Skip to main content

Medical Angle behind Meditation

आपल्या जन्माच्या आधीपासुन मरे पर्यंत आपलं हृदय सतत कार्यरत असतं. हृदय दररोज़ ७००० लीटर रक्त पंप करते (यापैकी ७०% रक्त मेंदुला लागते आणि बाकी शरीराला ३०% रक्त मिळते) आणि ७०,००० किमी
पेक्षाही लांब रक्तवाहीन्यांमधे प्रवाहीत करते. १ टन वजन ४२ फूट ऊंची पर्यंत उचलण्यासाठी जितकी शक्ति आवश्यक असते तितकी शक्ति हृदय त्याच्या कार्यातुन दररोज निर्माण करते.
आपण थकल्यावर आराम करतो पण हृदयाने जर ४ - ५ मिनीटं आराम केला तर आपला कायमचा आराम होऊन जाईल.
न थकता हृदय कसे काय बरे कार्य करत असेल?
  हृदय सतत कार्य करू शकते कारण ते अनुशासनाच्या, DISCIPLINE च्या आधारावर कार्य करते. सामान्य NORMAL परिस्थितीमधे हृदय ०.३ सेकंद आकुंचन CONTRACT होते म्हणजे PUMP करते आणि ०.५ सेकंद प्रसरण पावते किंवा आराम करते RELAX होते. या हिशोबाने ०.३ + ०.५ = ०.८ सेकंदात हृदयाचा एक ठोका BEAT पूर्ण होतो म्हणजे एका मिनीटात ७२ ठोके होतात जे सामान्य NORMAL असतात. आरामाच्या ०.५ सेकंदात अशुध्द रक्त फुफ्फुसात जाऊन १००% शुद्ध होऊन येते.
  जर काही कारणाने शरीराला कमी वेळात जास्त रक्तपुरवठ्याची गरज DEMAND असेल तर हृदय जास्त रक्त PUMP करण्यासाठी आरामाची वेळ कमी करतं. अश्या परिस्थितीत आराम ०.४ सेकंद झाला तर हृदयाचा एक ठोका ०.७ सेकंदा त पूर्ण होऊन दर मिनीटाला ही संख्या ८२ च्या वर जाते आणि केवळ ८०%च रक्त शुध्द होतं.
  जर आरामाची वेळ ०.३ सेकंद झाली तर ६०% च रक्त शुद्ध होते. म्हणजे अश्या घाईगर्दीच्या असामान्य स्थितीत,२०% किंवा ४०% अशुद्ध रक्त रक्तवाहीन्यांमधे PUMP केलं जातं आणि ती अशुद्धि रक्तवाहीन्यांमधे चिकटुन सामान्यपणे लवचिक ELASTIC स्वरूपाच्या असलेल्या रक्त वाहीन्या कठीण PLASTIC स्वरूपाच्या बनत जातात. कालांतराने रक्तवाहीन्या इतक्या कठीण बनतात कि रक्तात एखादी गाठ वाहत आली (कि पूर्वी  धमनीच्या लवचिक स्वभावामुळे सहज निघुन जात असे) कि अडकुन रक्ताचा प्रवाह रोखते किंवा BLOCK करते - या स्थितिला हृदय विकाराचा झटका HEART ATTACK म्हणतात.
  या हिशोबाने विचार केला तर लक्षात येईल कि हृदय विकाराचे मूळ कारण शरीराकडून किंवा मेंदुकडुन होणारी सामान्यपेक्षा वाढीव रक्ताची मागणी DEMAND हेच आहे. जेव्हा मेंदुची हालचाल ACTIVITY STIMULA E चलायमान होते तेव्हा त्याची रक्तपुरवठयाची मागणी सामान्यपेक्षा खूप वाढते. BRAIN ACTIVITY STIMULTE होण्यासाठी आपला आहार DIET केवळ २५% ते ३०%च जबाबदार आहे आणि ७०% ते ७५% आपले विचार, भावना, दृष्टिकोण, स्मृति जबाबदार आहेत.
त्यामुळे ज्यांना आपले हृदय दीर्घकाळ स्वस्थ ठेवायचे असेल तर त्यांनी चिंता, क्रोध, उदासी, घाईगर्दी (जल्दबाजी) आणि भावनात्मकदृष्टया संवेदनशिल SENSITIVE स्वभाव यांच्यापासुन स्वतःला सुरक्षित ठेवावे.
  या पाच गोष्टींपासुन सुरक्षित ठेवण्यासाठी कोणतेही औषध  MEDICATION उपलब्ध नाही. त्यापासुन सुरक्षित रहाण्यासाठी ध्यानधारणा MEDITATION हाच एकमेव शाश्वत उपाय आहे.
  म्हणुनच म्हंटलय -
SPIRITUAL HEALING IS ONLY TRUE HEALING.
Note: This post was received on WhatsApp and I donot know the authenticity, but I appreciate the analogy and hence posted.

Comments

Popular posts from this blog

*काय वाढले पानावरती*

गदिमांची अफाट काव्य प्रतिभा*       *जेवणावळ कशी असावी याचे जबरदस्त वर्णन गदिमांनी आपल्या या कवितेत केले आहे.* हे वर्णन वाचताना वाढलेले भरगच्च घमघमीत पान जर तुमच्या डोळ्यासमोर नाही आले तरंच नवल...! *काय वाढले पानावरती..!* काय वाढले  पानावरती,  ऐकून घ्यावा थाट संप्रती, धवल लवण हे पुढे वाढले,  मेतकूट मग पिवळे सजले आले लोणचे बहु मुरलेले,  आणि लिंबू रसरसलेले, किसून आवळे मधुर केले, कृष्णा काठचे वांगे आणले, खमंग त्याचे भरित केले, निरनिराळे चटके नटले, चटण्यांचे बहु नवे मासले, संमेलनची त्यांचे भरले, मिरची खोबरे ती सह ओले,  तीळ भाजूनी त्यात वाटले, कवठ गुळाचे मिलन झाले, पंचामृत त्या जवळी आले, वास तयांचे हवेत भरले, अंतरी अण्णा अधीर जाहले! भिजल्या डाळी नंतर आल्या, काही वाटल्या काही मोकळ्या, काही वाटुन सुरेख तळल्या,  कोशिंबिरी च्या ओळी जमल्या, शुभ्र काकड्या होत्या किसल्या, मुळा कोवळा मिरच्या ओल्या,  केळी कापून चकल्या केल्या, चिरुन पेरुच्या फोडी सजल्या, एकरूप त्या दह्यात झाल्या, भाज्या आल्या आळू-घोसाळी, रान कारली वांगी काळी,  सुरण तोंडली आणि पडवळी, चुका चाकवत मेथी कवळी, चंदन बटवा भेंडी कवळी, फणस कोवळ...

वातींचे प्रकार

*वातींचे प्रकार  सगळ्यांच्या आग्रहाखातर काही मला माहिती असलेले वातीचे प्रकार सांगते..  *नंदादीप वात*  किंवा समई वात तेलाच्या दिव्यासाठी-- ही 5,7,9 पदरी असते शक्यतोवर 5 किंवा 7 पदरी असते.. ही रोज पूजेच्या वेळेस लावतात.. *बेलवात*-- ह्या श्रावण महिनाभर लावतात-- एकाला जोडून एक अश्या 3 वाती करतात (4+4+3 पदरी) टोटल 11 पदर.. ह्या कोणी रोज महिनाभर 11 वाती लावतात कोणी फक्त सोमवारी लावतात... *शिवरात्रवात*-- महाशिवरात्रीला 1100 पदराची वात तुपात भिजवून लावतात.. *वैकुंठवात* --350 पदरी आपल्या हाताची वितभर( करंगळी ते अंगठा लांब करून मोजलेले अंतर) करायची ती वैकुठंचतुर्दशी ला लावतात.. एक पुस्तक वगैरेवर मोजून मग त्यावर गुंडाळतात... *टिपूर*--तीन पदराच्या जोडून (365 +365) जोडवाती म्हणतात त्या त्रिपुरारी पौर्णिमेला लावतात.. *अधिक महिन्याची वात*--- 33 पदरी 33 वाती , 33 फुलवाती तुपात भिजवून लावतात .. कोणी महिनाभर लावतात कोणी एकदाच लावतात.. *कार्तिक एकादशी पासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत* 3 पदरी 105 वाती लावतात.. कोणी पौर्णिमेलाच 105 वाती लावतात.. *काडवाती*-- अंबाडीच्या कोरड्या काडीला कापूस गुंडाळू...

पांढरी रूई किंवा मंदार

#रानफूले...... या सदरातील आजचे ६६वे फूल आहे *पांढरी रूई* वा *मंदार* हिंदूधर्मशाश्त्रात अत्यंत महत्वाचे लक्ष्मीचे झाड म्हणून गणले गेलेली ही वनस्पती हल्ली खुपजणांनी दारात लावलेली दिसते. जुन-जुलै मधे पावसात हिचे बि रूजते व  हळू हळू वाढत राहते, आठ ते दहा महिन्यात फुले येतात . गुच्छामधे येणारी फुले दूरूनही ओळखू येतात  या मधे जांभळसर रंगाच्या फुलांची रूई जास्त प्रचलीत आहे. कश्याही जमीनीत, मातीत, कमी पावसात पण येते . फुलांचे परागीभवन किटकांमार्फत होते व फलनपण होते.कप्पे असलेल्या शेंगेमधे(पाँड) मऊ मऊ कापूसतंतू असलेल्या बिया असतात  (या कापसाची ऊशी अत्यंत मुलायम असते)त्या सुकल्या की मार्च एप्रील मधे तडकतात व बिया हवेत ऊडतात , कापसामुळे वार्याने वहन होऊन बिजप्रसार होतो.मातीत जाऊन पडली की येणार्या पावसाळ्यात रूजतात.जाड जाड मोठी मोठी पाने शनिमहाराजांना हार करून घातली जातात.महादेवाला प्रिय असलेली हि वनस्पती   पण बहूपयोगी आहे. Calotropis gigantea असे वनस्पतीशाश्त्रीय नांव असलेली हि वनस्पती पण औषधी आहे. याचा चिक जर पायात काटा वा काच गेली तर त्यावर लावला असता जखम न  चिडता त...