🌹दीप पुजा 🌹
कितीही गडद अंध:कार असला तरी सु्र्याच्या उदयाने अंधार नाहीसा होतोै.
सुर्या इतका प्रकाशमान जरी नसलातरी एक छोटासा मिणमिणत्या दिव्यात सुध्दा अंधार मिटविण्याची शक्ति असते.
आपल्या शेतीप्रधान देशात उन्हाळ्यापासुन शेतीची तयारी सुरु होते.आषाढात पिके चांगलीच रुजतात, सगळीकडे गवत पसरलेले असते. आपली घरे शेतात असायची, बाजुला मोकळी जमीन ह्या दिवसात दिसत नसे. आजुबाजुची व शेतातील बीळे पावसामुळे बुजलेली असतात.गवत वाढलेले असते.ह्या गवतात वावरणारी सरपटणारे प्राणी जसे साप , गोम आपल्याला दिसत नाही, चुकिने पाय पडला तर स्वसंरक्षणासाठी ते प्राणी चावतात. आषाढातील पावसाच्या झडीमुळे दिनकराचे दर्शनही क्वचित होते.(अर्थात हल्ली पावसाचे प्रमाण कमी झाल्याने आठवडाभर सुर्य दर्शन नाही असे फार कमी वेळा होते)प्रकाशाची प्रखरता कमी झालेली असते. त्याकाळी विज नव्हती, ‘दाबले बटन की सर्वत्र प्रकाश ‘ अशी स्थिती नव्हती.त्यामुळे दिवे तयार हवे.कारण घरात देखील गोम, विंचु, साप निघत असे.
म्हणुन ही दीप अमावस्या 🎈पणत्यांसाठी वाती , तेल तयार ठेवणे.,की दिवा चटकन तयार हवा.नंतरच्या काळात रॉकेलचे कंदील असत , त्ते काजळी धरत.त्यांची काच साफ करणे, केव्हा ही गरज पडली तर पटकन दिवा तयार हवा ह्याची तयारी करणे.,संतत एक दिवा प्रज्वलित ठेवणे की जेणेकरुन हे उपद्रवी प्राणी आपल्याला दिसतील आणी आपण आपले संरक्षण करु शकु.
आपल्या मनातील अंध:कार दुर करण्यासाठी पुर्ण सुर्य नाही तर एक आशेचा किरणही पुरेसा आहे. असाही संदेश 🪔 प्रज्वलित दीप देतो.
तुम्ही मशागत केली आहे. उत्तम प्रतिचे बीज पेरले आहे. वरुण राजाची कृपा आहे , शेत बहरले आहे, 👌’हे अन्नदाता !शेतकरी मित्रा !तु आता थोडी विश्रांति घे. चांगले पिक येणार, सुगीचे दिवस येणार ‘हा आशेचा किरण शेतकर्याला सुखावतो. आनंद देतो .
अशा ह्या दीप पुजनाने आपणसर्वांनी प्रसन्नतेचा ,आनंदाचा अनुभव घ्यावा ही ईश चरणी प्रार्थना 🙏
Comments
Post a Comment