Skip to main content

लोक बघतायेत न।

27/02/17, 5:49 PM - Messages you send to this group are now secured with end-to-end encryption. Tap for more info.
28/02/17, 11:56 PM - Suhas Dhamorikar: उन्हामुळे मृत्यू का होतो?
🏥Help full🏥🌹आरोग्य🌹tip's

आपण सगळेच उन्हात फिरतो. पण काही जणांचाच उन्हात गेल्यामुळे अचानक मृत्यू का होतो?

👉 आपल्या शरीराचं तापमान नेहमी ३७° अंश सेल्सियस असतं, या तापमानातच शरीरातले सर्व अवयव नीट काम करू शकतात

👉 घामाच्या रूपाने पाणी बाहेर काढून शरीर ३७° अंश सेल्सियस तापमान कायम राखतं, सतत घाम निघत असताना पाणी पीत राहाणं अत्यंत गरजेचं आणि अत्यावश्यक आहे.

👉 पाणी शरीरात इतरही अधिक महत्त्वाची कामं करतं, त्यामुळे शरीरातला पाण्याचा साठा कमी झाला, तर शरीर घामाच्या रूपाने पाणी बाहेर टाकणं टाळतं

👉 जेव्हा बाहेरचं तापमान ४५°अंशाच्या पुढे जातं आणि शरीरातली कूलिंग व्यवस्था पाण्याच्या अभावाने ठप्प होते, तेव्हा शरीराचं तापमान ३७°च्या पुढे जाऊ लागतं.

👉 शरीराचं तापमान जेव्हा ४२° डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचतं, तेव्हा रक्त तापू लागतं आणि रक्तातलं प्रोटिन अक्षरशः शिजू लागतं (उकळत्या पाण्यात अंड उकडतं तसं!)

👉 स्नायू कडक होऊ लागतात, त्यात श्वास घेण्यासाठी लागणारे स्नायूही निकामी होतात.

👉 रक्तातलं पाणी कमी झाल्यामुळे रक्त घट्ट होतं, ब्लडप्रेशर अत्यंत कमी होतं, महत्त्वाच्या अवयवांना (विशेषतः मेंदूला) रक्त पुरवठा थांबतो.

👉 माणूस कोमात जातो आणि त्याचे एक-एक अवयव अवघ्या काही क्षणांत बंद पडतात आणि त्याचा मृत्यू ओढावतो.

👉 उन्हाळ्यात असे अनर्थ टाळण्यासाठी सतत थोडे थोडे पाणी पित रहावे, व आपल्या शरीराचे तापमान 37° अंशच कसे राहिल याकडे लक्ष द्यावे.

Hot & cold food list

सफरचंद - थंड
चिकू - थंड
संत्री - उष्ण
लिंबू - उष्ण
कांदा - थंड
बटाटा - उष्ण
पालक - थंड
टॉमेटो - उष्ण
कारले - उष्ण
कोबी - थंड
गाजर - थंड
मिरची - उष्ण
मका - उष्ण
मेथी - उष्ण
वांगे - उष्ण
भेंडी - उष्ण
बीट - थंड
बडीशेप - थंड
वेलची - थंड
पपई - उष्ण
अननस - उष्ण
डाळींब - थंड
ऊस - उष्ण
मीठ - थंड
मूग डाळ - थंड
चणा डाळ - उष्ण
गुळ - उष्ण
तिळ - उष्ण
शेंगदाणे / बदाम / काजू / अक्रोड / खजूर - उष्ण
हळद - उष्ण
कॉफी - थंड
दूध / दही / तूप / ताक / तांदूळ - थंड

उन्हाळ्यात थंड पदार्थ जास्त खाल्ल्यास होणारा त्रास कमी होतो .

✍🏻 आयुर्वेदातून संकलन 🏥Help full🏥🌹आरोग्य सवाद🌹tip's
01/03/17, 2:36 AM - Revati Deshpande Sapre: *सावरकरांनी मराठीत शोधलेले शब्द*

दिनांक (तारीख)
क्रमांक (नंबर)
बोलपट (टॉकी)
नेपथ्य
वेशभूषा (कॉश्च्युम)
दिग्दर्शक (डायरेक्टर)
चित्रपट (सिनेमा)
मध्यंतर (इन्टर्व्हल)
उपस्थित (हजर)
प्रतिवृत्त (रिपोर्ट)
नगरपालिका (म्युन्सिपाल्टी)
महापालिका (कॉर्पोरेशन)
महापौर (मेयर)
पर्यवेक्षक ( सुपरवायझर)
विश्वस्त (ट्रस्टी)
त्वर्य/त्वरित (अर्जंट)
गणसंख्या (कोरम)
स्तंभ ( कॉलम)
मूल्य (किंमत)
शुल्क (फी)
हुतात्मा (शहीद)
निर्बंध (कायदा)
शिरगणती ( खानेसुमारी)
विशेषांक (खास अंक)
सार्वमत (प्लेबिसाइट)
झरणी (फाऊन्टनपेन)
नभोवाणी (रेडिओ)
दूरदर्शन (टेलिव्हिजन)
दूरध्वनी (टेलिफोन)
ध्वनिक्षेपक (लाउड स्पीकर)
विधिमंडळ ( असेम्ब्ली)
अर्थसंकल्प (बजेट)
क्रीडांगण (ग्राउंड)
प्राचार्य (प्रिन्सिपॉल)
मुख्याध्यापक (प्रिन्सिपॉल)
प्राध्यापक (प्रोफेसर)
परीक्षक (एक्झामिनर)
शस्त्रसंधी (सिसफायर)
टपाल (पोस्ट)
तारण (मॉर्गेज)
संचलन (परेड)
गतिमान
नेतृत्व (लिडरशीप)
सेवानिवृत्त (रिटायर)
वेतन (पगार)
अनुक्रमणिका (ईंडेक्स)

असे शेकडो शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषेला दिले आहेत
01/03/17, 3:40 AM - Reeta Lanjewar: : *लोक बघताहेत नं !*


परदेशात गेले होते तेव्हा जरा वेस्टर्न कपड्यात अधे-मधे फोटो काढून घेतले. इथे आल्यावर जवळच्या मैत्रिणीने फोटो बघून म्हटलं, 'अगं किती छान, इथे का नाही घालत तू हे सगळं, छान दिसतंय तुला'...तेव्हा तोंडातून सवयीचं वाक्य ओघळून गेलं, "छे गं, इथे कुठे घालू हे असं...लोक बघतात ना"...

मग त्या दिवशी स्वतःच स्वतःला हा प्रश्न विचारला...लोक बघतात ना म्हणजे काय ?, लोक बघणारच, बघून बोलणारच. पण म्हणून त्यांच्या बघण्यावर आपण आपलं आयुष्य आखायचं का ?

जरा विचार करून बघा, आयुष्यात किती कमी गोष्टी आपण लोक बघतील, मग काय म्हणतील हा विचार न करता करतो. मला खूप कौतुक वाटतं अशा माणसांचं जी अशी ओझी न घेता जगतात.

माझी एक मैत्रीण आहे. देशा-परदेशात कुठेही जेवायला गेली की, मांडी ठोकून बसते आणि जेवते...हो, खुर्चीवरही मांडी घालून बसते. काटे-चमचे न घेता निवांत हाताने जेवते, फिंगर बाऊलमधल्या पाण्यात हात घालून तो हात आधी तोंडावर फिरवून ओठबिठ साफ करून घेते, दात कोरणं असेल तर व्यवस्थित दातही कोरून घेते...ती हे सगळं करत असते तेव्हा ती सोडून बाकीचे सगळे अवघडून जातात. पण ही बाई मजेत असते. मला तिचं ते मज्जेत असणं कुठेतरी सुखावून जातं आणि कुठेतरी सूक्ष्मसा हेवा पण वाटतो.


असाच एक ग्रुपमधला मित्र आहे...निव्वळ निखळ आनंदाचा झरा. वर्षातले अकरा महिने परदेशात, आणि मग जेव्हा केव्हा धूमकेतूसारखा उगवतो तेव्हा सगळ्या मित्र-मैत्रिणींना सरळ मिठी मारून कडकडून भेटतो...त्या मिठीतला त्याचा स्पर्श जितका नितळ असतो तेवढीच त्याची नजर स्वच्छ असते. मी परत विचारात पडते, हे का जमत नाही आपल्याला. हे अवघडलेलं संकुचित मन मोकळं कधी होणार..."लोक बघताहेत ना" , हे कधी थांबणार?

लोक बघतात !!!
अपरात्री भयाण रस्त्यावर एक बलात्कारीत निर्वस्त्र निर्भया तडफडत पडली होती, तेव्हाही लोक बघतच होते...

ट्रेनच्या भयंकर गर्दीत एक जीव तेव्हा हात सुटून खाली पडला तेव्हा त्याला हात देण्याऐवजी ते दृष्य मोबाईलमध्ये टिपणारी 'लोकं बघतच होती की '!

आयुष्याच्या या टप्प्यावर आता असं नक्कीच सांगू शकते की, 'लोक बघताहेत ना', याला घाबरू नये , घाबरावं ते केवळ आपल्या अंतरात्म्याला. कारण खरंतर फक्त तोच बघत असतो आपल्याला आणि त्याच्याशी प्रामाणिक राहणं खूप गरजेचं आहे. ज्याने निखळ, सात्विक आनंद मिळेल ते न घाबरता केलं पाहिजे. आयुष्य छोटं आहे आणि येणारा प्रत्येक क्षण काही देऊन जाणार आहे. त्या क्षणाचं सोनं करता येईल..जर लोक बघताहेत ना, या चक्रातून स्वतःची सुटका केली तर...

बघा ना, जर चिखलाने आणि घाणीने बरबटलेल्या कुष्ठरोग्याला भर पावसात उचलून घेताना कर्मयोगी बाबा आमटे यांनी 'लोक बघताहेत ना' असा विचार केला असता तर आज 'आनंदवन' अस्तित्वातच नसतं...

तर सांगायचा मुद्दा हा... की मी आता अधून-मधून वेस्टर्न कपडेही घालते, खरंच छान दिसतात... चिंब पावसात छत्री बंद करुन भर रस्त्यात भिजते... लोक बघत असतात, बघूदेत...खरंच भिजताना खूप छान वाटतं... बघा तुम्हीसुद्धा असं जगून!

Comments

Popular posts from this blog

*काय वाढले पानावरती*

गदिमांची अफाट काव्य प्रतिभा*       *जेवणावळ कशी असावी याचे जबरदस्त वर्णन गदिमांनी आपल्या या कवितेत केले आहे.* हे वर्णन वाचताना वाढलेले भरगच्च घमघमीत पान जर तुमच्या डोळ्यासमोर नाही आले तरंच नवल...! *काय वाढले पानावरती..!* काय वाढले  पानावरती,  ऐकून घ्यावा थाट संप्रती, धवल लवण हे पुढे वाढले,  मेतकूट मग पिवळे सजले आले लोणचे बहु मुरलेले,  आणि लिंबू रसरसलेले, किसून आवळे मधुर केले, कृष्णा काठचे वांगे आणले, खमंग त्याचे भरित केले, निरनिराळे चटके नटले, चटण्यांचे बहु नवे मासले, संमेलनची त्यांचे भरले, मिरची खोबरे ती सह ओले,  तीळ भाजूनी त्यात वाटले, कवठ गुळाचे मिलन झाले, पंचामृत त्या जवळी आले, वास तयांचे हवेत भरले, अंतरी अण्णा अधीर जाहले! भिजल्या डाळी नंतर आल्या, काही वाटल्या काही मोकळ्या, काही वाटुन सुरेख तळल्या,  कोशिंबिरी च्या ओळी जमल्या, शुभ्र काकड्या होत्या किसल्या, मुळा कोवळा मिरच्या ओल्या,  केळी कापून चकल्या केल्या, चिरुन पेरुच्या फोडी सजल्या, एकरूप त्या दह्यात झाल्या, भाज्या आल्या आळू-घोसाळी, रान कारली वांगी काळी,  सुरण तोंडली आणि पडवळी, चुका चाकवत मेथी कवळी, चंदन बटवा भेंडी कवळी, फणस कोवळ...

वातींचे प्रकार

*वातींचे प्रकार  सगळ्यांच्या आग्रहाखातर काही मला माहिती असलेले वातीचे प्रकार सांगते..  *नंदादीप वात*  किंवा समई वात तेलाच्या दिव्यासाठी-- ही 5,7,9 पदरी असते शक्यतोवर 5 किंवा 7 पदरी असते.. ही रोज पूजेच्या वेळेस लावतात.. *बेलवात*-- ह्या श्रावण महिनाभर लावतात-- एकाला जोडून एक अश्या 3 वाती करतात (4+4+3 पदरी) टोटल 11 पदर.. ह्या कोणी रोज महिनाभर 11 वाती लावतात कोणी फक्त सोमवारी लावतात... *शिवरात्रवात*-- महाशिवरात्रीला 1100 पदराची वात तुपात भिजवून लावतात.. *वैकुंठवात* --350 पदरी आपल्या हाताची वितभर( करंगळी ते अंगठा लांब करून मोजलेले अंतर) करायची ती वैकुठंचतुर्दशी ला लावतात.. एक पुस्तक वगैरेवर मोजून मग त्यावर गुंडाळतात... *टिपूर*--तीन पदराच्या जोडून (365 +365) जोडवाती म्हणतात त्या त्रिपुरारी पौर्णिमेला लावतात.. *अधिक महिन्याची वात*--- 33 पदरी 33 वाती , 33 फुलवाती तुपात भिजवून लावतात .. कोणी महिनाभर लावतात कोणी एकदाच लावतात.. *कार्तिक एकादशी पासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत* 3 पदरी 105 वाती लावतात.. कोणी पौर्णिमेलाच 105 वाती लावतात.. *काडवाती*-- अंबाडीच्या कोरड्या काडीला कापूस गुंडाळू...

पांढरी रूई किंवा मंदार

#रानफूले...... या सदरातील आजचे ६६वे फूल आहे *पांढरी रूई* वा *मंदार* हिंदूधर्मशाश्त्रात अत्यंत महत्वाचे लक्ष्मीचे झाड म्हणून गणले गेलेली ही वनस्पती हल्ली खुपजणांनी दारात लावलेली दिसते. जुन-जुलै मधे पावसात हिचे बि रूजते व  हळू हळू वाढत राहते, आठ ते दहा महिन्यात फुले येतात . गुच्छामधे येणारी फुले दूरूनही ओळखू येतात  या मधे जांभळसर रंगाच्या फुलांची रूई जास्त प्रचलीत आहे. कश्याही जमीनीत, मातीत, कमी पावसात पण येते . फुलांचे परागीभवन किटकांमार्फत होते व फलनपण होते.कप्पे असलेल्या शेंगेमधे(पाँड) मऊ मऊ कापूसतंतू असलेल्या बिया असतात  (या कापसाची ऊशी अत्यंत मुलायम असते)त्या सुकल्या की मार्च एप्रील मधे तडकतात व बिया हवेत ऊडतात , कापसामुळे वार्याने वहन होऊन बिजप्रसार होतो.मातीत जाऊन पडली की येणार्या पावसाळ्यात रूजतात.जाड जाड मोठी मोठी पाने शनिमहाराजांना हार करून घातली जातात.महादेवाला प्रिय असलेली हि वनस्पती   पण बहूपयोगी आहे. Calotropis gigantea असे वनस्पतीशाश्त्रीय नांव असलेली हि वनस्पती पण औषधी आहे. याचा चिक जर पायात काटा वा काच गेली तर त्यावर लावला असता जखम न  चिडता त...