23/02/17, 1:13 AM - Kirti Shintre Marathey SHS: To all the ladies of this group
अनेक घटनांचा पट
जेव्हा डोळ्यासमोर उलगडतो
माझ्या मैत्रिणींचा मला
खूप अभिमान वाटतो
डबल इंजिन हवं म्हणून
कुणी नोकऱ्या केल्या
मुळीच गरज नाही म्हटल्यावर
घर-गृहस्थीत रमल्या
खूप खूप शिकून कुणी
बाहेर कर्तृत्व गाजवलं
पण त्याचवेळी घराचं
घरपण मात्र टिकवलं
थोरांना सांभाळून घेताना
पोरांना उत्तम घडवलं
त्यांना दूर पाठवताना
डोळ्यातलं पाणी लपवलं
पतीला साथ देताना कुणी
दूरदेशी रमल्या
इथल्या रेशीमगाठी मात्र
हृदयाशी घट्ट जपल्या
पूजा-अर्चा तशाच पार्ट्या
प्रत्येक आव्हान पेललं
आल्या - गेल्याचं स्वागत अगदी
हसत मुखानं केलं
जुनं सारं जपताना
नव्याशी जमवून घेतलं
ईमेल, व्हॉट्सअप,स्काईपला
अगदी आपलंसं केलं
*प्रत्येकीचा प्रसन्न चेहरा नि जवळ समाधानाची शिदोरी आहे माझ्या अशा मैत्रिणींचा मला खरंच अभिमान आहे.*
23/02/17, 11:31 AM - Milind Bandhavkar SHS: विंदा करंदीकर यांनी 'सब घोडे बारा टक्के' ही कविता १९५२ मध्ये लिहिली होती. मात्र त्यातील प्रत्येक शब्द आणि शब्द आजही चपखल आणि समर्पक. महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने ती कविता पुन्हा एकदा.
सब घोडे बारा टक्के!
जितकी डोकी तितकी मते
जितकी शिते तितकी भूते;
कोणी मवाळ कोणी जहाल
कोणी लठ्ठ कोणी मठ्ठ
कोणी ढीले कोणी घट्ट;
कोणी कच्चे कोणी पक्के
सब घोडे बारा टक्के!
गोड गोड जुन्या थापा
(तुम्ही पेरा तुम्ही कापा)
जुन्या आशा नवा चंग
जुनी स्वप्ने नवा भंग;
तुम्ही तरी काय करणार?
आम्ही तरी काय करणार?
त्याच त्याच खड्ड्या मधे
पुन्हा पुन्हा तोच पाय;
जुना माल नवे शिक्के
सब घोडे बारा टक्के!
जिकडे सत्ता तिकडे पोळी
जिकडे सत्य तिकडे गोळी;
(जिकडे टक्के तिकडे टोळी)
ज्याचा पैसा त्याची सत्ता
पुन्हा पुन्हा हाच कित्ता;
पुन्हा पुन्हा जुनाच स्वार
मंद घोडा जुना स्वार;
याच्या लत्ता त्याचे बुक्के
सब घोडे बारा टक्के!
सब घोडे! चंदी कमी;
कोण देईल त्यांची हमी?
डोक्यावरती छप्पर तरी;
कोण देईल माझा हरी?
कोणी तरी देईन म्हणा
मीच फसविन माझ्या मना!
भुकेपेक्षा भ्रम बरा;
कोण खोटा कोण खरा?
कोणी तिर्र्या कोणी छक्के;
सब घोडे बारा टक्के!
कवी - विंदा करंदीकर
Comments
Post a Comment