Skip to main content

Posts

श्री गजानन महाराज यांची पुण्यतिथी.*८ सप्टेंबर

*आज ८ सप्टेंबर* *आज श्री गजानन महाराज यांची पुण्यतिथी.* ८ सप्टेंबर १९१० रोजी ऋषिपंचमीच्या दिवशी त्यांनी शेगाव येथे समाधी घेतली. श्री गजानन महाराजांचा जन्म कुठे व कधी झाला हे अज्ञात आहे. परंतु गजानन महाराज माघ वद्य ७ शके १८००, २३ फेब्रुवारी १८७८ या दिवशी ऐन तारुण्यात ते शेगांव जि. बुलढाणा येथे दिगंबरावस्थेत दृष्टीस पडले. त्या वेळी ते देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतील शिते उचलून खात होते. ह्या संदर्भात दासगणूंनी लिहिले आहे, “कोण हा कोठीचा काहीच कळेना। ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे। साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ती। आलीसे प्रचिती बहुतांना॥” जसा कुशल जवाहीर कोळशाच्या तुकड्यांमधून अनमोल हिरा शोधून काढतो त्याप्रमाणे बंकटलाल आगरवाल ह्याने त्यांचे महत्त्व ओळखले त्याला महाराजांचे प्रथम दर्शन झाले ते असे, – “दंड गर्दन पिळदार। भव्य छाती दृष्टी स्थिर। भृकुटी ठायी झाली असे॥” जेव्हा बंकटलालने त्यांना जेवणाविषयी विचारले त्यावेळी महाराजांनी नुसतेच शून्य दृष्टीने त्याच्याकडे पाहिल कारण महाराज त्यावेळी तुर्या* अवस्थेत होते . (तुर्या* अवस्था : जागृति म्हणजे जागे असणे, सुषुप्ति म्हणजे झोपणे आणि...

गोविंद विडा

।। गोविंद विडा ।। आज महालक्ष्म्या  जेवल्या , या जेवणाचं साग्रसंगीत वर्णन आपणनेहमीच वाचतो , या जेवणाचं जेवढं वैशिष्ट्य आहे तितकंच  विड्याचं देखील आहे. हे विडे नेमके कसे तयार करतात ? यासंबंधी व्हिडीओ तयार करण्याचं मी माझे मित्र विवेक पारगावकर यांना मागच्या वर्षी सुचवले होते.त्यांचे वडील चंद्रकांतराव पारगावकर हे आजही वयाच्या पंच्याहत्तरीत देखील उत्साहाने महालक्ष्मी पूजनासाठी गोविंद विडे,कुलूप विडे,खण विडे तयार करतात,तेही कुशलतेने.यंदा त्यांनी त्यांच्या नातीला ही विडे तयार करण्याची कला शिकवली.चंद्रकांतराव पारगावकर म्हणजे रसिक माणूस, धुंडिराज पाटांगणकर महाराज, जेष्ठ विधिज्ञ कालिदासराव थिगळे यांचे परममित्र,लोक यांच्या मैत्रीचा नेहमी गौरव करतात . या अशा लोप पावत चाललेल्या कला पुढेही सुरू राहाव्यात या हेतूने पारगावकर यांनी हा व्हिडीओ तयार केलाय,जो नक्कीच मार्गदर्शक ठरेल. -- महेश वाघमारे, बीड    बुधवार    दि 26 ऑगस्ट 2020.

मंत्र पुष्पांजली हे भारताचे आदिम राष्ट्रगीत आहे,

*तुम्हाला माहित आहे का* मंत्र पुष्पांजली हे खरंतर भारताचे आदिम राष्ट्रगीत आहे, असे म्हणता येईल.. राजा मरुत याचे मारुतगण आपल्या राष्ट्रासाठी, त्याच्या स्थैर्यासाठी आणि भरभराटी साठी प्रार्थना करीत आहेत. यात एकूण चार कडवी आहेत. त्यातील प्रत्येक श्लोकाचा अर्थ येणेप्रमाणेः श्लोक – १ : यज्ञेन यज्ञं अयजन्त देवाः तानि धर्माणि प्रथामानि आसन् तेह नांक महिमानः सचन्तयत्र पूर्वे साध्याःसंति देवा: श्लोकाचा अर्थ –  *देवांनी यज्ञाच्या द्वारे यज्ञरुप प्रजापतीचे पूजन केले. यज्ञ आणि तत्सम उपासनेचे ते प्रारंभीचे धर्म विधी होते. जिथे पूर्वी देवता निवास (स्वर्गलोकी) करीत असत ते स्थान यज्ञाचरणाने प्राप्त करून साधक महानता (गौरव) प्राप्त करीते झाले.* श्लोक २- ओम राजाधिराजाय प्रसह्यसाहिने। मनोवयं वैश्रवणाय कुर्महे। स मे कामान् कामाकामाय मह्यं। कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय I महाराजाय नमःl श्लोकाचा अर्थ –  *आम्हाला सर्व काही (प्रसह्य) अनुकुल घडवून आणणाऱ्या राजाधिराज वैश्रवण कुबेराला आम्ही वंदन करीतो. तो कामेश्वर कुबेर कामनार्थी अशा मला (माझ्या सर्व कामनांची ) पूर्ति प्रदान करो.* श्लोक ३ (प्...

तेहतीस कोटी देव कोणते ?

प्रश्न : *तेहतीस कोटी देव कोणते ?* उत्तर : बहुतेक लोकांना 'तेहतीस कोटि' चा अर्थ 'तेहतीस करोड' असाच वाटत असतो .पण येथे कोटि शब्दाची, 'टि' पहिली वेलांटी आहे.   मुळात संस्कृतमधील  "कोटि"  या शब्दाचा अर्थ करोड नसून 'प्रकार'  असा आहे.  खरे संशोधन असे केले गेले आहे की, ईश्वराने निसर्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी ३३ प्रकारच्या देवांना कार्यभार सोपवले आहेत.  त्यांच्यात  ८ वसू,  ११ रूद्र,  १२ आदीत्य,  १ इंद्र आणि १ प्रजापती  असे पाच स्तर आहेत . प्रत्येकाचा कार्यभाग (खाते) भिन्न असल्याने प्रत्येकाला वेगळी कोटि (कॅटेगरी) दिलेली आहे. अष्टवसूंची नावे -  आप, धृव, सोम, धर, अनिल,  अनल, प्रत्यूष आणि प्रभास .  अकरा रूद्रांची नावे -  मनु, मन्यु, महत, शिव, ऋतुध्वज, महीनस, उम्रतेरस, काल, वामदेव, भव आणि धृत-ध्वज. बारा आदित्यांची नावे - अंशुमान, अर्यमन, इंद्र, त्वष्टा, धानू, पर्जन्य, पूषन, भग, मित्र, वरूण, वैवस्वत व विष्णू १ इंद्र आणि १ प्रजापती असे एकंदर  ८+११+१२+१+१ = ३३... ही माहीती सगळ्याच ग्रूपवर शेअर करा..  जेणेकरून '...

चौदा विद्या आणि चौसष्ठ कला कोणत्या

*🙏🥰चौदा विद्या आणि चौसष्ठ कला कोणत्या...🥰🙏* आपल्या लाडक्या गणपतीला चौदा विद्या आणि चौसष्ठ कला यांचा अधिपती असे म्हटले जाते. साहजिकच या चौदा विद्या आणि चौसष्ठ कला कोणत्या ? याबद्द्ल अनेकांच्या मनात उत्सुकता असते. ही धावती ओळख.. *चौदा विद्या* चार वेद + सहा वेदांगे + न्याय, मीमांसा, पुराणे व धर्मशास्त्र अश्या एकूण चौदा विद्या आहेत... *वेद* १. ऋग्वेद २. यजुर्वेद ३. सामवेद ४. अथर्ववेद *सहा वेदांगे* १. व्याकरण- भाषेतील शब्दांच्या व्यवहाराचे शास्त्र. २. ज्योतिष- ग्रहगती तथा सामुद्रिक जाणण्याची विद्या. ३. निरुक्त- वेदांतील कठीण शब्दांचे अर्थ सांगणारे शास्त्र. ४. कल्प- धार्मिक विधी- व्रतांचे वर्णन करणारे शास्त्र. ५. छंद- शब्दांची गानयोग्य रचना व काव्यवृत्ताचे ज्ञान. ६. शिक्षा- शिक्षण, अध्यापन व अध्ययन. १. न्याय, २. मीमांसा 3. पुराणे 4. धर्मशास्त्र. *चौसष्ट कला ६४* १. पानक रस तथा रागासव योजना - मदिरा व पेय तयार करणे. २. धातुवद- कच्ची धातू पक्की व मिश्रधातू वेगळी करणे. ३. दुर्वाच योग- कठीण शब्दांचा अर्थ लावणे. ४. आकर ज्ञान - खाणींविषयी अंतर्गत सखोल ज्ञान असणे. ५. वृक्षायुर्वेद योग...

स्वप्नाली सुतार.कणकवली

स्वतःला आत्मनिर्भर, कणखर आणि शक्तिशाली बनवायचं असेल तर अभ्यासाबरोबरच महत्वकांक्षा, परिश्रम आणि प्रयत्न आवश्यक आहेत......हे लिहिण्याचं कारण म्हणजे छायाचित्रातील ही स्वप्नाली सुतार.कणकवली तालुक्यातील दुर्गम अशा दारीस्ते गावातील ही युवती. अभ्यासात भयंकर हुशार....दहावीत 98 टक्के तर बारावीत कॉलेज मध्ये प्रथम आलेली.डॉक्टर व्हायची इच्छा.... पण परिस्थिती आडवी आली.आई वडील शेतकरी,एवढा खर्च पेलवणारा नव्हता.म्हणून मुंबईला पशु वैद्यकीय अधिकारी होण्याचं शिक्षण घेत होती.लॉकडाऊन मध्ये गावात अडकली.... आणि तिकडे ऑनलाइन लेक्चर सुरू झाले.गावातील घराकडे फोन येण्याचं नेटवर्क मिळताना मारामारी तिथे इंटरनेट कुठून असणार..?परत अँड्रॉइड मोबाईलचा ही प्रश्न होताच.मोठ्या भावाने आपला मोबाईल दिला.....त्याचा मोबाईल घेऊन कुठे नेट मिळते यासाठी फिरत असताना डोंगरात नेट मिळालं.उन्हाळयात दिवसभर डोंगरावर झाडाखाली उभं राहून शिक्षण घेत होती.सकाळी 7 ला घरातून जाते ती सायंकाळी 7 च्या आसपास येते.अख्खा दिवस डोंगरातील त्या झोपडीतच जातो.....पुन्हा प्रॉब्लेम आला तो चार्जिंगचा.कुठल्यातरी मॅडमनी पॉवर बँक दिली.पावसाळा सुरू झा...

पंतप्रधानांकडून शुभेच्छा

[8/13, 20:20] आपली मा.वि. अरुंधती वाकडे. सौ. अरुंधती प्रविण दीक्षित. आवर्जून वाचा.  सुहृदहो, 😊☺️😄😇 काल प्रवीण दीक्षितांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा पूर लोटला. ज्यांना त्यांचा फोन नंबर वा मेलचा पत्ता माहित नव्हता त्यांनी माझ्याकडे हा शुभेच्छांचा ओघ वळवला. सरकारी अधिकारी खुर्चीवरून उतरला की तो विस्मृतीच्या टोपलीत नकळत सरकवला जातो. त्यातल्या त्यात पोलीस अधिकारी तर नक्कीच. पण तसे झाले नाही. अनेक सुंदर सुंदर कविता लोकांनी आपणहून करून पाठविल्या; कोणी श्लोक, कोणी सुंदर पत्रे लिहीली. कोणी त्यांच्या आठवणी, कोणी फोटो. आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांनी दिवस सुंदर झाला.                 अनपेक्षित आलेला एक शुभेच्छा संदेश खूप खूप मोहरवून गेला. मोहवून गेला. तो संदेश होता पंतप्रधान नरेद्र मोदीजींकडून आलेला.  वाढदिवसाच्या शुभेच्छांचा. त्यांच्या अक्षरात, त्यांच्या सहीचा. डाव्या बाजूला अमृतसरच्या सुवर्णमंदिराची प्रतिमा तर उजवीकडे मोदीजींचा फोटो आणि वाढदिवसानिमित्त शुभेच्छा संदेश! परत परत पाहतांना किती आनंद झाला म्हणून सांगू? एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्...