Skip to main content

चैत्रातील रांगोळी

31/03/17, 6:53 PM - Messages you send to this group are now secured with end-to-end encryption. Tap for more info.
02/04/17, 7:32 PM - Sunil Bhat: ****भाऊचा धक्का

एकेकाळी कोकणी आणि गोंयकार प्रवाशांनी गजबजणाऱ्या मुंबईतील भाऊच्या धक्क्याला यंदा दीडशे वर्षं पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने भाऊच्या धक्क्याच्या इतिहासाची ही सफर....

बंदरापलीकडील रेवसहून अखेरची बोट सातवाजता भाऊच्या धक्क्याला लागली आणि दिवसभर गजबजलेला तो कोकणी माणसाचा सखा भाऊचा धक्का सुस्तावला.
गेली दीडशे वर्षं अव्याहतपणे मुंबईत कोकण्यांची आणि गोवेकरांची सेवा करणाऱ्या या धक्क्याच्या प्रत्येक चिऱ्याला मग वाचा फुटली.
कारण अलिबागहून आलेल्या एका नवश्रीमंत फार्महाऊसवाल्याने "ये कौन भाऊ है जी ? टर्मिनस को जिसका नाम दिया है वो ?" असे कुत्सित उद्गार काढले. गेली दीड शतकं या धक्क्यावर गरीब कोकणवासी मुंबईत मिसळून जाण्यासाठी उतरत असत. त्यांना हा प्रश्न कधी पडला नाही. उलटअभिमान असा की, 'भाऊ' हे घरगुती बिरुद जलवाहतुकीच्या टर्मिनसला दिलं आहे आणि ते अनेक बेस्ट बसेसवर मराठीत झळकत आहे ! कारण याचा जन्मदाता भाऊ अजिंक्य हा पक्का मुंबईकर ! पाठारे प्रभू या मुंबईच्या आद्य रहिवाशांपैकी एक बांधकाम कंत्राटदार.
स्वधन मुंबईच्या हितासाठी खर्चिणारा.
ब्रिटिश राजवटीत कुलाब्याच्या गन फॅक्टरीत हा भाऊ कारकून होता. कॅप्टन रसेल हा तोफखाना विभागातील नामांकित अधिकारी. त्याच्या विभागात एकदा एका मराठी माणसाने चोरी केली. त्याला लष्करी शिस्तीनुसार फटक्यांची शिक्षा सुनावण्यात आली. एका गरीब मराठी तरुणाला सर्वांसमक्ष फटके मिळून त्याची बदनामी होणार, त्यामुळे लक्ष्मण अजिंक्य अस्वस्थ झाला.
त्याने रसेलसाहेबाकडे कामगाराच्या वतीने क्षमायाचना केली. स्वत: देशाभिमानी असलेल्या कॅ. रसेलला, स्वदेशाचा विचार करून एका कामगाराचे फटके वाचविणाऱ्या हेडक्लार्क अजिंक्य या क्षुल्लक कामगाराविषयी आदर निर्माण झाला. कॅ. रसेलने लक्ष्मणला मिठी मारून "यू आर माय ब्रदर !" असे उद्गार काढून त्याची पाठ थोपटली. या उद्गारांमुळे लक्ष्मण अजिंक्यला 'भाऊ' हे नाव पडलं ते कायमचं !
कॅ. रसेलने या भाऊला व्यापारीक्षेत्रात शिरण्यास उद्युक्त केले. मुंबईत असलेली डबकी आणि सांडपाणी तलाव, मुंबईच्याच कचऱ्याने बुजविण्याचं काम त्या काळी सुरू झालं होतं. भाऊला हे कंत्राट मिळालं. कॅ. रसेलसंबंधी कृतज्ञता म्हणून त्याने आपल्या कंपनीचं नाव 'भाऊ रसेल आणि कंपनी' असं दिलं. मुंबईच्या पूर्वकिनाऱ्यावर भरणी घालून कारनॅक बंदर आणि क्लेअर बंदर उभारणीचं कामही ही कंपनी करत होती. तेव्हा आपल्या मराठी माणसांचा जलप्रवास सुखकर व्हावा, यासाठी एक धक्का असावा, असा विचार भाऊ अजिंक्यच्या मनात बळावला. ईस्ट इंडिया कंपनी आणि पोर्ट ट्रस्ट यांची अनुमती मिळवून त्याने तो स्वखर्चाने अमलात आणला.
कोकणच्या जलवाहतुकीसाठी पुढे दीडशे वर्षं वापरात असलेला 'भाऊचा धक्का !' भाऊ रसेल म्हणजेच लक्ष्मण अजिंक्यचं जिवंत स्मारक !
रस्ता वाहतुकीसाठी एसटीचा जन्म झाला नव्हता, त्या काळी अर्ध्या अधिक मुंबईकरांचं मूळ कोकणात होतं. बेशिस्तीच्या खासगी बस वाहतुकीपेक्षाही त्या काळी कोकणातून मुंबईकडे प्रवास जलमार्गानेच व्हायचा. १८६२ साली भाऊ रसेलने हा धक्का बांधण्यापूर्वी उतारूंचे बोटीतून जमिनीवर पाय टेकेपर्यंत खूप हाल व्हायचे. रात्रभर प्रवास करून आलेली बोट समुद्रात लांब कोठे तरी नांगर टाकायची. मग मोठ्या हिंदकळणाऱ्या होड्यांमधून प्रवासी खच्चून भरून, चिखलाने भरलेल्या मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावर पाऊल ठेवायचे. गोदीत कंत्राटदारी करणारा भाऊ हे दृश्य पाहून रोज हळहळत असे. ब्रिटिश सरकार हे हाल निवारण्यासाठी काही करणार नाही, हे लक्षात आल्यानंतर त्यांच्याच पैशांवर गडगंज झालेल्या कंत्राटदार भाऊ अजिंक्यने धक्का स्वत:च उभारण्याचं ठरवलं आणि अल्पावधीतच कोकणी माणसांच्या हक्काचा धक्का तयार झाला.
कालांतराने कोकण आणि गोव्याकडे जाणारी जलवाहतूक बंद पडली तरी १९७० पर्यंत भाऊचा धक्का दिवसभर प्रवाशांनी गजबजलेला असे. सकाळी साडेसहा वाजता रेवस-धरमतरकडे जाणारी छोटी बोट सुटली की, आठ वाजता दाभोळ बंदरापर्यंतची मोठी बोट सुटत असे. लागोपाठ रत्नागिरी, विजयदुर्ग, गोवा या लाइनीवरील अगडबंब बोट सुटत असे. याबोटी निघून गेल्या तरी आदल्या दिवशी कोकण-गोव्याकडे गेलेल्या बोटी परतण्याची वेळ झाल्यामुळे दुपापर्यंत भाऊच्या धक्क्य़ाला उसंत नसेच.
या काळात भाऊच्या धक्क्याचा अवतार रेल्वेच्या कुठल्याही टर्मिनसवर न दिसणारा असा बेंगरुळ. बोट धक्क्याला टेकण्याच्या सुमारास, लाल डगलेवाल्या हमालांचा जथ्था एक गलेलठ्ठ जाडीचा दोरखंड घेऊन तो डेकवर फेकण्यासाठी सज्ज दिसे. मुख्य डेकवर तोंडात चिरूट धरलेला शुभ्र वस्त्रातील गोवेकर कॅप्टन "आऽऽरी माऽऽर, आऽरीऽमाऽऽर" अशी अनाकलनीय ऑर्डर देऊन बोट धक्क्याला समांतर आणीत असे. बोटीवरून खेचून घेतलेला जाड दोरखंड धक्क्यावरील दगडी मनोऱ्याला (कॅपस्टन) बांधला की, हमालांचा जथ्था बोट खेचून धक्क्याला अंगलट करीत असत. सशक्त, चपळ हमाल बोट आणि धक्का यांना जोडणारा सेतू लागण्याच्या अगोदरच कठड्यावरून हनुमानउडी मारून आत घुसून प्रवाशांचा कब्जा घेऊ पाहत.
कोकणी प्रवासी वैतागलेल्या गबाळ्या अवतारात, लाल मातीने रापलेल्या कपड्यात, एकदा भूमीवर केव्हा पाऊल ठेवतो, यासाठी आतुर असे. वांत्या करून थकलेले चेहरे, ढीगभर वळकट्या आणि आंब्या-फणसांची पोती उचलण्याची करामत करताना तो केविलवाणा होई. तरीही आपल्या गावच्या मातीची ऊब घेतलेला कोकणी माणूस नव्या उत्साहाने गजबजलेल्या मुंबईत धनार्जनासाठी मिसळून जात असे.
एके काळी दिवसभर गजबजलेला भाऊचा धक्का आता वयस्कर माणसासारखा सुस्त झाला आहे. आधुनिक कोकण रेल्वे त्याला वाकुल्या दाखवीत असली तरी स्थितप्रज्ञ ज्येष्ठाच्या नात्याने तो निनादत असतो,
"मीच खरा कोकणी माणसाचा जिवाचा सखा !"
03/04/17, 1:59 AM - Mohan jagdale: चैत्रांगण : सुंदर रांगोळी
चैत्र महिना रखरखत्या उन्हात एक नवी बहार घेऊन येतो.पान गळती होऊन आलेली चैत्रपालवी मनाला आल्हाद देते. लाडक्या माहेरवाशिणीच्या रुपाने चैत्र गौरीचे महिन्याभरासाठी घरोघरी आगमन होते. पुजेमधील अन्नपूर्णा निराळ्या आसनावर बसवून तिची मनोभावे पूजा केली जाते. तिला गोड नैवेद्य दाखवून नातेवाईक, आप्तेष्ट, आजुबाजूच्या सुवासिनींना हळदीकुंकवासाठी निमंत्रण केलं जातं.
अन्नपूर्णा म्हणजे साक्षात पार्वतीच असून तिचा वास महिनाभर आपल्या घरी असतो. त्यामुळे तिच्या स्वागतासाठी घरापुढील अंगण सारवून त्यावर रांगोळी काढली जाते. त्या वैशिष्ट्यपूर्ण रांगोळीला चैत्रांगण म्हणतात.
पार्वतीच्या रुपाला शोभेल अशी तिची शस्त्रे म्हणजे शंख, चक्र, गदा, पद्म आणि तिची वाहने म्हणजे गाय, हत्ती, कासव, नाग, गरूड होत.
तिची सौभाग्याची लेणी म्हणजे फणी, करंडा, आरसा, मंगळसूत्र व सुवासिनींच्या ओटीचे ताट असून दारापुढे तुळशी वृंदावन, ॐ, स्वस्तिक, आंबा, श्रीफळ, उंबर- पिंपळ वगैरे पूजनीय वृक्ष ही हिंदू संस्कृतीची प्रतिके म्हणजेच रंगीत रांगोळी भरून काढलेले चैत्रांगण होय.
गौरीचा लाडका पुत्र म्हणजे गणराय! त्याचे पण चित्र काढतात, कारण तो आपल्या आईला घरी नेण्यासाठी आलेला असतो.
अशी ही छान कल्पना या चैत्रांगण रांगोळीमागे आहे. ही रांगोळी काढणाऱ्याचे कौशल्य आहे खरे, पण ही रांगोळी काढल्यानंतर अतिशय सुरेख दिसते.
🐚🔆🌺🐘🐢🐍🐄
03/04/17, 2:00 AM - Mohan jagdale: IMG-20170403-WA0001.jpg (file attached)
03/04/17, 10:16 AM - Sudesh Deshpande: *भूतकाळात डोकावल्या शिवाय*
*मजा काही मिळत नाही*
*मागे वळून पाहिल्यावर*
*हसावं का रडावं कळत नाही*

*साऱ्याच गोष्टी मधे*
*खूप खूप बदल झाले*
*पहिल्या पेक्षा प्रत्येकाला*
*नक्कीच बरे दिवस आले*

*खरं वाटणार नाही पण*
*एवढं सगळं बदललं*
*निगरगट्ट माणूस सुद्धा*
*मुळा सकट हादरलं*

*शाळेतून घरी गेल्या गेल्या*
*दप्तर कोनाड्यात जायचं*
*दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना*
*बाहेर काढल जायचं*

*अहो दप्तर म्हणजे काय*
*वायरची पिशवी असायची*
*जुन्या फाटक्या पुस्तका सोबत*
*फुटकी पाटी दिसायची*

*अभ्यास कर म्हणून कुणी*
*म्हणलंही नाही*
*अन मार्क कमी पडले म्हणून*
*हाणलंही नाही*

*कोणताही ऋतू असो*
*काळपट चहा असायचा*👌
*तडकलेल्या बशीवर*
*कानतुटका कप दिसायचा*

*बारा महिने अनवाणी पाय*
*चप्पल म्हणजे श्रीमंती*
*पायाला चटके बसायचे*
*पण सगळ्या गावात हिंडायचे*

*कुणाचं गुर्हाळ लागलं की*
*चला रस प्यायला*
*खळे दळे लागले की*
*चालले शेतात झोपायला*

*मरणाची गरिबी होती*
*पण मजा मात्र खूप*
*लग्ना कार्यात माणसं , नाती*
*व्हायची एकरूप*

*अमावस्येच्या दिवशी पोरं*
*मारुतीच्या पारावर*
*नारळाच्या टूकड्यासाठी*
*एकमेकाच्या अंगावर*

*ओ मामा द्या नं , ओ मामा द्या नं*
*एकच गलका व्हायचा*
*रेटा रेटी केल्यामुळं*
*सदरा टरकून जायचा*

*पाहुण्याला पाहुणचार म्हणून*
*खिचडी भजे व्हायचे*
*तेवढ्यातच सारयांचे*
*डोळे भरून यायचे*

*तेलच्या-गुळवणी आणि पापडांची*
*काय मामलात होती*
*तरीही त्या माणसां मधे*
*माणुसकी होती*

*रात्र रात्र गप्पा व्हायच्या*
*डोळ्यात यायचं पाणी*
*आडपडदा न ठेवता*
*दुःखाची व्हायची गाणी*

*कुठे गेला तो साधेपणा*
*कुठे गेलं ते सुख ?*
*खरं सांगा पहिल्या सारखी*
*लागते का आता भूक ?*

*इतकुसाक पेढ्याचा तुकडा*
*मिडकू मिडकू खायचा*
*कधी तरी कुणी तरी*
*प्रसाद म्हणून द्यायचा*

*सारं सारं संपून गेलं*
*आता पैसा बोलत असतो*
*माणूस मात्र भ्रमिष्ठा सारखा*
*खोटं खोटं डोलत असतो*

*पेढ्याच्या बाॅक्स कडे*
*ढुंकूनही कुणी पहात नाही*
*एवढंच काय पहिल्या सारख्या*
*मुंग्याही लागत नाही*

*सुखाचं बोट कधी सुटलं*
*आपल्या लक्षात आलं नाही*
*श्रीमंतीत सुख मिळेल वाटलं*
*तसं काही झालं नाहीे*
*ते सुख आणि वैभव*
*पुन्हा घरात येईल का ?*
*चिरेबंदी वाड्या मधून*
*हसण्याचा आवाज येईल का?*

SOURCE UNKNOWN

Chat history is attached as "WhatsApp Chat" file to this email.

Comments

Popular posts from this blog

*काय वाढले पानावरती*

गदिमांची अफाट काव्य प्रतिभा*       *जेवणावळ कशी असावी याचे जबरदस्त वर्णन गदिमांनी आपल्या या कवितेत केले आहे.* हे वर्णन वाचताना वाढलेले भरगच्च घमघमीत पान जर तुमच्या डोळ्यासमोर नाही आले तरंच नवल...! *काय वाढले पानावरती..!* काय वाढले  पानावरती,  ऐकून घ्यावा थाट संप्रती, धवल लवण हे पुढे वाढले,  मेतकूट मग पिवळे सजले आले लोणचे बहु मुरलेले,  आणि लिंबू रसरसलेले, किसून आवळे मधुर केले, कृष्णा काठचे वांगे आणले, खमंग त्याचे भरित केले, निरनिराळे चटके नटले, चटण्यांचे बहु नवे मासले, संमेलनची त्यांचे भरले, मिरची खोबरे ती सह ओले,  तीळ भाजूनी त्यात वाटले, कवठ गुळाचे मिलन झाले, पंचामृत त्या जवळी आले, वास तयांचे हवेत भरले, अंतरी अण्णा अधीर जाहले! भिजल्या डाळी नंतर आल्या, काही वाटल्या काही मोकळ्या, काही वाटुन सुरेख तळल्या,  कोशिंबिरी च्या ओळी जमल्या, शुभ्र काकड्या होत्या किसल्या, मुळा कोवळा मिरच्या ओल्या,  केळी कापून चकल्या केल्या, चिरुन पेरुच्या फोडी सजल्या, एकरूप त्या दह्यात झाल्या, भाज्या आल्या आळू-घोसाळी, रान कारली वांगी काळी,  सुरण तोंडली आणि पडवळी, चुका चाकवत मेथी कवळी, चंदन बटवा भेंडी कवळी, फणस कोवळ...

वातींचे प्रकार

*वातींचे प्रकार  सगळ्यांच्या आग्रहाखातर काही मला माहिती असलेले वातीचे प्रकार सांगते..  *नंदादीप वात*  किंवा समई वात तेलाच्या दिव्यासाठी-- ही 5,7,9 पदरी असते शक्यतोवर 5 किंवा 7 पदरी असते.. ही रोज पूजेच्या वेळेस लावतात.. *बेलवात*-- ह्या श्रावण महिनाभर लावतात-- एकाला जोडून एक अश्या 3 वाती करतात (4+4+3 पदरी) टोटल 11 पदर.. ह्या कोणी रोज महिनाभर 11 वाती लावतात कोणी फक्त सोमवारी लावतात... *शिवरात्रवात*-- महाशिवरात्रीला 1100 पदराची वात तुपात भिजवून लावतात.. *वैकुंठवात* --350 पदरी आपल्या हाताची वितभर( करंगळी ते अंगठा लांब करून मोजलेले अंतर) करायची ती वैकुठंचतुर्दशी ला लावतात.. एक पुस्तक वगैरेवर मोजून मग त्यावर गुंडाळतात... *टिपूर*--तीन पदराच्या जोडून (365 +365) जोडवाती म्हणतात त्या त्रिपुरारी पौर्णिमेला लावतात.. *अधिक महिन्याची वात*--- 33 पदरी 33 वाती , 33 फुलवाती तुपात भिजवून लावतात .. कोणी महिनाभर लावतात कोणी एकदाच लावतात.. *कार्तिक एकादशी पासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत* 3 पदरी 105 वाती लावतात.. कोणी पौर्णिमेलाच 105 वाती लावतात.. *काडवाती*-- अंबाडीच्या कोरड्या काडीला कापूस गुंडाळू...

पांढरी रूई किंवा मंदार

#रानफूले...... या सदरातील आजचे ६६वे फूल आहे *पांढरी रूई* वा *मंदार* हिंदूधर्मशाश्त्रात अत्यंत महत्वाचे लक्ष्मीचे झाड म्हणून गणले गेलेली ही वनस्पती हल्ली खुपजणांनी दारात लावलेली दिसते. जुन-जुलै मधे पावसात हिचे बि रूजते व  हळू हळू वाढत राहते, आठ ते दहा महिन्यात फुले येतात . गुच्छामधे येणारी फुले दूरूनही ओळखू येतात  या मधे जांभळसर रंगाच्या फुलांची रूई जास्त प्रचलीत आहे. कश्याही जमीनीत, मातीत, कमी पावसात पण येते . फुलांचे परागीभवन किटकांमार्फत होते व फलनपण होते.कप्पे असलेल्या शेंगेमधे(पाँड) मऊ मऊ कापूसतंतू असलेल्या बिया असतात  (या कापसाची ऊशी अत्यंत मुलायम असते)त्या सुकल्या की मार्च एप्रील मधे तडकतात व बिया हवेत ऊडतात , कापसामुळे वार्याने वहन होऊन बिजप्रसार होतो.मातीत जाऊन पडली की येणार्या पावसाळ्यात रूजतात.जाड जाड मोठी मोठी पाने शनिमहाराजांना हार करून घातली जातात.महादेवाला प्रिय असलेली हि वनस्पती   पण बहूपयोगी आहे. Calotropis gigantea असे वनस्पतीशाश्त्रीय नांव असलेली हि वनस्पती पण औषधी आहे. याचा चिक जर पायात काटा वा काच गेली तर त्यावर लावला असता जखम न  चिडता त...