अक्षय तृतीया
अक्षय तृतीयेचे महत्त्व:
अक्षय तृतीयेला ब्रह्मा व श्रीविष्णु यांच्या मिश्र लहरी उच्च देवतांच्या लोकांतून, म्हणजे सगुणलोकांतून पृथ्वीवर येतात. त्यामुळे पृथ्वीवरील सात्त्विकता १० टक्क्यांनी वाढते.
अर्थ : सदोदित किंवा सातत्याने सुख व समृद्धि प्राप्त करून देणार्या देवतेची अक्षय तृतीयेच्या दिवशी कृतज्ञतेचा भाव ठेवून केलेल्या उपासनेमुळे आपल्यावर होणार्या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही. देवतेची कृपादृष्टि सदोदित आपल्यावर रहाण्यासाठी अक्षय तृतीयेला कृतज्ञ भाव ठेवून तिची उपासना करणे.
मूर्तिका पूजन : सदोदित कृपादृष्टि ठेवणार्या मूर्तिकेमुळेच आपल्याला धान्यलक्ष्मी, धनलक्ष्मी व वैभवलक्ष्मी यांची प्राप्ति होते. अक्षयतृतिया हा दिवस म्हणजे कृतज्ञ भाव ठेवून मूर्तिकेची उपासना करण्याचा दिवस.
मातीत आळी घालणे व पेरणी : पावसाळा तोंडावर घेऊन अक्षय तृतीया येते. वर्षाऋतूच्या आगमनाचा, म्हणजे मृग नक्षत्राचा व या तिथीचा घनिष्ट संबंध आहे. (घनिष्ट संबंध म्हणजे शुद्ध किंवा चांगल्या हेतूने परस्परांशी असेलेले घट्ट संबंध.) गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नांगरलेल्या शेतजमिनीचे अक्षय तृतीयेपर्यंत मशागत करण्याचे काम पूर्ण करावे. (मशागत म्हणजे नांगरलेल्या शेतजमिनीची साफसफाई करून खत मिश्रित मातीच्या थरांना खालीवर करणे.) अक्षय तृतीयेच्या दिवशी मशागत केलेल्या जमिनीतील मूर्तिकेचे कृतज्ञ भाव ठेवून पूजन करावे. त्यानंतर पूजन केलेल्या मूर्तिकेमध्ये आळी घालावीत व त्या आळयांमध्ये बियाने पेरावे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बियाणे पेरण्यास सुरुवात केल्यास त्या बियाणांपासून विपुल धान्य पिकते व कधीही बियाणाला तोटा पडत नाही. त्यामुळे वैभव प्राप्त होते. (बियाणे म्हणजे मळणीतील धान्य आपल्या आवश्यकतेनुसार बाजूला काढून घेऊन उरलेले धान्य स्वत:ला व इतरांना पुढच्या पेरणीसाठी राखून ठेवणे.)
(पूर्वीच्या काळी पावसाचे प्रमाण जास्त असल्याकारणाने एकदा पावसाला सुरुवात झाली की, सतत पाऊस पडत राहिल्याने सुपिक जमिनीतील चिकट मातीमध्ये आळी करून बियाणे पेरणी करणे शक्य होत नसे. त्यामुळे पावसाळा तोंडावर असतांना मशागत केलेल्या भुसभूशीत मातीमध्ये बियाणे पेरणे सोपे होत असे. अक्षय तृतियेच्या शुभमूहुर्तावर म्हणजेच पावसाला सुरुवात होण्यापूर्वी पेरणीची कामे पूर्ण केली जात असत. हल्ली पावसाचे प्रमाण अगदीच कमी असल्याने व शास्त्राप्रमाणे पेरणी न केल्याने जमिनी नापिक होत चालल्या आहेत व कसदार धान्य पिकण्याचे प्रमाणही कमी झाले आहे.)
वृक्षरोपण : अक्षय तृतियेच्या शुभमुहूर्तावर आळी करून लावलेल्या फळबागा भरघोस फळ उत्पादन देतात. तसेच आयुर्वेदात सांगितलेल्या औषधी वनस्पतीही अक्षय तृतियेच्या मुहूर्तावर रोवल्यास या वनस्पतींचा क्षय होत नाही, म्हणजेच औषधी वनस्पतींचा तुटवडा भासत नाही.
अक्षय तृतियेच्या दिवशी श्रीविष्णुसहित वैभवलक्ष्मीच्या प्रतिमेचे पूजन करण्याचे महत्त्व : अक्षय तृतियेच्या दिवशी राजाने किंवा प्रजेच्या पालनपोषणाची जबाबदारी असणार्यांनी सामूहिकरीत्या राजवाड्यात किंवा सामूहिक पूजाविधीच्या ठिकाणी श्रीविष्णुसहित वैभवलक्ष्मीच्या प्रतिमेचे कृतज्ञतेचा भाव ठेवून भक्तिभावाने पूजन करावे. यामुळे प्रजा सुखी व समृद्ध होते. लक्ष्मीदेवीची कृपाच आपल्यावर होत नाही; कारण लक्ष्मीदेवी ही श्रीविष्णूची शक्ति आहे. जेथे श्रीविष्णूलाच बोलावणे नाही, तर त्याच्यासोबत किंवा त्याच्यात असणारी त्याची शक्ति कशी बरे पूजास्थळी येऊन कृपा करेल ? म्हणून कोणत्याही रूपातील श्रीलक्ष्मी पूजनाच्या वेळी श्रीविष्णूला प्रथम आवाहन करावे व नंतर श्रीलक्ष्मीलाही आवाहन करावे. त्यामुळे उपासकाला लक्ष्मीतत्त्वाचा जास्तीत जास्त लाभ होतो.
अक्षयत्रितीया : - आकीदी .... ....युगादी.....
एक संकलन ……..
· अक्षय = अमर , क्षय न होणारा . त्रितीया = चंद्रमासाचा तिसरा दिवस.
· त्रेता युगाचा प्रथम दिवस . ( त्रेता युगाची सुरूवात ) .
· परशुरामाचा जन्मदिवस (परशुराम चिरंजीव )
· पांडवांना वनात असतांना श्री कृष्णांनी सूर्य थाळी दिली...अक्षय पात्र.
· श्री गणेशांनी महर्षी व्यासांच्या विनंती वरून महाभारत लिहीण्यास प्रारंभ. केला.
· भगीरथाच्या अथक प्रयत्ना नंतर गंगावतरण. स्वर्ग लोकातून गंगा पृथ्वीवर या दिवशी आली.
· श्री बसवेश्वर जयंती .
· श्री आध्य शंकराचार्य जयंती.
· श्री नरनारायण आवतार.
· श्री हायग्रीव आवतार.
· या दिवसा पासुन श्री बद्रिनाथ मंदिराचे दरवाजे उघडतात.
· याच दिवशी श्री सुदामा श्रीकृष्णांना भेटावयास गेले, आशी आख्याईका सांगतात की श्री लक्ष्मीदेवीने त्यांच्यावर ( सुदाम्या वर ) कृपा करण्याची इच्छा व्यक्त केली. श्रीकृष्णांनी सांगितले की तो योग सुदाम्याच्या सांप्रत भाग्यात नाही. पण श्री लक्ष्मीदेवीच्या इच्छेचा मान ठेवण्यासाठी भगवंतांनी सुदाम्याची पाध्य पूजा केली व कुंकू लवण्याचे निमित्त करून जुनी भाग्यरेषा पुसून नविन भाग्यरेषा कढली त्यामुळे मग श्री लक्ष्मीदेवीने सुदाम्याला भरभरून आशिर्वादित केले व त्याचे दारिद्र्य कायमचेच नष्ट केलफ़ तो हाच दिवस. या कर्म प्रधान विश्वात परमेश्वराने कोणाचे भाग्यच बदलले याचे हे एकमेव उदाहरण आहे असे म्हणतात.
· म्हणुन हा दिवस श्री लक्ष्मीदेवीला कायमचे घरी आणन्याचा माणतात व श्री लक्षिमीदेवीची पूजा करून पूरणावरणाचा नैवैध्य दाखवितात.
· दान धर्म करण्याचा दिवस. ( कारण दिल्याने श्री लक्ष्मीतत्व वाढते ) .
· पुण्य गोळा करण्याचा दिवस.
· भूतकाळ विसरण्याचा दिवस.
· सर्वांना क्षमा करण्याचा दिवस.
· वाईट सवयी टाकून चांगल्या सवयी लावून घेण्याचा दिवस.
सर्वांना अक्षय त्रितीयेसाठी हर्दिक शूभेच्छा !!! ....... शूभं भवतू .......
🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺
आपणा सर्वांना अक्षय्यतृतीयेच्या शुभेच्छा.
जेव्हा सुर्य एकाच दिवशी दोन तिथी पाहतो तेव्हा एका तिथीचा क्षय झाला असे समजतात.
अक्षय म्हणजे ज्याचा क्षय होत नाही. वैशाख शुक्ल तृतीया या तिथीचा कधीही क्षय होत नाही, म्हणून तीला अक्षय तृतीया म्हणतात.
आजच्या दिवशी केलेल्या संकल्पांचा कधीही क्षय होत नाही अशी अनुभुती आहे. आणि म्हणूनच आज तुमच्या भविष्याच्या दृष्टीने नविन संकल्प धरा.
💐तुम्हा सर्वांना अक्षय्य शुभेच्छा💐
Comments
Post a Comment