बिन भाजीपाल्याचे
कोरोना लॉकडाऊन स्पेशल
गावरान वऱ्हाडी आयटम
——————————-
घरातच राह्यन रे बाबू
बाहेर हिंडतं काहून ?
भेव नाही लागत काय
हे आकोल्याची हालत पाहून ?
असा कोनता तुह्यावाला
झेंडू दाटून आला ?
कायच्यासाठी पाह्यजे बे
रोजच्या रोज भाजीपाला ?
घरच्या घरीच करून पाह्यजो
रोज एक एक ॲटम
एकदा बी रिपीट नको करू
तब्येत राहीन टमाटम
आपले गावरान जिन्नस
भल्ले मस्त पचतात
ईनाकारन कोरोनात तुले
चोचले जिभीचे सुचतात
बरी हाय ना पध्दत
बाबू आपली साधी
हे घे पाठोतो तुले
तीस दिवसाची यादी
बेसन ऊर्फ चुन
ताकातलं बेसन
भडगोये
कळीगोये
मोकयं बेसन
पातोळी
खांडोळी
कांद्यातले कनोर
वळ्या
कयन्याच्या वळ्या
करोळा
सेवभाजी
कांदयाची भाजी
मुंगाची दाय
उळदाची दाय
चवळीची दाय
मठाची दाय
तुरीचं वरण
तुरीचं वरण फोळणीचं
मुंगाचा गोया
उळदाचा गोया
पापळाचा खुळा
सयतवेल दाय
लाल मिरचीची चटणी
हिरवा ठेचा
लसणाची चटणी
शेंगदाण्याची चटणी
शेंगदाण्याची पतली भाजी
सार
हरबऱ्याच्या दायीची चटणी
वरण भात
खिचळी तुरीची
खिचळी मुंगाची
फोळणीची खिचळी
फोळणीचा मसाला भात
खिर पुरी
कयण्याची भाकर
दुध भाकर
गुळपोयी
रोडगे
बाफले
बिट्टया
चुरमा
शिरापुरी
गुलगुले
भज्याईची भाजी
मठाच्या घुगऱ्या
तुरीच्या घुगऱ्या
बरबटीच्या घुगऱ्या
ठोंबरा
फयं
आंबील
कथली
कळी
पोयाईचा चिवळा
बेसनातले कुटके
शेव्व्या
फोळणीच्या शेव्व्या
चिचोणी पुरणाची पोयी
बेसनाचे लाळू पुरी
रव्याचे लाळू पुरी
मुंगाचा शिरा पुरी
धपाटे
पराठे
बिबळ्या
सांडोया कुळ्ळया
खारोळ्या
ऊसऱ्या
ऊसळ
सातुचं पिठ
पोयाईचा चिवळा
आजुन कितीक खाशीन ?
रामराम !
भंडारे पेशॅलिस्ट
झांगोराम झाबूजी झोडपे (पंगत केसरी)
झाडूवाला झोपडपट्टी
झारेवाडी
Comments
Post a Comment