Skip to main content

संस्कृत हीच ज्ञानभाषा


।।संस्कृत भाषेची किमया।।

                   इंग्रजी भाषेचा अभ्यास करताना एक वाक्य सतत सांगितले जाते ते म्हणजे " A QUICK BROWN FOX JUMPS OVER THE LAZY DOG" या वाक्यच विशेषत्व हे आहे की ह्या वाक्यात इंग्रजी वर्णमालेतील सर्व वर्ण आले आहेत. पण आपण जर पाहिलं तर ह्या वाक्यात काही त्रुटी आढळून येतात जसं की इंग्रजी वर्णमालेत २६ वर्ण असताना इथे मात्र ३३ आले आहेत. O,A,E,U,R ह्यांचा परत परत वापर केला गेला आहे.तसेच A,B,C,D... हा क्रम पाळला नाही ये.
                       तेच जर आपण खालचा श्लोक पाहिला तर संस्कृत भाषेची किमया आपल्याला लक्षात येईल- 
             क:खगीघाङ्चिच्छौजाझाञ्ज्ञोटौठीडढण:।
            तथोदधीन पफर्बाभीर्मयोSरिल्वाशिषां सह।।
अर्थात - पक्ष्यांचं प्रेम,शुद्ध बुद्धीचा,दुसऱ्याच्या बलाच अपहरण करण्यात पारंगत, शत्रू संहारात अग्र, मनाने निश्चल व निर्भीड आणि महासागराच सर्जन करणारा कोण आहे? असा राजा मय ज्याला त्याच्या शत्रूंचे देखील आशीर्वाद प्राप्त आहेत. 
                         ह्यात जर आपण पाहिलं तर संस्कृत वर्णमालेतील सर्व ३३ व्यंजन आले आहेत आणि ते ही अगदी क्रमाने. तसेच जर आपण संस्कृत वर्णमाला पाहिली तर ती सर्वात वैज्ञनिकदृष्ट्या तयार झालेली आहे असे आपल्या लक्षात येईल. 
स्वर - अ आ इ ई उ ऊ ऋ ऌ ए ऐ ओ औ अं अः।
व्यंजन - 
कंठ्य-      क   ख   ग   घ   ङ ।
तालव्य-    च   छ   ज   झ   ञ ।
मुर्ध्न्य-       ट   ठ   ड    ढ   ण ।
दन्त्य-       त   थ   द   ध    न ।
ओष्ठ्य-    प   फ   ब   भ   म ।
मृदु व्यञ्जन - य  र  ल  व  श  ष  स ।
महास्फुट प्राण- ह  क्ष । 
                      वरील वर्गीकरण जरी पाहिलं तरी आपल्या लक्षात येईल की किती वैज्ञानिक भाषा आहे संस्कृत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वर वेगळे व्यंजन वेगळे इंग्रजी सारखं सर्व एकत्र नाही. परत व्यंजनातही अजून वर्गीकरण कंठातून येणारे व्यंजन कंठ्य, तालातून येणारे तालव्य, टाळू आणि जिभेच्या द्वारे मुर्ध्न्य आणि ओठाद्वारे  ओष्ठ्य. त्यातही कंठ ते ओठ क्रम अगदी योग्य. परत पुढे जर पाहिले तर प्रत्येक वर्गातील १ व ३ व्यंजन अल्पप्राण(कमी श्वास लागणारे) आणि २ व ४ व्यंजन महाप्राण(जास्त श्वास लागणारे). प्रत्येक वर्गातील पाचवे व्यंजन म्हणजे अनुनासिक अर्थात नाकाचा वापर करून उच्चारावे लागते. त्यामुळेच संस्कृत भाषा ही संगणकासाठी सगळ्यात योग्य भाषा आहे असं वैज्ञानिकांच मत आहे. 
                            संस्कृत भाषेची जादू बघायची झाल्यास आपण संस्कृतातील वेगवेगळ्या साहित्याचा अभ्यास करून पाहू शकतो. त्यातील काही विशिष्ट उदाहरणे खाली देत आहे.
                           'माघ' नावाचे एक महाकवी भारतामध्ये होऊन गेले. त्यांनी त्यांच्या 'शिशुपालवधम्' ह्या महाकाव्यात केवळ 'भ' आणि 'र' ह्यांचा वापर करून एक श्लोक तयार केला आहे. तो असा -
                  भूरिभिर्भारिभिर्भीभीराभूभारैरभिरेभिरे।
                  भेरीरेभिभिरभ्राभैरूभीरूभिरिभैरिभा:।।
 अर्थात - जमिनीला पण वजनदार वाटेल अशा, वाद्ययंत्राप्रमाणे आवाज काढणाऱ्या आणि मेघाप्रमाणे कृष्णवर्ण असणाऱ्या निर्भीड हत्तीने आपल्या शत्रू हत्तीवर हल्ला केला.
                           तसेच 'किरातार्जुनीयम्' ह्या काव्य संग्रहात महाकवी 'भारवि' ह्यांनी केवळ 'न' चा वापर करून श्लोक तयार केला आहे.
                    न नोननुन्नो नुन्नोनो नाना नाना नना ननु।
                     नुन्नोSनुन्नो ननुन्नेनो नानेना नन्नुनन्नुनुत्।।
अर्थात - जो मनुष्य युध्दात आपल्यापेक्षा दुर्बलाकडून घायाळ होतो तो खरा मनुष्य नाहीये, जो आपल्यापेक्षा दुर्बलांना घायाळ करतो तो ही खरं मनुष्य नाही ये, ज्या मनुष्याचा स्वामी घायाळ नाही ये तो घायाळ नाही ये आणि घायाळ मनुष्याला घायाळ करणारा खरा मनुष्य नाही ये. 
                             पुढे जर पाहायला गेलं तर महायमक अलंकरातील एक श्लोक आहे. ह्याचे चारही पद सारखे आहेत पण प्रत्येक पदाचा अर्थ भिन्न आहे. 
                      विकाशमीयुर्जगतीशमार्गणा 
                      विकाशमीयुर्जगतीशमार्गणाः।
                      विकाशमीयुर्जगतीशमार्गणा 
                      विकाशमीयुर्जगतीशमार्गणाः॥
अर्थात - अर्जुनाचे बाण सर्वत्र व्याप्त झाले आहेत. ज्यामुळे शंकरांचे बाण खंडित झाले आहेत. ह्याप्रकारे अर्जुनाचे रणकौशल पाहून दानवांचा पराभव करणारे शंकरांचे गण आश्चर्यचकित झाले आहेत. शंकर आणि तपस्वी अर्जुनाचे युद्ध पाहण्यासाठी शंकरांचे भक्त आकाशात आले आहेत. 
                            हे वाचून तुम्हाला संस्कृत भाषेची किमया लक्षात आलीच असेल. तेंव्हा "भाषाणां जननी" असणाऱ्या संस्कृत भाषेचा प्रत्येकाला अभिमान असायलाच हवा. 
                         शेवटी माघ कवींनी केलेल्या कृष्णाच्या स्तुतीने थांबतो. 
                      दाददो दुद्ददुद्दादी दाददो दूददीददोः।
                      दुद्दादं दददे दुद्दे दादाददददोऽददः॥
अर्थात - श्री कृष्ण, प्रत्येकास वरदान देणारा, दुराचारी माणसाचा छळ करणारा‌ व त्यांना शुद्ध करणारा, जो आपल्या हातांनी दुसऱ्यांना त्रास देणाऱ्या दुराचारी लोकांचा नाश करू शकतो. त्या कृष्णाने शत्रूवर आपले वेदनादायक बाण मारले.
धन्यवाद..!!
जयतु संस्कृतम्..!!
                        - विश्वंभर मुळे
                           (गोंदीकर)

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
तं भूसुतामुक्तिमुदारहासं वन्दे यतो भव्यभवं दयाश्रीः ||१||
श्रीयादवं भव्यभतोयदेवं संहारदामुक्तिमुतासुभूतं ||२||

या श्लोकामध्ये पहिल्या चरणात श्रीरामाची स्तुती आहे आणि दुसर्या चरणात श्रीकृष्णाची . 

या श्लोकाचे वैशिष्ठ्य असे की यातले दुसरे चरण पहिल्या चरणाच्या उलट्या क्रमात आहे .
  
*उगाच नाही संस्कृतला ज्ञानभाषा म्हणत*
👆👆👆👆👆
Very interesting

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Comments

Popular posts from this blog

*काय वाढले पानावरती*

गदिमांची अफाट काव्य प्रतिभा*       *जेवणावळ कशी असावी याचे जबरदस्त वर्णन गदिमांनी आपल्या या कवितेत केले आहे.* हे वर्णन वाचताना वाढलेले भरगच्च घमघमीत पान जर तुमच्या डोळ्यासमोर नाही आले तरंच नवल...! *काय वाढले पानावरती..!* काय वाढले  पानावरती,  ऐकून घ्यावा थाट संप्रती, धवल लवण हे पुढे वाढले,  मेतकूट मग पिवळे सजले आले लोणचे बहु मुरलेले,  आणि लिंबू रसरसलेले, किसून आवळे मधुर केले, कृष्णा काठचे वांगे आणले, खमंग त्याचे भरित केले, निरनिराळे चटके नटले, चटण्यांचे बहु नवे मासले, संमेलनची त्यांचे भरले, मिरची खोबरे ती सह ओले,  तीळ भाजूनी त्यात वाटले, कवठ गुळाचे मिलन झाले, पंचामृत त्या जवळी आले, वास तयांचे हवेत भरले, अंतरी अण्णा अधीर जाहले! भिजल्या डाळी नंतर आल्या, काही वाटल्या काही मोकळ्या, काही वाटुन सुरेख तळल्या,  कोशिंबिरी च्या ओळी जमल्या, शुभ्र काकड्या होत्या किसल्या, मुळा कोवळा मिरच्या ओल्या,  केळी कापून चकल्या केल्या, चिरुन पेरुच्या फोडी सजल्या, एकरूप त्या दह्यात झाल्या, भाज्या आल्या आळू-घोसाळी, रान कारली वांगी काळी,  सुरण तोंडली आणि पडवळी, चुका चाकवत मेथी कवळी, चंदन बटवा भेंडी कवळी, फणस कोवळ...

वातींचे प्रकार

*वातींचे प्रकार  सगळ्यांच्या आग्रहाखातर काही मला माहिती असलेले वातीचे प्रकार सांगते..  *नंदादीप वात*  किंवा समई वात तेलाच्या दिव्यासाठी-- ही 5,7,9 पदरी असते शक्यतोवर 5 किंवा 7 पदरी असते.. ही रोज पूजेच्या वेळेस लावतात.. *बेलवात*-- ह्या श्रावण महिनाभर लावतात-- एकाला जोडून एक अश्या 3 वाती करतात (4+4+3 पदरी) टोटल 11 पदर.. ह्या कोणी रोज महिनाभर 11 वाती लावतात कोणी फक्त सोमवारी लावतात... *शिवरात्रवात*-- महाशिवरात्रीला 1100 पदराची वात तुपात भिजवून लावतात.. *वैकुंठवात* --350 पदरी आपल्या हाताची वितभर( करंगळी ते अंगठा लांब करून मोजलेले अंतर) करायची ती वैकुठंचतुर्दशी ला लावतात.. एक पुस्तक वगैरेवर मोजून मग त्यावर गुंडाळतात... *टिपूर*--तीन पदराच्या जोडून (365 +365) जोडवाती म्हणतात त्या त्रिपुरारी पौर्णिमेला लावतात.. *अधिक महिन्याची वात*--- 33 पदरी 33 वाती , 33 फुलवाती तुपात भिजवून लावतात .. कोणी महिनाभर लावतात कोणी एकदाच लावतात.. *कार्तिक एकादशी पासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत* 3 पदरी 105 वाती लावतात.. कोणी पौर्णिमेलाच 105 वाती लावतात.. *काडवाती*-- अंबाडीच्या कोरड्या काडीला कापूस गुंडाळू...

पांढरी रूई किंवा मंदार

#रानफूले...... या सदरातील आजचे ६६वे फूल आहे *पांढरी रूई* वा *मंदार* हिंदूधर्मशाश्त्रात अत्यंत महत्वाचे लक्ष्मीचे झाड म्हणून गणले गेलेली ही वनस्पती हल्ली खुपजणांनी दारात लावलेली दिसते. जुन-जुलै मधे पावसात हिचे बि रूजते व  हळू हळू वाढत राहते, आठ ते दहा महिन्यात फुले येतात . गुच्छामधे येणारी फुले दूरूनही ओळखू येतात  या मधे जांभळसर रंगाच्या फुलांची रूई जास्त प्रचलीत आहे. कश्याही जमीनीत, मातीत, कमी पावसात पण येते . फुलांचे परागीभवन किटकांमार्फत होते व फलनपण होते.कप्पे असलेल्या शेंगेमधे(पाँड) मऊ मऊ कापूसतंतू असलेल्या बिया असतात  (या कापसाची ऊशी अत्यंत मुलायम असते)त्या सुकल्या की मार्च एप्रील मधे तडकतात व बिया हवेत ऊडतात , कापसामुळे वार्याने वहन होऊन बिजप्रसार होतो.मातीत जाऊन पडली की येणार्या पावसाळ्यात रूजतात.जाड जाड मोठी मोठी पाने शनिमहाराजांना हार करून घातली जातात.महादेवाला प्रिय असलेली हि वनस्पती   पण बहूपयोगी आहे. Calotropis gigantea असे वनस्पतीशाश्त्रीय नांव असलेली हि वनस्पती पण औषधी आहे. याचा चिक जर पायात काटा वा काच गेली तर त्यावर लावला असता जखम न  चिडता त...