Skip to main content

अविरत ओठी यावे नाव....

31/03/17, 6:53 PM - Messages you send to this group are now secured with end-to-end encryption. Tap for more info.
04/04/17, 6:56 PM - Suhas Dhamorikar: अविरत ओठी यावे नाम
श्रीराम जय राम जयजय राम

रामनाम हे सदा सुखाचे
निधान जाणा परमेशाचे
पतीतपावन अवघे नाम
श्रीराम जय राम जयजय राम

जानकीची जणु जीवनज्योती
प्रभु रामाची कोमल मूर्ती
मंगल दर्शन पूर्ण विराम
श्रीराम जय राम जयजय राम

पंचप्राण हे पवनसूताचे
राम जणू नि:श्वास तयांचे
तनू संजीवन सुंदर धाम
श्रीराम जय राम जयजय राम

गीत - मनोहर कवीश्वर

शुभप्रभात/Good morning
✨✨✨☀✨✨✨
🌳⛳🌳🌺🌳⛳🌳
05/04/17, 2:40 AM - Maya Pande Londhe SHS: =======
माय - लेक
=======

रात्रीचे साडेअकरा वाजून गेले होते. अंथरूणाला पाठ टेकणार, इतक्यात एकाएकी लक्षात आलं की आपण गडबड करून ठेवलीये. ऊद्या पहाटे ऊठून डबा करायचाय आणि कणिक भिजवायची राहिलीये.

स्वत:वरच चरफडत बाहेर आले. स्वैपाकघरातली माझी खुडबुड ऐकून अभ्यास करत बसलेला मुलगा आत आला.

- हे काय? आत्ता काय करतीयेस ? झोपायला गेली होतीस ना?
- अरे, पहाटे डबा द्यायचाय अन् मी कणिकच भिजवायला विसरले.
आजकाल ना मी काय काय विसरेन काही सांगता येत नाही.
- ममा, तू दमलीयेस. दे, मी भिजवतो कणिक.
(मला कौतुकाने हसूच आलं.)
- किती शहाणं माझं पिलू. राहू दे रे. तू बोललास यातच आलं सगळं.

तोपर्यंत मी परातीत पीठ घेतलं होतं आणि पाणी घेतलं.
पण याने खरंच परातीचा ताबा घेतला की...
आणि मला विचारत विचारत कणिक पटकन भिजवली सुद्धा, आयुष्यात पहिल्यांदाच. 😍😍😍😍

(मीसुद्धा इतकी सहज आणि इतकी छान भिजवली नव्हती पहिल्या प्रयत्नात.)

त्याची ताकद जास्त असल्याने कणिक जरा घट्टच झाली. मग दुसऱ्या दिवशी त्याला मी भिजवलेली कणिक दाखवून बोटं खुपसून दोन्हीतला फरक दाखवला. तर पठ्ठ्याने पुढच्याच दिवशी हुबेहूब तश्शी कणिक भिजवून दाखवली की हो.

खेळीमेळीत गंमतीत मी रोज त्याला दिवसातून एकदा तरी त्याला चिडवायला पेटंट डायलॉग ऐकवते... 'काश, मुझे एक बेटी होती' 😜😃
अर्थात मनात म्हणतेच 'तुम ना होते तो राम जाने मेरा क्या होता '
पर सचमुच ऐसे लडके पे तो जान कुर्बान है.....

ही पोस्ट मुद्दाम टाकायची पार्श्वभूमीही सांगते.
विशाखाताईंनी Vishakha Abhyankar चिमणी दिनाच्या दिवशीची लाडक्या लेकींवरची पोस्ट टाकली होती ना...

त्यावरच्या कॉमेंट्समधे 'आमच्या पोटी मुलगी नाही' ही खंत मी आणि Rajani Joshi ने व्यक्त केली आणि आमचे हे कावळे पोट्टे नाराज झाले असं माझ्या लक्षात आलं.....

तेव्हा लक्षात आलं की आपण या मुलग्यांना किती गृहित धरतो.

त्यांची सळसळती ऊर्जा, वजनदार पिशव्या-सामान झटकन् ऊचलून पटापटा जिने चढून जाणे, त्यांचं दिलखुलास गडगडाटी खिदळणं (आणि रागाने धुमसणंही), तासनतास टीव्हीवर खेळ वगैरे पहात बसणे, खूप बडबड केली तरी खरंखुरं पोटातलं फारसं कधी ओठांवर येऊ न देणे, हळूच आरशात मागून पुढून पाहून बॉडी, कट्स, हेअरस्टाईल किंवा दाढी-मिशा निरखत रहाणे.
एवढा मोठा झाला तरी मधेच दिसून येणारी निरागसता आणि त्यामुळे या भयंकर जगात आपल्या पिलाचं काय होईल याची वाटणारी काळजी.
अजूनही त्याचं कुशीत शिरून लाडीगोडी लावणं आणि पुढच्याच क्षणाला 'तुम्ही बायका ना.... ' असली काहीतरी शेरेबाजी करून रागाला आणणं...

काहीही म्हणा... ये सबकुछ ऊतनाही प्यारा लगता है....
खरंच घरात एक मुलगा वाढताना पहाणे ही फार फँटँस्टिक गोष्ट आहे.

मुली कशा खूप बडबड करतात, हक्काने राग, लोभ, प्रेम व्यक्त करतात.
पण मुलांना हे जमत नाही तर आपण त्यांना गृहितच धरू लागतो ......

म्हणून मुलग्यांचं कौतुक करण्यासाठी ही खास पोस्ट.

स्वाती जोशी
05/04/17, 3:39 AM - Reeta Lanjewar: "माहेरपण"
नव-याने तिला विचारले.....
लग्नाला झाली वर्ष कितीतरी, अजून तुझे नवेपण
मला एकदा सांग तरी
असतं काय हे माहेरपण.
राणी माझ्या घरची तू
सासुरवास तुला न ठाऊक
करतेस काय मोठे तू
खास माहेरी "हितगूज"
सतत सगळ्यांशी असतेस connect,
smart phone हा दिमतीला
Sharing caring असतेस करत
whats app आहे संगतीला
Get together सदैव घडे
मैत्रीणींचा online झकास group
प्रवासाचे कष्ट घेऊन , आणखी काय मिळते सुख
आठ दिवस सुटटी घे
अन मस्त धमाल कर
shopping hotelling मनसोक्त करु
हवय कशाला माहेरपण
तिने मधाळ हसत उत्तर दिले......
वर्ष सरोत कितिही ,
ओढ काही सरत नाही
सासरी गेल्याशिवाय खरंतर
माहेरपण कळत नाही.
सासरच्या सुखाच्या ओंजळीच मी
खरतर माहेरी उधळत जाते
अन त्याच आनंदाच्या घागरी
त्यांच्या डोळ्यातून रित्या करते.
दारात माझी वाट पाहणा-या
आजीची मग मी नव्याने मैत्रीण होते,
काल वेळेचे तिचे गणित मग माझ्या गप्पांतून जुळत जाते.
पिल्लं सोपवून आईकडे
मैत्रीणींचा जमतो कट्टा
कितीतरी जुन्यानव्या तासनतास मारतो गप्पा.
भेटीगाठीतून नव्याने मग अस्तित्वाच्या जुन्या खुणा शोधते,
माझी हरवलेली मी मला तिथेच सापडते.
आईने आठवणीने डब्यात भरुन ठेवलेला खाऊ अन बाबानी आणलेली आवडीची भाजी
मरगळ झटकुन मनाची मी होते ताजी.
आठवणीचे गोफ विणत लहान मी होत जाते
माहेरपण म्हणजे पुन्हा एकदा
बालपण मी जगून घेते...

For all ladies (y)
05/04/17, 2:41 PM - Sunil Malode SHS: आकर्ण्याम्रस्तुतिं जलमभूत्तन्नारिकेलान्तरं प्रायः कण्टकितं तथैव पनसं जातं द्विधोर्वारुकम् |
आस्तेऽधोमुखमेव कादलमलं द्राक्षाफलं क्षुद्रतां श्यामत्वं बत जाम्बवं गतमहो मात्सर्यदोषादिह ||

अर्थ

फळांचा राजा असणाऱ्या आंब्याची स्तुती ऐकून नारळाच्या पोटात / [मनात] पाणी झालं. फणसाच्या अंगावर काटा उभा राहिला. उंब्राचं फळ तर फुटलंच. केळ्यानी मानच खाली घातली. द्राक्ष काळपट तर पडलीच आणि लहानही झाली. जांभूळ [हेव्यानी] जांभळ पडलं. हे सगळं मत्सरामुळे बरं !

आम्रऋतुच्या शुभेच्छा !!

🍋🍋🍋🍋🍋🍋🍋

"WhatsApp Chat" 

Comments

Popular posts from this blog

वातींचे प्रकार

*वातींचे प्रकार  सगळ्यांच्या आग्रहाखातर काही मला माहिती असलेले वातीचे प्रकार सांगते..  *नंदादीप वात*  किंवा समई वात तेलाच्या दिव्यासाठी-- ही 5,7,9 पदरी असते शक्यतोवर 5 किंवा 7 पदरी असते.. ही रोज पूजेच्या वेळेस लावतात.. *बेलवात*-- ह्या श्रावण महिनाभर लावतात-- एकाला जोडून एक अश्या 3 वाती करतात (4+4+3 पदरी) टोटल 11 पदर.. ह्या कोणी रोज महिनाभर 11 वाती लावतात कोणी फक्त सोमवारी लावतात... *शिवरात्रवात*-- महाशिवरात्रीला 1100 पदराची वात तुपात भिजवून लावतात.. *वैकुंठवात* --350 पदरी आपल्या हाताची वितभर( करंगळी ते अंगठा लांब करून मोजलेले अंतर) करायची ती वैकुठंचतुर्दशी ला लावतात.. एक पुस्तक वगैरेवर मोजून मग त्यावर गुंडाळतात... *टिपूर*--तीन पदराच्या जोडून (365 +365) जोडवाती म्हणतात त्या त्रिपुरारी पौर्णिमेला लावतात.. *अधिक महिन्याची वात*--- 33 पदरी 33 वाती , 33 फुलवाती तुपात भिजवून लावतात .. कोणी महिनाभर लावतात कोणी एकदाच लावतात.. *कार्तिक एकादशी पासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत* 3 पदरी 105 वाती लावतात.. कोणी पौर्णिमेलाच 105 वाती लावतात.. *काडवाती*-- अंबाडीच्या कोरड्या काडीला कापूस गुंडाळू...

*काय वाढले पानावरती*

गदिमांची अफाट काव्य प्रतिभा*       *जेवणावळ कशी असावी याचे जबरदस्त वर्णन गदिमांनी आपल्या या कवितेत केले आहे.* हे वर्णन वाचताना वाढलेले भरगच्च घमघमीत पान जर तुमच्या डोळ्यासमोर नाही आले तरंच नवल...! *काय वाढले पानावरती..!* काय वाढले  पानावरती,  ऐकून घ्यावा थाट संप्रती, धवल लवण हे पुढे वाढले,  मेतकूट मग पिवळे सजले आले लोणचे बहु मुरलेले,  आणि लिंबू रसरसलेले, किसून आवळे मधुर केले, कृष्णा काठचे वांगे आणले, खमंग त्याचे भरित केले, निरनिराळे चटके नटले, चटण्यांचे बहु नवे मासले, संमेलनची त्यांचे भरले, मिरची खोबरे ती सह ओले,  तीळ भाजूनी त्यात वाटले, कवठ गुळाचे मिलन झाले, पंचामृत त्या जवळी आले, वास तयांचे हवेत भरले, अंतरी अण्णा अधीर जाहले! भिजल्या डाळी नंतर आल्या, काही वाटल्या काही मोकळ्या, काही वाटुन सुरेख तळल्या,  कोशिंबिरी च्या ओळी जमल्या, शुभ्र काकड्या होत्या किसल्या, मुळा कोवळा मिरच्या ओल्या,  केळी कापून चकल्या केल्या, चिरुन पेरुच्या फोडी सजल्या, एकरूप त्या दह्यात झाल्या, भाज्या आल्या आळू-घोसाळी, रान कारली वांगी काळी,  सुरण तोंडली आणि पडवळी, चुका चाकवत मेथी कवळी, चंदन बटवा भेंडी कवळी, फणस कोवळ...

तेजोवलय (Aura)

ऑरा ..किंवा मराठीत ज्याला तेजोवलय हा छान शब्द आहे,  मानवी शरीर universal life force  जीला प्राणशक्ती म्हणू शकतो अश्या ऊर्जेने बनलेले आहे.  या शक्तीमुळे जिवंत राहण्यासाठी, वाढ,  maintenance  आणि इतर अनेक क्रियांसाठी संपूर्ण शरीरात असंख्य घडामोडी आपोआप घडत असत्तात ज्याचा आपल्याला पत्ताही नसतो.  या क्रियांमुळे आपल्या शरीराभोवती एक ऊर्जा क्षेत्र (इलेक्ट्रो- मॅग्नेटिक फील्ड) सतत तयार होत असते.  आपल्या शरीरालागत ऊर्जेचे असणारे हे वलय म्हणजेच ऑरा किंवा तेजोवलय.  प्रत्येक सजीव जीवाला, मानव, प्राणी, वनसंपत्ती यांना तेजोवलय असते.   Quantum physics नुसार शास्त्रज्ञानी सिद्ध केल्या प्रमाणे सगळं विश्व ऊर्जेने बनलेलं आहे, आणि त्या सिद्धांता नुसार निर्जीव वस्तूंना ही तेजोवलय असते. माणसाचे हृदय हे सर्वात जास्त उर्जाक्षेत्र निर्माण करत असते...आणि त्या खालोखाल मेंदू.  यामुळेच तुम्ही कधी बघितलं असेल, की एखाद्या अनोळखी व्यक्तीला प्रथमच भेटता तेव्हा काही बोलणं न होताही तुम्हाला वाटतं .. हा माणूस काही चांगला वाटत नाही.  किंवा ह्या उलट सुद्धा.. एखाद्याबद्दल त्याच्याशी न बोलताही प्रथम दर्शनी आपले अतिशय चांगले...