल आणि ते आरोग्यासही उत्तम राहील.
आमच्या घरी दिवाळीचे सर्व पदार्थ वरील पद्धतीने भरती आणि ओहोटीची वेळ बघून केले जातात.
हा प्रयोग तुम्हीही अवश्य करून बघा ; विशेष करून केटरिंगचा व्यवसाय करणार्यांनी.
© अवधूत वेलणकर
Comments
Post a Comment