Skip to main content

माझा २७ वर्षाचा प्रवास

लग्न हा स्त्री च्या आयुष्यातला एक game changing event असतो। माझी पिढी तशी भाग्यवानच । हवे ते शिक्षण घेता येणारी आणि आपले लग्ना विषयी चे मत ठामपणे सांगणारी, बहुदा ही पहिलीच पिढी। माहेरी असे पर्यंत शाळा, कॉलेज, खेळ, इतर छंद जोपासणारी। कधी मधी आवडीने एखादा पदार्थ करणारी किंवा वेळ आलीच तर स्वयंपाकघर सांभाळणारी, एरव्ही नाही। आणि मग मनासारखे शिक्षण घेऊन करिअर कडे पाऊल घेत, स्वतःच्या पायावर उभी राहणारी, भावी आयुष्याचे स्वप्न रंगवणारी। त्यातलीच एक मी।।
आकाशभरारी घेण्याची उभारी असताना, लग्नाच्या उंबरठ्यावर मात्र बरीच ठेचकाळली। वकील मुलगी नको, उगाच घरात आणली तर एकाचे दोन होतील, घरातच वकिली डावपेच खेळेल, त्यात स्त्री कायदा बलवान। तर कोणी गव्हर्नमेंट job करणारीच हवी। कोणाचे काही तर कोणाचे काही। बाकीच्या मैत्रिणींचा काय अनुभव आहेत माहीत नाही, पण मला लग्न करताना एक वेगळेच समाजाचे रूप पहावयास मिळाले। तशी मी हळुवार, स्वप्नाळू होते, म्हणजे कवी मन ठेवणारी, त्यामुळे या अनभिज्ञ समाजाचे पोकळ रूप पाहून खूप कीव आली, मी सबला आहे, जगाला कणखर पणे तोंड द्यायची हिम्मत आणि तयारी आहे। मनाचे सर्व कोमल पाश तोडून, झाशीच्या राणी ची हिम्मत बाळगणारी। ज्या घरात असला दुटप्पी पणा असेल, असल्या घरची सून व्हायची नाही। 

न डगमगता, वकिली सुरू होतीच, मुंबई हायकोर्टात मोठमोठया जजेस समोर उभे राहून आपला मुद्दा मांडायचा, विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर न अडखळला द्यायचे, माझ्या confidence ला एक वेगळाच kick मिळत होता। मराठी कुटुंबांचे आणि लग्न करताना अगदी जुन्या विचारात अडकलेल्या पद्धतीची एक भीतीच बसली। 
बाबांचे प्रयत्न मनापासून सुरू होते,  elimination rounds च जास्त असत।  आणि मग आपल्या एकट्या पेक्षा दोघांच्या अपेक्षेत बसेल असे, विलास ची माहिती मिळाली। सासूबाईंनी कटाक्षाने दुपारी 2 ते 4 भेटू नये असे माहितीत स्पष्ट लिहले होते। रविवारी मीरा रोड ला दोघांचे काम आहेच, काम झाले की मी भेटून येतो, बाबा म्हणाले। काम 2 वाजता आटोपले, मी घरी यायला निघाले आणि बाबा वैद्यांकडे भेटायला जाणार होते। पण 2 ते 4 भेटायचे यायला येऊ नका असे लिहिले असताना, मी जाणार नाही, 2 तास इथेच थांबतो मग निघतो। बाबा पण कायदा तज्ञ होते, rules and regulations, ते नाही पाळणार तर कोण पाळणार? मी निघून आले, काय करायचे ते करू दे। 
संध्याकाळी घरी आले तर आनंदी वाटले। सर्व माहिती प्रमाणे निघाले। दुसऱ्या रविवारी आमच्या घरी भेटायचे ठरले। 
आई आणि मुलगा (विलास) आले। फॉर्मल बोलणे झाले, पण मात्र मी आवर्जून विचारले, तुम्हाला नोकरी करणारी मुलगी हवी आहे का? विलास नाही म्हणाला, माझी अशी काही अट नाही। हुश्श। finally something हटके वाटले।  दुसऱ्याच दिवशी वैद्यांकडनं होकाराचा फोन आणि पाठोपाठ पत्र आले। तिसऱ्या रविवारी engagement आणि मग 1 1/2 महिन्यांनी लग्न ..योग आला यालाच बहुतेक म्हणतात। 
माझा नवीन प्रवास सुरु झाला। अनेकवेळा मला मीच नवखी वाटले, दुरून डोंगर साजरे किंवा जावे त्याच्या वंशा म्हणतात तेच खरे। स्वतः ला तासत एक संपूर्ण नवीन असे माझे रूपांतर झाले । हा प्रवास सुरु होऊन आज 27 वर्षे झालीत। अनेक वेळा रुसवे फुगवे , मतभेद झालेत, पण आपल्या ला आहे तशी पत्ककरणारा हा एकमेव आहे, तोच शाश्वत आहे, असे म्हणत, पुढे पुढे चालत राहिले। सतत hovercraft सारखा भिरभिरणारा, लांब असला तरी लक्ष ठेवणारा। इतक्या वर्षांचा प्रवास एवढ्या कमी शब्दात मांडणे खूप अवघड आहे, पण वेळी, तू घरी रहा म्हणणारा, तर dot.com burst झाला त्यावेळी मला प्रॅक्टिस करायला प्रोत्साहन देणारा। Profession सांभाळताना होणारी धावपळ समजून घेणारा, असा आपल्या गुणांची कदर करणारा जोडीदार मिळायला भाग्यच लागते। गाडी चे एक चाक चांगले असून गाडी वेगाने चालत नाही, त्याकरिता दोन्ही चाके समान असायला हवी। या अनोख्या प्रवासाची आपल्या समोर आज मोकळेपणाने एक पान उलगडले।
आपल्या भरभरून मिळालेल्या शुभेच्छेनी आज आठवणींना उजाळा दिला। काहींचे फोन वर तर काहींचे व्हाट्सअप्प messages, सर्वात भावणारा message आला तो dr वासंती चा। Thanks all.
Life is all about, what you dream and the path you choose to achieve this dream. 
Thanks everyone for your kind wishes and blessings.

Vandana Vilas Vaidya

Comments

Popular posts from this blog

*काय वाढले पानावरती*

गदिमांची अफाट काव्य प्रतिभा*       *जेवणावळ कशी असावी याचे जबरदस्त वर्णन गदिमांनी आपल्या या कवितेत केले आहे.* हे वर्णन वाचताना वाढलेले भरगच्च घमघमीत पान जर तुमच्या डोळ्यासमोर नाही आले तरंच नवल...! *काय वाढले पानावरती..!* काय वाढले  पानावरती,  ऐकून घ्यावा थाट संप्रती, धवल लवण हे पुढे वाढले,  मेतकूट मग पिवळे सजले आले लोणचे बहु मुरलेले,  आणि लिंबू रसरसलेले, किसून आवळे मधुर केले, कृष्णा काठचे वांगे आणले, खमंग त्याचे भरित केले, निरनिराळे चटके नटले, चटण्यांचे बहु नवे मासले, संमेलनची त्यांचे भरले, मिरची खोबरे ती सह ओले,  तीळ भाजूनी त्यात वाटले, कवठ गुळाचे मिलन झाले, पंचामृत त्या जवळी आले, वास तयांचे हवेत भरले, अंतरी अण्णा अधीर जाहले! भिजल्या डाळी नंतर आल्या, काही वाटल्या काही मोकळ्या, काही वाटुन सुरेख तळल्या,  कोशिंबिरी च्या ओळी जमल्या, शुभ्र काकड्या होत्या किसल्या, मुळा कोवळा मिरच्या ओल्या,  केळी कापून चकल्या केल्या, चिरुन पेरुच्या फोडी सजल्या, एकरूप त्या दह्यात झाल्या, भाज्या आल्या आळू-घोसाळी, रान कारली वांगी काळी,  सुरण तोंडली आणि पडवळी, चुका चाकवत मेथी कवळी, चंदन बटवा भेंडी कवळी, फणस कोवळ...

वातींचे प्रकार

*वातींचे प्रकार  सगळ्यांच्या आग्रहाखातर काही मला माहिती असलेले वातीचे प्रकार सांगते..  *नंदादीप वात*  किंवा समई वात तेलाच्या दिव्यासाठी-- ही 5,7,9 पदरी असते शक्यतोवर 5 किंवा 7 पदरी असते.. ही रोज पूजेच्या वेळेस लावतात.. *बेलवात*-- ह्या श्रावण महिनाभर लावतात-- एकाला जोडून एक अश्या 3 वाती करतात (4+4+3 पदरी) टोटल 11 पदर.. ह्या कोणी रोज महिनाभर 11 वाती लावतात कोणी फक्त सोमवारी लावतात... *शिवरात्रवात*-- महाशिवरात्रीला 1100 पदराची वात तुपात भिजवून लावतात.. *वैकुंठवात* --350 पदरी आपल्या हाताची वितभर( करंगळी ते अंगठा लांब करून मोजलेले अंतर) करायची ती वैकुठंचतुर्दशी ला लावतात.. एक पुस्तक वगैरेवर मोजून मग त्यावर गुंडाळतात... *टिपूर*--तीन पदराच्या जोडून (365 +365) जोडवाती म्हणतात त्या त्रिपुरारी पौर्णिमेला लावतात.. *अधिक महिन्याची वात*--- 33 पदरी 33 वाती , 33 फुलवाती तुपात भिजवून लावतात .. कोणी महिनाभर लावतात कोणी एकदाच लावतात.. *कार्तिक एकादशी पासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत* 3 पदरी 105 वाती लावतात.. कोणी पौर्णिमेलाच 105 वाती लावतात.. *काडवाती*-- अंबाडीच्या कोरड्या काडीला कापूस गुंडाळू...

पांढरी रूई किंवा मंदार

#रानफूले...... या सदरातील आजचे ६६वे फूल आहे *पांढरी रूई* वा *मंदार* हिंदूधर्मशाश्त्रात अत्यंत महत्वाचे लक्ष्मीचे झाड म्हणून गणले गेलेली ही वनस्पती हल्ली खुपजणांनी दारात लावलेली दिसते. जुन-जुलै मधे पावसात हिचे बि रूजते व  हळू हळू वाढत राहते, आठ ते दहा महिन्यात फुले येतात . गुच्छामधे येणारी फुले दूरूनही ओळखू येतात  या मधे जांभळसर रंगाच्या फुलांची रूई जास्त प्रचलीत आहे. कश्याही जमीनीत, मातीत, कमी पावसात पण येते . फुलांचे परागीभवन किटकांमार्फत होते व फलनपण होते.कप्पे असलेल्या शेंगेमधे(पाँड) मऊ मऊ कापूसतंतू असलेल्या बिया असतात  (या कापसाची ऊशी अत्यंत मुलायम असते)त्या सुकल्या की मार्च एप्रील मधे तडकतात व बिया हवेत ऊडतात , कापसामुळे वार्याने वहन होऊन बिजप्रसार होतो.मातीत जाऊन पडली की येणार्या पावसाळ्यात रूजतात.जाड जाड मोठी मोठी पाने शनिमहाराजांना हार करून घातली जातात.महादेवाला प्रिय असलेली हि वनस्पती   पण बहूपयोगी आहे. Calotropis gigantea असे वनस्पतीशाश्त्रीय नांव असलेली हि वनस्पती पण औषधी आहे. याचा चिक जर पायात काटा वा काच गेली तर त्यावर लावला असता जखम न  चिडता त...